ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे. त्यांचेही आभार माना. कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे...!!
तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा. कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे...!!
ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या, कारण त्यामुळे *लढण्यासाठी* चेतवले गेलात...!!
ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले, त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा. कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली...!!
जे तुमच्यावर *टीका* करतात, त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात...!!
तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना. कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात...!!
तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात...!!
*तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा...!!*



No comments:
Post a Comment