Tuesday, August 16, 2022

 सर्व मैत्रिनिना समर्पित 👇🏻 रुळावरून धावते आहे मनाची गाडी😍

पण माहेरचे स्टेशन यंदा आलेच नाही😭
वाटेकडे डोळे लावून आई बसली आहे😭
बाबांच्याही जीवाची घालमेल सुरू आहे!😥
आंब्याची अढी पिकून वाट बघत आहे😋
लोणच्याच्या कैऱ्या केव्हाच तयार आहेत😋
कुरडया पापड्या मसाले डब्यात भरून झाले🤗
लेकीची वाट बघत प्राण अधीर झाले😔
नातवंडाचे खेळ बघायला अंगण आहे आतुर😍
लेकीं सुनांच्या हास्याने गजबजायचे आहे गोकुळ🤣🤣
आंबरसाच्या जेवणाचा जावयाचा मान😋
पुरणपोळ्या मासवड्याचे त्यात खास स्थान😋
नणंद भावजयाच्या गप्पा असते एक पर्वणी😘
वर्षभर पुरेल अशी आठवणींची शिदोरी😍
फिरून फिरून मन जाते माहेरच्या वाटे😔
आठव येता साऱ्यांच्या का ते कातर होते
आस आहे मनाला परतून येतील ते क्षण🥰
वाट चुकलेल्या गाडीला भेटेल माहेरचे स्टेशन😍
💃👨‍👧‍👧👭👬👩‍👩‍👧‍👧👬👭👨‍👧‍👧💃
🦋🌷❤️🦋🌷❤️🦋🌷❤️🦋
[6/24/2020, 10:18 PM] +91 98334 26149: 🌷🙏... *कळलेच नाही*
                 ------------------

वर्षेचे वर्षे निघून गेली,
*धका धकीच्या जीवनात*
*वय केंव्हा वाढले*
*कळलेच नाही।।*

खांध्यावर खेळविलेली मुलं
खांध्याएवढी कधी झाली
कळलेच नाही।।

*भाड्याच्या घरात सुरू झालेला संसार,*
*स्वतःच्या घरात केंव्हा रुळला कळलेच नाही*

सायकलचे पायडल मारून दमत होतो,
केंव्हा कारमध्ये फिरायला लागलो
कळलेच नाही।।

कधी मुलांची जबाबदारी होती,
आपली त्यांच्यावर केंव्हा गेली
कळेलच नाही।।

एकेकाळी, दिवसा ढाराढुर झोपायचो
रात्रीची झोप केंव्हा उडाली
कळलेच नाही।।

*ज्या काळ्या केसावर भाव मारत होतो*
*ते पांढरे कधी झाले कळलेच नाही।।*

वणवण भटकत होतो नोकरीसाठी।
रिटायर केंव्हा झालो
कळलेच नाही।।

मुलांसाठी बचत करीत होतो।
कधी मुले दूर गेली कळलेच नाही।।

आता विचार करतो
स्वतःसाठी काही करायचं
पण, शरीराने केंव्हा साथ सोडली
कळलेच नाही।।
😔😔
 *कळलेच नाही*.....
   *म्हणून म्हणतो*...*अजूनही वेळ आहे ..थोडं तरी जगून घ्या.. 
सुंदर अशा जगण्याला डोळे भरुन बघून घ्या🙏🙏
🕐💖 *जिंदगी ना मिलेगी दोबारा..* 😊
=============================================


*खूपच सुंदर कविता*

*_पूर्वीचा काळ बाबा,_*
*_खरंच होता चांगला,_*
*_साधे घरं साधी माणसं,_*
*_कुठे होता बंगला ?_*

                     *घरं जरी साधेच पण,*
                     *माणसं होती मायाळू,* 
                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 
                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*

*_सख्खे काय चुलत काय,_* 
*_सगळेच आपले वाटायचे,_*
*_सुख असो दुःख असो,_* 
*_आपुलकीने भेटायचे._*

                    *पाहुणा दारात दिसला की,* 
                    *खूपच आनंद व्हायचा हो,*
                    *हसून खेळून गप्पा मारून,*
                    *शीण निघून जायचा हो.*

*_श्रीमंती जरी नसली तरी,_*
*_एकट कधी वाटलं नाही,_*
*_खिसे फाटके असले तरीही,_*
*_कोणतंच काम रुकलं नाही._*

