१ } तिर्थ घेताना उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा
|| { अंगठ्याजवळचे बोट वाकवून गायीच्या कानासारखी
|| मुद्रा करावी } करून त्यामध्ये तिर्थ घ्यावे.
२ } देवाचे तिर्थ अग्नितीर्थ { तळ हाताच्या खोलगट भागात
|| घेऊन } ते आत्मतीर्थाने आवाज न करता प्राशन करावे.
३ } तिर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृत
|| अत्यल्पच { उडीदाचे डाळी येव्हढे } असावे कारण तिर्थाचे
|| रूपांतर लाळेत व्हावे मलामध्ये होऊ नये असा शास्त्रसंकेत
|| आहे.
४ } सामान्यतः देवपूजा केल्यानंतर दोनदा व उपवासदीका
|| मूळे अन्न ग्रहण होणार नसेल तर तीनदा तिर्थ घ्यावे.
५ } मंदिरात गेल्यावर एकदाच तिर्थ घ्यावे.
६ } शुद्धो दकाने तिर्थ ग्रहण केल्यावर हातावरील
|| तिर्थलेशाचा मास्तकास स्पर्श केल्यास देवगौरवं साधला जातो
७ } देवपूजा केल्यानंतर तिर्थ एखाद्या झारीत ठेवावे व ते
|| परगावी जाताना, महत्वाच्या कामास जाताना, दिवसभरात
|| कुटुंबियांकडून परपीडा, परनिंदा, पैशून्यदी पाप घडल्यास
|| देव दर्शन घेऊन तिर्थ घ्यावे.
८ } काही ग्रंथांतून तिर्थ हे पात्रातून घ्यावे असे लिहिले आहे
९ } तिर्थ घेताना उजव्या हातात तिर्थ व डाव्या हातात तिर्थ
|| भरलेले पात्र असू नये. त्याने तिर्थ भरलेले पात्र उछिष्ठष्ट
|| होते. अपवाद - झाकणी झाकलेली झारी.
१० } तिर्थ प्रसाद शक्यतो पुरोहित किंवा जेष्ठ व्यक्तीकडून
|| घ्यावा. अपवाद - आपण स्वतः पूजा केल्यास, सोवळ्यात
|| असल्यास व दुसरे कोणी उपस्थित नसल्यास इ.
११ } तिर्थ प्रसाद खाली बसून घ्यावा.
१२ } आपण बसलेल्या आसनावर { पूजा करताना } बसून
|| तिर्थ प्रसाद ग्रहण करू नये.
१३ } पूजा समाप्त झाल्यावरच तिर्थ प्रसाद ग्रहण करावा.
१४ } देवाच्या गाभाऱ्यात तिर्थ घेऊ नये
१५ } तिर्थ घेताना ते जमिनीवर सांडू नये.
१६ } तिर्थ प्रसाद ओलांडून जाऊ नये.
१७ } तिर्थ घेताना :------------
|| अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं |
|| दत्तपदोदकं तीर्थं जठरे धारयाम्याहं ||
|| हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे.
१८ } तिर्थ घेताना :------------
|| प्रथमं कायाशूध्यर्थ |
|| द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात' ||
|| असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्राश्न करतात. वरील विधी
|| निषेधाचा अंगीकार करून गुरुतीर्थ ग्रहण केल्यास शरीर
|| शुद्धी, धर्मसाधन व मोक्षप्राप्ती होते
000000
No comments:
Post a Comment