Tuesday, July 5, 2022

कोकणचा अमोल ठेवा

 

असोत सुंदर हापुस तरीही
          रायवळाची  गंमत  भारी
प्रकार त्याचे अनेक असती
         प्रत्येकाची चवहि न्यारी ।।
गोडचि असतो बिटकी आंबा
         अंगठ्याएवढी त्याची कोय
जपुनी खावा चुपुनी त्याला
        घशामध्ये जाईल कोय ।।
तुरट असे जो आंबा त्याला
       हात न लावे कधी कुणी
खडुस लोकां हळुच द्यावा
        बेत असे तो बालपणी ।।
रंगरूप अन् चवीप्रमाणे
       नाव देती त्या आंब्याला
स्मरण तयाचे नुसते होता
       पाणी सुटते  तोंडाला ।।
पुर्ण फळ ते प्रत्येकाला ,
        कापून खाणे मान्य नसे
चुपुनी खावा मस्त मजेने
        बेत तयाचा शाहि असे ।।
हात माखुनी खाता याला
       जगताचे ते भान नसे 
मूळ स्वरूप हे आम्रफलाचे
        याची गंमत खास असे ।।
जो तो घेई हापुस परी हो
         यांची चवहि चाखुन घ्या
कोकणचा ह्यो अमोल ठेवा
       नवीन पिढीला खुशाल द्या ।।

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...