                    *उसनं पासनं करायचे पण,* 
                    *पोटभर खाऊ घालायचे,*
                    *पैसे आडके नव्हते तरीही,*
                    *मन मोकळं बोलायचे.*

*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 
*_गुळाचा शिरा हटायचा,_*
*_पत्रावळ जरी असली तरी,_*
*_पाट , तांब्या मिळायचा._* 

                    *लपाछपी पळापळी,* 
                    *बिन पैशाचे खेळ हो,*
                    *कुणीच कुठे busy नव्हते,*
                    *होता वेळच वेळ हो.* 

*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*
*_खळखळून हसायचे,_*
*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 
*_ओसरीवर बसायचे._*

                    *सुख शांती समाधान " ते "*
                    *आता कुठे दिसते का ?*
                    *पॉश पॉश घरा मधे,*
                    *" तशी " मैफिल सजते का ?*

*_नाते गोते घट्ट होते,_*
*_किंमत होती माणसाला,_*
*_प्रेमामुळे चव होती,_*
*_अंगणातल्या फणसाला._* 

                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*
                    *राहिला आहे का राम ?*
                    *भावाकडे बहिणीचा हो,* 
                    *असतो का मुक्काम ?*

*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 
*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*
*_मृदंगाच्या ताला वरती,_*
*_गाव आता का डोलत नाही._* 

                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*
                    *शब्द आम्हाला गावतील का ?*
                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*
                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*

*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*
*_मजा आता कमी झाली,_*
*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*
*_सुदामाची सुट्टी झाली._* 

                    *हॉल किचन बेड मधे,*
                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*
                    *का बरं विसर्जन झालं,* 
                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

===========================================

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
******************************************************

थोडी शाब्दिक गंमत ....

एक वेलांटी सरकली,
पित्याकडून पतीकडे आली;

एक ईकार बदलला, 
नवरेची नवरी झाले;

एक काना सरकला, 
रामाची रमा झाले;

दोन काना जोडले, 

_शरदची_ शारदा झाले;
 _शामची_ शामला झाले; 

एक मात्रा सरकली, 
खेर ची खरे झाले;

एक अक्षर घटले, 
आठवलेची आठले झाले;
 
एक अक्षर बदलले, अन्

मालू ची शालू झाले,
कर्वे ची बर्वे झाले,
अत्रे ची छत्रे झाले,
गानु ची भानु झाले, 
कानडे ची रानडे झाले, व
काळे ची गोरे झाले; 

लग्नानंतर नांवच उलटे केले, 
निलिमाचे मालिनी झाले;

पदोन्नती झाली, 

प्रधान ची राजे झाले,
राणेची रावराणे झाले,
देसाई ची सरदेसाई झाले, 
अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाले; 

झुरळाला भिणारी मी, 
दैवयोगाने वाघमारे झाले;
 
लेकराला कुरवाळीत, 
पुढे लेकुरवाळी झाले;

एक पिढी सरकली,  
सुनेची सासू झाले! 

👩🏻👩🏻‍🦱👩🏽‍🦱👩🏻‍🦱👩🏻‍🦰👱🏻‍♀️👩🏻‍🦳🧑🏻👵🏻
++++++++++++++++++++++++++++++++++++++


 माणूस काय करतो ?

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !

बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
   सारं काही असूनही ,
   एकल कोंडे झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

                आपल्या माणसांजवळ ,
                    व्यक्त झालं पाहिजे !
                   खरं खरं दुःख सांगून ,
                   मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !

             कुणाशी तरी बोला म्हणजे ,
                  हलकं हलकं वाटेल !
                 दुःख जरी असलं तरी ,
                   मस्त जगावं वाटेल !

येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !

            आपली माणसं , आपली माणसं,
              बाजारात मिळत नसतात !
                 नाती-गोती जपून ती ,
               निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

                 हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
                  काही कामाचे नसतात !
                   तुझी पाठ वळली की ,
                     कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी आणून ठेव !

              रोबोटच्याच गळ्यात पडून ,
                   हसत जा , रडत जा !
                  शांत झोप येण्यासाठी ,
                  दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,

                   इथून पुढे भिशी कर ,
              हसण्याची अन रडण्याची !
               हीच खरी औषधं आहेत ,
            डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...