I don’t need the world to love me; Just you!..
------------------------------ ---------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – सुखी वैवाहिक जीवन!
------------------------------ ---------------------------
आजकाल घटस्फोटांचं, कुरबुरींचं प्रमाण खुपचं वाढलयं. जेव्हा जेव्हा आपण अशी कचाकचा भांडणारी आणि कोर्टकचेर्या करणारी विवाहित जोडपी बघतो, तेव्हा आपल्याला एक प्रश्ण पडतो.
“आपण सगळे लग्नच का करतो?,
काहीजणांना लग्नाचा मुळ हेतु गवसत नाही बहुतेक? आणि काहीजण तो सोयीस्करपणे विसरतात.
लग्न हे एक ‘पवित्र’ बंधन आहे,
आयुष्यभरासाठी एकमेकांचे व्हायचे, ‘मी तुला सांभाळीन’ हे वचन द्यायचे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत पाळायचे, म्हणजे ‘लग्न’!
जोडीदाराच्या चुका पोटात घालायच्या, त्याला आपलंच रुप मानायचं, त्याच्या सुखासाठी झटायचं, त्याला हवं नको ते बघायचं, म्हणजे ‘लग्न’!
दोघांनी मिळुन हसर्या चेहर्यांनी, मिचमिचत्या डोळ्यात, स्वप्नं साठवायची, आणि त्या स्वप्नांसाठी आयुष्य समर्पित करायचं, म्हणजे खरं ‘लग्न’!.
एकमेकांना छेडायचं, रुसायचं, फुगायचं आणि मनवायचं, आणि एका क्षणात सगळं विसरुन मिठीत यायचं, यासाठी करावं लग्न!
थकला भागला, दिवस संपला, की संध्याकाळी आतुरतेने तिला पहायला म्हणुन धावतपळत घरी जाऊन बेल दाबायची, तिचं एक गोड हास्य पाहावं, सारा शीण पळुन जावा, ह्यासाठी करतात लग्न!
त्याला ही भाजी आवडते, तो पदार्थ आवडतो म्हणुन अंग ठणकतं असतानाही, त्याच्या आवडीचे मेनु बनवुन त्याला खाऊ घालावं, आणि त्याने तृप्तीचा ढेकर दिला की आपलंही पोट भरावं, ह्यासाठी करावं लग्न!
नुसत्याच आवश्यकता भागवण्यासाठी, कधी शरीराची भुक भागवण्यासाठी, आणि कधी सुख ओरबडण्यासाठी लग्न केलं तर पदरात निराशाच पडणार.
नवर्याने बायकोला भावनाशुन्य बनुन सुंदर बाहुली असल्यासारखं वागवलं तर ती ही नवर्यावर नाही, तर फक्त त्याच्या पैशामध्ये, पाकीटामध्ये आणि एटीएम कार्ड मध्येच सुख शोधेल,
मान्य आहे, नाती जपण्याची, रुजवण्याची, खुलवण्याची, फुलवण्याची जबाबदारी दोघांचीही आहे, समजा, तुमचा पार्टनर तुमच्यावर जीव तोडुन प्रेम करतं नसेल पण तुम्हाला सुरुवात करायला कोण आणि का अडवतयं?
अमेरीकेतल्या एका युनिव्हरसिटीने ‘खरा आनंद कुठे लपला आहे?’ ह्याविषयी वेगवेगळ्या माणसांवर रिसर्च केला, आणि निष्कर्ष काढला, की ज्या लोकांचे नातेसंबंध मधुर असतात, ते खरे आनंदात जगतात.
काही महिने सांभाळलेल्या कुत्र्याचा लळा लागतो, मग कित्येक वर्ष चोवीस तास सहवासात राहुनही आम्हाला आमच्या जोडीदाराचा लळा कसा लागत नाही?
का इतके कोरडे आणि भावनाशुन्य बनत चाललो आहोत? असा कसा आटत चाललाय, आपल्यातला प्रेमाचा झरा?
जरासं खुट्ट झालं की, आजकाल कमवणार्या बायका घटस्फोटाची वाट धरतायत, आणि हा पर्याय नसलेल्या, गृहिणी निराशेनं, तटस्थपणे आलेला दिवस ढकलतायतं, आणि नशीबाला दोष देत, आतल्या आत कुढत जगतायतं.
लग्न करण्यामागचे हेतु आणि आयुष्याचे ध्येय स्पष्ट असले की सगळेच प्रश्ण सोपे वाटु लागतील. कोरडेपणाने लग्नाची ओझी वागवणार्यांसाठी आणि घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या मित्रांसाठी काही उपाय सुचवत आहे.
1) कुटुंब टिकण्यासाठी - "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
2) मनमोकळा संवाद - पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
3) स्पर्धा टाळावी - पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
4) स्वीकार महत्त्वाचा - अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
5) बदल करण्याची तयारी - मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
6) जबाबदारीची जाणीव - लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
7) तडजोडीची तयारी - कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
8) थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
9) आपलं काही चुकतंय का? आपण सुधारणा करतोय, मला वेळ द्यावा, असं मोठ्या मनाने जोडीदाराला सांगा.
10) आपलं नेमकं काय चुकतंय हे देखील जोडीदाराकडून जाणून घ्या.
11) जोडीदाराने सांगितलेले मुद्दे योग्य आहेत का? यावर विचार करा, सुधारणा करता येतील का यावर भर द्या.
12) मनात इगोला स्थान देऊ नका, कारण इगोचं भूत मानगुटीवर बसलं की ते भल्या भल्यांना संपवतं.
13) लग्न झाल्यानंतर आपला नवरा / बायको आणि मुलं हे आपलं सर्वस्व आहे, बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीला या जगात स्थान नको, अशी तिसरी व्यक्ती ज्यामुळे आपले नवरा-बायकोत तणाव निर्माण होतोय, त्याच्याशी त्वरित संबंध संपवा, कारण आपला नवरा किंवा बायको हेच शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहेत. तिसरी व्यक्ती तुमचा वापर करतेय, हे कळण्यापूर्वी तुमचा संसार संपलेला असेल.
14) सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅप, मेसेजस याचं चांगलं कम्युनिकेशन नवरा - बायकोत होऊ शकतं, तिसऱ्याशी प्रमाणापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त संवाद नको, हा संवाद नवरा-बायकोतला संवाद हरवू शकतो, संशयास्पद वातावरण निर्माण करू शकतो.
15) आपल्या पत्नीशी आपण करत असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करा, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या. एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर एकमेकांतील प्रेम वाढवेल.
16) नेट, सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅपवर वेळ घालवण्यापेक्षा, आपआपसात नवनवीन विषयांवर चर्चा करा.
17) चांगुलपणा बरोबर थोडासा खट्याळपणा जपला, तर गोष्टी अजुन थोड्या रोमॅन्टीक आणि थोड्या सोप्या होतील.
आभार आणि शुभेच्छा!..
(2018 मध्ये लिहलेला एक लेख)
No comments:
Post a Comment