Friday, July 1, 2022

रामनवमी ! आणि काहीशी खंत


©सुरज पाटील

आज्ञा धारक पुत्र,  मर्यादा पुरुषोत्तम, तिन्हीलोकीचे स्वामी, असणाऱ्या "प्रभू श्रीरामचंद्र" यांच्या परम  पवित्र वास्तव्याने पुनीत झालेली आपली ही भारतभूमी. इथे जन्मलेल्या कोणत्याही  बालकास प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे कोण हे सांगावं लागत नाही, इथली माती आणि माता जणू त्याच्या भाळी प्रभू श्रीरामाचा इतिहास कोरुनच जन्मास घालते.
गुरूगृही राहून गुरूंची आज्ञा पाळत अध्ययन करणारे प्रभू श्रीरामचंद्र आम्हास माहिती आहे. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर, थोरले राजपुत्र म्हणून, राज्याभिषेकाची वेळ येते तेव्हा. मातोश्रीचा आदेश म्हणून, राज्याभिषेक स्वतः करून न घेता, वनवास पत्करणारे आज्ञाधारक प्रभू श्रीरामचंद्र देखील आम्हास भावतात. 14 वर्षाचा खडतर वनवास,  या काळात माता-पित्यांच्या प्रेमस  पारखे   झालेले मन, माता सीतेचे  दृष्ट रावणाने केलेले अपहरण, अशा असंख्य संकटांना तोंड देत  मारुतीरायाच्या नेतृत्वात स्वतःचे सैन्य उभारत,  राक्षसांचा राजा असणाऱ्या रावणाचा  वध करून  सर्वसामान्य जनतेस  सुखी करून,  तुमच्या आमच्या समोर प्रभू श्रीरामचंद्र एक नवीन आदर्श वस्तुपाठ घालून देतात.
आजची वस्तुस्थिती काय?.  प्रचंड विनोदी असणारी, मात्र आपल्या प्रत्येक भागातून  आपल्या श्रोत्यांना  चांगला संदेश देणारी  मालिका. 'तारक मेहता का उल्टा चश्मा!  फावल्या वेळात मी नेहमी बघत असतो त्यातीलच एका भागात, दसऱ्याच्या सणानिमित्त रावण दहनाचा  कार्यक्रम  चित्रित झाला आहे  पण या रावण दहनासाठी कोणीही राम बनायला  तयार होत नाही, आणि तो रावण दहनाचा कार्यक्रम रद्द होतो, मालिकेच्या त्या भागाच्या शेवटी एक संदेश अपना  सगळ्यांसाठी दिला आहे तो म्हणजे आपल्यात खरंच प्रभू श्रीरामांचा एक तरी गुण आहे का? आणि याचे उत्तर  खात्रीने सांगतो  नाही असेच असेल  त्यामुळे विचार करा रावण दहन करायला तरी आपण पात्र आहोत का? आपल्या संपूर्ण जीवनात श्रीराम माता-पिता आणी गुरुजनांचे आज्ञाधारक राहिले. आता या आज्ञा धारकतेचा गुणात  आपण कुठे बसतो? याचा स्वतः आत्मचिंतन करा  असे खुप सारे गुण सांगता येतील जे प्रभु श्रीरामचंद्रनकडे होते आणि आपल्याकडे त्याचा दुष्काळ आहे.
'रामाचे उदात्तीकरण आणि खंडन! आताच्या तरुण पिढीच्या हातातच आपल्या भारत भू च  भविष्य आहे असं म्हटलं जातं, हीच तरुण पिढी विवेकी, संयमी, सुसंस्कृत, सुविचारी, असणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने आपल्या देशातील तरुणाई वरील पद्धतीची असल्याचे दिसून येत नाही, या तरुणाईच्या हृदयात रामनाम नसून ते  यांच्या गाडीवर, घरावर,  आणि समाज माध्यमातील प्रोफाईलवर, फक्त दिसतअत. अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी  सगळेच नसले  तरी काही तरून दंडेलशाहीने वर्गणी गोळा करताना पाहतो तेव्हा खूप खंत वाटते. तर दुसरीकडे केवळ द्वेष म्हणून  रामच अस्तित्वात नाही असं म्हणणारे देखील  बुद्धी भ्रष्ट तरुणाईमध्ये मोडतात, अशा लोकांना व स्वतः प्रभू श्रीरामचंद्र बद्दल काही माहीत नसतं, आणि माहिती असलं तरी  मान्य करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते.
राम-राम अभिवादन कालबाह्य  होत चाललइ आहे. माझ्या लहानपणी  दोन व्यक्ती एकमेकांना भेटले की राम राम  असे अभिवादन करूनच संभाषण आणि पुढील कार्यास प्रारंभ करत, आत्ताची पद्धत  शहरी भागात सर पूर्णपणे आणि बहुतांशी प्रमाणात ग्रामीण भागातूनही कालबाह्य होताना दिसत आहे किंबहुना तशी कुणी वापरत नाही. उचआरिता राम नाम होय पाप निस्सारण  असं म्हटलं जात, तरीही आपण साधा रामराम मनात नाही, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच खेदजनक वाटली पाहिजे आणि आपण राम नामाच्या उच्चाराचा प्रारंभ केला पाहिजे.
आज एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात सुद्धा टेक्नोसॅव्ही आणि वैज्ञानिक असणाऱ्या आपल्या भारतास, एक पत्नीक्, एक वचनी, असणाऱ्या निष्ठावंत प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शांची आणि संस्कारांची तितकीच गरज आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कडून आलेल्या  संस्कारांनचे  आदर्शांची रुजवत  आता जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकावर करण्याची गरज आहे, नाही तर पुढील काळ  जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत साठी खूप कठीण असेल याची जाणीव एका कवीने आपल्या कवितेतुन  करून दिली आहे ती अशी. किस रावणकी बाहे काटउ| किस लंकाको जलादु| यहा तो, हर घर रावण हे|  और हर गली लंका हे| मुझे बताओ,  मै राम कहासे लावू|  मै राम कहासे लावू|.
आपण सगळ्यांनीच या वस्तुस्थितीची अंतर्मुख होऊन चिंता करण्याची गरज आहे. आणि त्याच चिंतनातून प्रभू श्रीरामचंद्र यांचा एक तरी गुण स्वतःच्या अंगी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा हीच आपणास या आजच्या रामनवमी निमित्त शुभेच्छा आणि प्रार्थना.  शेवटी गीतरामायणातील एक अप्रतिम गीत '" राम जन्मला ग सखे राम जन्मला".  देतो आहे, ते काळजीपूर्वक वाचा आणि शक्य झाल्यास युट्युब वर जाऊन पुन्हा एकदा ऐका आपणासही ते आवडेल. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना या रामनवमीच्या सकारात्मक खूप खूप शुभेच्छा...

'गीत..     त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
राम जन्मला ग सखे राम जन्मला
राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

राम जन्मला ग सखे राम जन्मला पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला
राम जन्मला ग सखे राम जन्मलआ

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं0
सूर, रंग, ताल यांत मग्‍न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोललआ

राम जन्मला ग सखे राम जन्मला.....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...