विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?
इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली
शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास
आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली
पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन
शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले
गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो
आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?
ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
========================================
कुंभारासारिखा गुरु
नाही रे जगांत |
वर घालितो धपाटे ,
आत आधाराला हात
॥धृ॥
आधी तुडवी तुडवी,
मग हातें कुरवाळी |
ओल्या मातीच्या गोळ्याला
येते रूपाची नव्हाळी |
घडे जाती थोराघरी
घट जाती राउळांत ॥१॥
कुंभारासारिखा........
कुणी पूजेचा कलश,
कुणी गोरसाचा माठ |
हात धरितां गुरूने
ज्याची त्याला लाभे वाट |
शिष्य पावतो प्रतिष्ठा,
गुरु राहतो अज्ञात ॥२॥
कुंभारासारिखा........
- ग.दि.मा.
*शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
*************************************************************
तवा माणसात माणुस होता..!!!
घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...!*
*मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...!*
*काचा कवड्याचा खेळ होता..!*.
*नणंद भावजईचा मेळ होता...!*
*गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...!*
*ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...!*
*ओठांवर ओरीजनल लाली होती...!*
*चंद्राची खळी गाली होती..!.*
*पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...!*
*शाळेतुन पळून जात नव्हत्या...!*
*वाकडा भांग पाडत नव्हत्या...!*
*तोंड बांधून हिंडत नव्हत्या...!*
*वाघासारखा लेख होता...!*
*तवा बाप माणसात होता...!*
*राजकारणात निष्ठा होती...!*
*खरं बोलणाऱ्याची चेष्टा होती...!*
*पैशावर पुढारी फुटत नव्हतं...!*
*तत्वाशिवाय गटत नव्हतं...!*
*प्रेम-माया अटत नव्हती..!*.
*चांगली माणसं तुटत नव्हती...!*
*चहा-चिवड्याला रडत नव्हती...!*
*चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती..!*.
*आडाणी नेता भानात होता...!*
*तळातला कार्यकर्ता मनात होता...!*
*सोसायटीचा चेअरमन रानात होता...!*
*तवा माणुस माणसात होता...!*
*गावा शेजारी बार नव्हता...!*
*रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...!*
*पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...!*
*अनवाणी पायाला रस्ता कुठं गार नव्हता...!*
*हातावर छडीचा मार होता...!*
*शाळेतचा मास्तर दिलदार होता...!*
*तवा पैशाला किंमत नव्हती...!*
*आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...!*
*घासाघासात कस होता...!*
*माणसाच्या वागण्यात रस होता...!*
*तवा माणुस माणसात होता...!!!*





*
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.
*
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.
*=======================================
(हायकू काव्यप्रकार)
#ही_लाड_वाडी
============
वनराईत
घर आहे बाबांचे
मस्त कौलाचे
डोळ्यात दिसे
रस्ते गावाकडचे
खेळ मित्रांचे
हळव्या मनी
हळूच डोळे भरी
आई पदरी
दिन आनंदी
मन धावते गावा
सुख भरवा
आठवते ती
जीवाची दिनरात्री
गावची मैत्री
डोंगरदरी
प्रसन्न नटलेली
घरी गजाली
वयोवृद्धही
नाचतील भजनी
गाऊन गाणी
सखे सोयरे
सोबतीला राहून
सुख देऊन
गाव सुखाचं
उरी नात्यांची गोडी
ही लाड वाडी
=============
विठूपुत्र-अविनाश लाड
==================================
"आपलच माणूस लागतं"
आनंदात असताना
सुखात भागीदार
कुणीही चालतं ...
पण दु:खात रडताना
अश्रू पुसायला
आपलंच माणूस लागतं ...
घोळक्यात असताना
दंगामस्ती करायला
कुणीही चालतं ...
पण एकांतात असताना
गुपित सांगायला
आपलंच माणूस लागतं ...
वरवरच्या जखमांना
फुंकर घालायला
कुणीही चालतं ...
पण मनात खोलवर
रुतलेल्या जखमांना
फूंकर घालायला
आपलंच माणूस लागतं ...
काळाच्या अंधारात
विरणार्या आठवणींसाठी
कुणीही चालतं ...
पण मनाच्या कप्प्यात
घर करण्यासाठी
आपलंच माणूस लागतं ...
कायमचंच रुसण्यासाठी
अबोला धरण्यासाठी
कुणीही चालतं ...
पण आपल्यावर
रुसण्यासाठी
रुसवा आपला
काढण्यासाठी
आपलंच माणूस लागतं ...
यशाच्या शिखरावर
बेहोश होण्यासाठी
कुणीही चालतं ...
पण अपयशाच्या दरीत
तोल सावरण्यासाठी
आपलंच माणूस लागतं ...
"आपलंच माणूस लागतं"










