Sunday, June 26, 2022

*सद्गुरूंचे महत्व* -

 ||श्रीराम समर्थ ||


-:- *सद्गुरू एक तेज आहे.* सद्गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्या कुठे पळून जातो.

-:- *सद्गुरू म्हणजे एक असा मृदंग* आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते. 

-:- *सद्गुरू म्हणजे असे ज्ञान* की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 

-:- *सद्गुरू ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 

-: *सद्गुरू ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.

-:- *सद्गुरू म्हणजे असा सत् चित् आनंद आहे* जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 

-:- *सद्गुरू म्हणजे एक बासरी* आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.

-:- *सद्गुरू म्हणजे केवळ अमृतच*. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 

-:- *सद्गुरू म्हणजे एक अशी कृपाच* असते; जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.

-:- *सद्गुरू कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे* आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

-:- *सद्गुरू म्हणजे एक प्रसाद आहे*. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाच उरत नाही.

🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...