"आनंद"
शोधत राहिलो आयुष्यभर आनंद..
जैसा मृग शोधी वनी कस्तुरी गंध..
कधीच नसेल का या आयुष्यी
झाले माझे प्रसन्न चित्त..?
पळभर.. नकळत..
झालेही असेल कदाचित..!
पकडण्यास त्या आनंदाला..
झाकली मूठ सक्त..
पापणी मिटली चुकून..
ओंजळ माझी रिक्त..
आनंदा पाठी मी
असा राहिलो धावित..
भौतिक सुखामध्ये त्याला..
राहिलो धुंडाळित..
बाह्य जगामध्ये त्याचा
पत्ता राहिलो शोधित..
भूतकाळात कधी तर..
भविष्यात राहिलो पाहात..
जेव्हा गाविला
ना तो माझ्या हाती..
दुषिणे मारले
आप्त स्वकीयांच्या माथी..
नशिबाला वाहिली
शिव्यांची लाखोटी..
कुंपना पुढे ना गेली
कधी संकुचित ती मती..
ऐका अजानत्या क्षणी मिळाले उत्तर अनेक..
कळले मला मीच तो राजहंस ऐक..!!
आनंद माझा
जगण्यात आहे..
माझा मी
होण्यात आहे..
दु:खा पासून काही
नविन शिकण्यात आहे..
बेगडी जगामध्ये
निरपेक्ष होण्यात आहे..
तो ह्याच क्षणी
वर्तमानात आहे..
तो तर माझ्या
अंतर्मनात आहे..
No comments:
Post a Comment