..जन्म होतो तेंव्हा माणसाला काहीच समझत नसतं...
मृत्यू होतो तेंव्हा पण माणसाला काहीच समझत नसतं !पण मधल्या काळात जेंव्हा आयुष्याला आपण जगत असतो , हि धरती , हे आभाळ , इथली रचना , बोली भाषा , इथली जिवन पद्दत समझुन घेत असताना आपण आपल्या ही नकळत खूप मोठ्या ऊंचीवरची भाषा बोलत असतो .
मी पणाची चमक आपल्या डोळ्यापुढनं कधी दुरच होत नाही .
मनासारखं घडलं कि...माणुस सुखी होतो , अनं स्वतलाच बदलुन घेतो .
आयुष्य हे नक्की कशा पद्धतीने जगायला हवं ? या बद्दल चं ज्ञान घेणं हे कुणालाही न पटणारी गोष्ट
कारण मनात साठलेली मी पणाची धुळ समोरचं मनच समझुन घेत नाही .
आपल्याला हवी हवीसी वाटणारी गोड माणसं , आपल्या मनाला पटणारी निर्मळ माणसं , आपल्या विचारांशी नाळ जुळलेली वैचारिक माणसं हाच खरा आपला या जन्मातील ऐतिहासिक ठेवा आहे .
पण आपण या ठेव्याला प्रामाणिकपणे जपतो का ?
निर्मळपणे समझुन घेतो का ?
या प्रश्नाचं आपल्या अंतर्मनात उत्तर काहीही असो पण...आपण अशी नाती जपलीच पाहिजेत !
कारण...त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्याला , आपल्या सुखाला अर्थ असतो .
समोरच्याचे मन जपून वागणं हे खरंतर खूप अवघड काम पण...त्या एवढं सुख इतर कशातच नाही .
तुम्ही कधी इतरांसाठी निर्मळपणे जगून पाहिलय का ?
कधी मनापासून समोरच्या व्यक्तीला समझुन घेतलय का ?
तसं नसेल केलं तर...नक्की करुन पहा !
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख हे यातच आहे .
स्वतसाठी जगणं , स्वतच्या विचारात असणं हे गैर नाही पण याने तुम्हाला जगण्यातलं आनंदाचं तंत्र समझू शकत नाही .
अनं स्वत साठी जगणं हे निर्मळमनाचं लक्षण नाही .
आपल्या आवडत्या माणसांना वेळ द्या , मनापासून जिव लावा , अडचणीच्या काळात समझुन घ्या...
विश्वास हा विश्वासाने वाढतो....
प्रेम हे प्रेमानेच वाढतं !
आरशा सारखं स्वच्छ राहून... पुर्ण निष्ठेनं , विश्वासानं आपल्या माणसाला साथ द्या तो ही सुखी होईल अनं आपण पण...मी तर तसच करतो .
कारण माझ्या आयुष्यातील मला आवडलेली माणसं , माझ्या मनातील माझी हक्काची माणसं हिच माझी ताकत आहेत .
मी... माझ्या माणसांच्या सोबती शिवाय कधीच सुखी होवू शकत नाही .
अनं त्यांना मनापासून सुखी बनवल्या शिवाय मला माझं सुख जाणवत नाही .
नाती अशीच जपायची असतात...थोडसं मायेनं , थोडसं समझुतीनं अनं खूप खूप विश्वासानं !
तरच...आपल्या आयुष्याला अर्थ आहे अन्यथा कोटीचे मालक व्हा पण सगळं व्यर्थ आहे .
.... कवी - बापू
No comments:
Post a Comment