Friday, July 1, 2022

रुद्राक्षाच्या माळेचे महत्व

आज आपल्याला रुद्राक्षाच्या माळी विषयी माहिती आणि महत्त्व सांगणारा आहे. 

 रुद्राक्षाची माळ सर्व प्रकारच्या माळात  श्रेष्ठ मानले आहे शिवपुराणात सांगितले आहे की, 

 रुद्राक्ष मालिन दृष्ट वा शिव विष्णू: प्रसिद्ध ती !
 देवी गणपती: सूर्य: सुराश्चाने sपी पार्वती!!

 रुद्राक्ष धारण केलेल्या मनुष्यास पाहून शिव,  विष्णु,  देवी,  गणेश,  सूर्य तसेच सर्व देवगण प्रसन्न होतात. 
 साधकांसाठी माळेचे महत्व आहे माळी विषयी जप आदी कर्म समुचित रुपाने संपन्न होत नाही कुठल्याही प्रकारचा जप  असेल तरी तो माळी शिवाय होत नाही. 
 जोपर्यंत साधक माळेचे मणी पुढे ओढत राहतो तोपर्यंत त्याच्यात हर्ष, उल्हास व उत्सुकता असते. 
 जोपर्यंत हातात माळ नसेल तोपर्यंत मंत्र संख्या जप करतेवेळी लक्षात ठेवणे (मोजणे) शक्य नाही. 
 त्यामुळे माळ जपता मंत्रजप करण्यास गेल्यास मंत्रजप मोजत असता साधकाचे मन स्थिर रहात नाही व त्याचे मन दुसरीकडेच फिरू लागते म्हणून माळी जप साधनेत महत्त्व आहे. 
 माळ हे मोजण्याचे माध्यम नसून त्यात श्रद्धा, विश्वास व साध्यप्राप्ती, प्रेम भरलेले आहे. म्हणून माळेच्या पवित्र ते वर ध्यान देणे अपेक्षित आहे. 

🕉️ रुद्राक्षाची माळ कशी तयार करतात🕉️

 माळा या दहा प्रकारच्या असतात. प्रवाळ,  मोती,  स्फटिक, शंख,  चांदी,  सोने,  चंदन,  पुत्रजावीका,  कमल व रुद्राक्ष. 
 ह्या माळा अ पासून क्ष पर्यंत अक्षरांनी अनुभविक करून धारण केल्या जातात. 
 माळी साठी सोने चांदी व तांबे यांचा ओवण्यासाठी उपयोग केला जातो.
 मुखास मुख व शेवटी शेपटी  लावून मण्यांची रुद्राक्षाची माळ तयार केली जाते. 

🕉️ रुद्राक्षाच्या प्रत्येक अंगाचे महत्व 🕉️

🕉️ याच्या छिद्रात असलेले सूत्र ब्रह्म. 
🕉️ उजव्या भागात शैव व डाव्या भागात वैष्णव असे म्हणतात. 
🕉️ मुख सरस्वती व शेपटी गायत्री आहे. 
🕉️ छिद्र  विद्या व गाठ प्रकृती आहे. 
🕉️ तसेच स्वर सात्विक असल्यामुळे श्वेत आहेत. 
 वरील प्रकारे दहा माळांचे वर्णन झाले परंतु या सर्वात रुद्राक्षाचे माळ अधिक श्रेष्ठ आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शास्त्रात रुद्राक्षाच्या माळा तीन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. 

 अष्टोत्तरशत कार्या चतुष्पन्चाषदेव वा !
सप्तविशन्तिमान वा ततो हिणधमा स्मृता !!

 रुद्राक्षाची माला 108 यांचे बनवावी किंवा 54,  27 मण्यांचे बनवल्यास श्रेष्ठ असते. यापेक्षा कमी मण्यांची माला हीन समजली जाते. 

 ⚫️टीप ~ जो रुद्राक्ष ओरिजनल असतो त्याची किंमत ही जास्त असते. कारण जे भारतात रुद्राक्ष उगवतात ते फक्त शिवलिंगाला वाहण्याच्या काबील असतात.
 आणि जे नेपाळला पशुपतिनाथ आला रुद्राक्ष तयार होतात किंवा त्या झाडाला लागतात त्या आपण स्वतः धारण करू शकतो. भारतातील रुद्राक्षांना  क्वालिटी कमी असते दर्जा कमी असतो. आजकाल कोणीही शंभर दोनशे रुपयाला रुद्राक्ष देत आहे त्यामध्ये कोणीही फसू नये सर्टिफिकेट फक्त पंधरा रुपयाला मिळतं.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...