=========================================
पेपर टाकायला एक मुलगा
रोज यायचा घरी
थांबायचा नाही अजिबात
हाक मारली जरी
बघावं तेव्हा त्याला घाई असायची
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची
शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा
संवाद सुरू व्हायला
वेळ लागला जरा
शेवटी प्रत्येक गोष्टीला
योग यावा लागतो खरा
एकदा असं झालं
पेपर यायला झाला उशीर
अन त्या पोराच्या काळजी ने
मी झाले अधीर
खूप वाट पाहून शेवटी
फोन लावला मालकाला
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या बालकाला
त्याला वाटलं मला
रोजचं वर्तमान पत्र हवंय
खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय
शेवटी मी त्याना विचारलं
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू
त्याचा अपघात झाला
बातमी देऊन मालकाने
फोन ठेवून दिला
आणि अस्वस्थ होऊन मी
त्यांना परत फोन केला
म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो
मालक म्हणाला थांबा
कुणाला विचारून पाहतो
त्याचा पत्ता मिळे पर्यंत
माझा निघत नव्हता धीर
त्याला डोळ्या समोर पहायला
मी झाले होते अधीर
एक दोन फोन केल्यावर
त्याचा पत्ता मिळवला
आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला
तशीच धावले कोण जाणे
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून
लागली नाही झळ
रूंग्णालयात पोहचले तेव्हा
तो पडला होता एकटा
अंगात तसाच होता
त्याचा टी शर्ट फाटका
त्याला शुद्ध नव्हती
पण जाणीव होती थोडी
मी हात धरल्यावर त्याला
थर थर सुटली थोडी
त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं
काळजी करू नकोस
मी आहे तुझ्या जवळ
एवढे शब्द त्याच्या
कानी पडले केवळ
अन जादू व्हावी तशी
त्याने उघडले डोळे
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे
तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा
जमा झालं पाणी
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी
कोण विचारतय न बघता
मी होकार देऊन टाकला
अन त्याने आपला चेहरा
दोन्ही हाताने झाकला
तो पूर्ण बरा झाल्यावर
माझ्या पाया पडायला वाकला
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून
मी ओवाळून टाकला
असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष
आमच्यातला संवाद म्हणजे
ममतेचा स्पर्श
तो बोलत नाही फार
पण त्याला न सांगता कळत
कोण म्हणतं वळणाचं पाणी
शेवटी वळणाला वळतं?
आता त्याच्या शिवाय माझं
हलत नाही पान
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान
आता खरा मला
त्याचा आधार लागतो
तो मला आई म्हणत नाही
पण पोटच्या मुला सारखं वागतो
परवा डाॅक्टर म्हणाले थांबा
तुमचा मुलगा येतोय न्यायला
मला भरूनच आलं
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला
पेला ओठाशी लावला
पण पाणी पिता येईना
अन भरल्या डोळ्यातलं पाणी
माघारी जाईना
इतक्यात तो आला म्हणाला
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई?
क्षणाचाही विचार न करता
त्याने होकार देऊन टाकला
अन तेव्हा मी माझा चेहरा
दोन्ही हाताने झाकला ...
चंद्रशेखर गोखले.
=========================================
एक छान कविता वाचनात आली....
आयुष्यबद्दल काय छान भाष्य आहे पहा....
*

*बदलते ते *वय*
बदलत नाही ती *सवय*
भावतो तो *भाव*
भोवतो तो *स्वभाव*
सतत बदलतो तो *रंग*
अविचल असतो तो *श्रीरंग*
समज वाढवते ती *संगती*
अतिसंगाने जाणवते ती *विसंगती*
आतून उमटतो तो *सूर*
भावनाहिन सूर तो *भेसूर*
वहात जाते ती *लय*
वहावत नेतो तो *प्रलय*
आनंदाचा शोध ते *जगणं*
आनंदहि दुरावतं ते *वागणं*
स्वेच्छेने करतो ते *अर्पण*
उपेक्षा करतो तो *दर्पण*
ती/तो येता उठती ते *तरंग*
ती/तो नसता कण्हते ते *अंतरंग*
ति/त्या च्यासह असते ते *घर*
ति/च्या विणा उरते ती *घरघर*
तन दुखावतं ते *शस्त्र*
मन दुखावतं ते *शास्त्र*
त्यांच्याकडे असते ती *कला*
आमच्याकडे असतात त्या *नकला*
ते करतात तो *व्यापार*
आम्हास न जमे तो *व्यवहार*
अकस्मात् जडते ते *प्रेम*
पुरून उरते ते दृढ *सप्रेम*!

No comments:
Post a Comment