Tuesday, July 26, 2022

कणभर तिळाचा मणभर नखरा

 *कणभर तिळाचा मणभर नखरा* (आठवणीतील कविता)

😄😀😃🌹😃😀😄
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

         तीळ चालला भरभर
           थांबत नाही कुठे पळभर !
" तिळा , तिळा , कसली रे गडबड ? "
" थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !"
         " ऐक तर जरा , पहा तर खरा ,
            कणभर तिळाचा मणभर नखरा ! "
            "बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !"
     " बघू या गंमत , करू या जंमत !राज
      चला रे जाऊ याच्याबरोबर ."

तीळ चालला भराभर . वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
" घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!

पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?

     " वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
       पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
       एवढासा म्हणून हसलात मला,
       खुलवीन मी तर सर्व जगाला ! "

(१९७८-७९ इ.२ री बालभारती )

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...