षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी 'श्री स्वामी समर्थ' हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.👌👌👌👌👍👍💝💝
*श्री*
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!
*स्वामी* - स्वाः + मी👍👍💐👌👌💝💝
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
*समर्थ*👍👍💐💐👌👌💝💝
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...! 👍👍💐💐💐💝💝
*त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.*💝💝💝💝💝
*श्री स्वामीं समर्थ महाराजांना जर खरच जाणून घेण्याची इच्छा असेल तर श्री विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेल्या श्रीस्वामीचरित्रसारामृत या पोथीमधील ही कवने आचरणात आणणे जरुरीचे आहे.*🙏🏼💐
*अध्याय पहिला*.💝💝
कर्ता आणि करविता l
तूची एक स्वामींनाथा l
माझिया ठायी वार्ता l
मीपणाची नसेची ll
*अध्याय दुसरा*.💝💝
कामना धरोनी जे भजती l
होय त्यांची मनोरथ पुर्ती l
तसेची निष्काम भक्तांप्रती l
कैवल्यप्राप्ती होतसे ll
*अध्याय तिसरा*.💝💝
परी जयाचे चरण l
दुर्लभ सद्भभक्तीवाचोन l
केल्यासी नाना साधन l
भावावीण सर्व व्यर्थ ll
*अध्याय चवथा*.💝💝
न लगे करणे तीर्थाटन l
योगाभ्यास होमहवन l
सांडोनिया अवघा क्षीण l
नामःस्मरण करावे ll
*अध्याय पाचवा*.💝💝
गंगाजळ जैसे निर्मळ l
तैसे व्हावे मन कोमल l
तुजसी स्तविता प्रेमळ l
सत्वर त्याते पावसी ll
*अध्याय सहावा*.💝💝
भक्ती नाही अंतरी l
दांभिक साधनांते करी l
तयाते स्वामी नरहरी l
प्रसन्न कैसे होतील ll
तयानी माजविली ढोंगे l
आणि केली नाना सोंगे l
भक्तीविण हटयोगे l
स्वामीकृपा न होय ll
*अध्याय तेरावा*.💝💝
उगीच करीती दांभिक भक्ती l
त्यावरी स्वामी कृपा न करीती l
सदभावे जे नमस्कारीती l
त्यावरी होती कृपाळू ll
*अध्याय चौदावा*.💝💝
आम्ही आहो स्वामीभक्त l
मिरवू नये लोकांत l
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ l
निशफळ भक्ती तयाची ll
दंभे षोडशोपचारे पूजिता l
प्रिय नव्हेची समर्था l
भावे पत्रपुष्प अर्पिता l
समाधान स्वामीं ते ll
*अध्याय पंधरावा*.💝💝
न लगे करणे तीर्थाटन l
हटयोगादीक साधन l
वेदाभ्यास शास्त्रज्ञान l
मोक्ष साधना कारणे ll
अंतरी स्वामीभक्ती जडता l
चारी पुरुषार्थ येती हाता l
पाप ताप दैन्य वार्ता l
तेथे काही नुरेची ll
*अध्याय सतरावा*.💝💝
लोकापवादाचे मानी भय l
तो भक्ती करील काय l
प्रेमानंद चित्ता नोहे l
भजनी मन लागेना ll
*अध्याय आठरावा*💝💝
धन्य गुरूचें महिमानl
पादुका स्पर्श करोनl
जहाले तत्काळ ब्रम्हज्ञानl
काय धन्यता वर्णावी ll
*अध्याय एकोणिसावा*💝💝
उठोनियां करिती स्तुती
धन्य धन्य हे यतिमूर्ती
केवळ परमेश्वर असती
रूप घेती मानवाचे
*अध्याय विसावा*💝💝
जय जया जी करूना करा
जयजयाजी यतिवरा
भक्तजन संतापहरा
सर्वेश्वरा गुरुराया
*अध्याय एकविसावा*💝💝
अंगी सर्वदा विनय वसो
वृथाभिमान तो नसो
सर्व विद्या सार गवसो
भक्त श्रेष्ठालागुनी
🌹 *स्वामी गुरुमाऊली*🙏🏼🌹💝💝
💝💝श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💝💝
No comments:
Post a Comment