ऊंबरठ्यावर सायंकाळी /संध्यासमयी बसु नये असे म्हणतात.
कारण या मागे एक आख्यायिका आहे,
ती गोष्ट आहे. श्री विष्णू यांच्या नरसिंह अवताराची… हिरण्यकश्यपू चा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णू यांचा भक्त होता. आणि हे राक्षसी भावना असणाऱ्या वडीलांना रूचत नव्हते. त्यांनी प्रल्हादाला अनेक प्रकारे या भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण झाले ऊलटेच, प्रल्हादाची श्रद्धा वाढतच गेली. प्रत्येक कणाकणात भगवंत म्हणजे श्री विष्णू आहेत हे प्रल्हादाचे म्हणणे आजमविण्यासाठी हिरण्यकश्यपू ने जवळील खांबावर प्रहार केला. आणि भगवंत श्री नरसिंह रूपात प्रकट झाले.
भगवंताने नरसिंहरूप का धारण केले ? तर हिरण्यकश्यपूला ब्रम्हदेवाचे वरदान होते…
१.)त्याचा मृत्यु निसर्ग निर्मित घटकांपासून (ब्रम्हदेवाने केलेल्या भुतांपासून /घटकांपासून) होऊ नये.
२.) मृत्यू घरात किंवा घराबाहेर होणार नाही.
३.) मृत्यू दिवसा किंवा रात्री होणार नाही.
४.) मृत्यू शस्राने किंवा अस्राने होणार नाही.
५.) मृत्यू जमिनीवर किंवा आकाशात होणार नाही.
६.) मृत्यू देव , दानव , मानव , इतर कोणाकडुनही प्राप्त होणार नाही.
या वरदानामुळे अजेय हिरण्यकश्यपूला मारण्यास श्री विष्णू यांनी चवथा अवतार श्री नरसिंह यांचा घेतला.
१.) खांब तोडताच त्यातून श्री नरसिंह बाहेर पडले.
२.) देह देव , दानव , मानव , पशू यांचा नव्हता तर मनुष्य आणि प्राणी याची सरमिसळ होती.
३.) सायंकाळ ची वेळ म्हणजे दिवस /रात्र नव्हती.
४.) त्यांनी हिरण्यकश्यपूस ऊचलून ऊंबरठ्यावर बैठक मारली म्हणजे घरात नाही घराबाहेर नाही. आकाशात नाही आणि जमिनीवर नाही.
५.) नखांनी पोट फाडुन वध केला म्हणजेच शस्र नाही वा अस्र नाही.
तर असे हे संतापलेले नरसिंह सायंकाळी ऊंबरठा / ऊंबऱ्या चा ऊपयोग असुरास मारण्यासाठी करतात. त्यामुळे या जागेस परंपरागत महत्व आहे. त्यांचा रोष आपल्या कुटुंबियांवर होऊ नये म्हणून …
सायंकाळी ऊंबऱ्यावर बसु नये , शिंकु नये असे म्हणतात. आणि असे केल्यास पाणी टाकतात ज्यामुळे त्यांचा होणारा संताप शांत होईल.
थोडक्यात सांयकाळी ऊंबरा किंवा ऊंबरठा हे स्थान श्री नरसिंह भगवंताचे मानतात.
काही संबंधित मुद्दे….
१.) ऊंबरा नावाप्रमाणे ऊंबर या झाडाच्या लाकडापासुन बनविला जात असे.
२.) ऊंबरा दरवाजच्या चौकटीचा भाग असतो. ऊबरा नसेल तर चौकट पुर्ण होत नाही.
३.) पुर्वी घरच्या आतमधील भाग शेणाने सारवायचे आणि ऊंबरठ्याच्या बाहेर अंगणात शेणाचे पाणी शिंपडणे / सारवणे असे काम होत असे. यामुळे सरिसृप , किटक आत मध्ये येण्यापासून परावर्तीत होत असत. ऊंच ऊंबरठा या जीवांना घरात शिरण्यास अटकाव घालत असावा.
४.) ऊंबरठा घराच्या प्रवेशद्वारावर असे. आणि घराचे प्रवेशद्वार पूर्व / ईशान्यपूर्व दिशेकडे प्रामुख्याने असावा असे म्हणतात. त्यामुळे आपले घर ऊगवत्या सुर्याने प्रकाशमय होत असे.
५.) घरातील लक्ष्मी ..लक्ष्मीस प्रसन्न ठेवण्यासाठी गृहप्रवेशापासून ऊंबऱ्या बाहेर रांगोळी काढणे , दिवे लावणे करत असते. लक्ष्मी म्हणजे श्री विष्णू यांची पत्नी आणि नरसिंह हा त्याचाच अवतार असल्याने लक्ष्मी खुष तर नरसिंह खुष असणार.
६.) शिंकण्याने काय घडु शकते हे कोरोना ने संगळ्यानाच चांगले शिकविले आहे. त्यामुळे ऊंबऱ्या वर शिंकल्यास घराचूया प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना कसली कसली लागण होईल ? विचार केलेलाच बरा.
७.) सायंकाळी ऊंबऱ्या वर बसणे म्हणजे दिवसभरातील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी वाढुन ठेवलेले जिवाणू/विषाणू चा संसर्ग होणे नाही का?
माहिती संदर्भ :- आंतरजाल
No comments:
Post a Comment