Friday, July 1, 2022

देवता विसर्जन विधी


विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध,अक्षता (गंधाक्षता कुंकू मिश्रित तांदूळ), हळदी -कुंकू वाहून पूजा करावी.
दहीभाताचा नैवेद्य दाखवावा व क्षमाप्रार्थना म्हणावी, हातात अक्षता घेऊन खालील मंत्र त्या देवतांवर वहाव्यात नंतर एका  पांढऱ्या कापडात मुठभर तांदूळ, एक सुपारी, सुट्टी नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबरच नैवेद्याचा दही भात ठेवावा व कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जित प्रवाहात विसर्जित करावे
*"यांतु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवा । इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च ॥"*
(वरिल मंत्रातील देव या शब्दाचे ठिकाणी विसर्जन करावयाच्या पूजा केलेल्या देवतेचे नाव घ्यावे. )

 टीप: 
१.  काचेचा फोटो असेल फक्त कागदाच्या फोटोचे विसर्जन करावे, काच किंवा फ्रेम प्रवाहात सोडू नये, जेणेकरून कुणास इजा किंवा पर्यावरणास धोका होणार नाही

*संदर्भ ग्रंथ: मराठी संस्कृती मराठी अस्मिता*

॥ श्री स्वामी समर्थ  ॥

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...