Tuesday, July 5, 2022

चहास्तोत्र ☕

चहास्तोत्र  ☕


शीणसुस्ती महानिद्रा 
क्षणात पळवी चहा , 
प्रभाते तोंडधुवोनी , 
घेता वाटे प्रसन्नता !!१!!

अर्धांगीनीहस्ते घेता ,
निद्रा तात्काळ विरघळे,
पुन्हा स्नानांतरे घेता 
अंगी चैतन्य सळसळे !!२!!

लिंबुयुक्ता विना दुग्धा 
अरूची पित्त घालवी ,
शर्करेविना घेता ,
मधुमेह न गांजवी !!३!!

शितज्वर शिर:शुळा ,
खोकला नाक फुरफुरा ,
गवतीपत्र अद्रकायुक्ता ,
प्राशिता जाई सत्वरा !!४!!

भोजनपुर्व प्राशिता , 
मंदाग्नी पित्तकारका ,
घोटता घोटता वाढे , 
टँनीन जहरकारका !!५!!

चहाविना आप्तस्नेह्यांचे ,
स्वागतासी अपुर्णता,
यास्तव भूतलजन हे , 
म्हणती त्यासी अमृता !!६!!

इति चहाभक्त विरचितम् चहास्तोत्रम्
चहाबाजप्रित्यर्थम्  समर्पयामी !!७!!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...