Sunday, June 26, 2022

*संघटना का वाढत नाही....?*

 *प्रत्येकाने यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार करावा*_

*1.* तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.
*2.* वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
*3.* चळवळीबाबत चिंता आणि तळमळध जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.
*4.* सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
*5.* सांघिक भावनेचा अभाव. 
*6.* वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
*7.* संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानणे.
*8.* स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.
*9.* जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
*10.* मानापमानामध्ये झुरणे.
*11.* जबाबदारी स्वीकारायला पुढे न येणे.
*12.* सुसंवादाचा अभाव.
*13.* युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द झाल्यावर लढण्याच्या गप्पा मारणे.
*14.* कामशूर कमी आणि बातशूर जास्त.
*15.* बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.
*16.* काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः 
जबाबदारी न स्वीकारणे.
*17.* कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.
*18.* स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे...
*19.* नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
*20.* सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
*21.* दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.
*22.* एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे. 
*23.* आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
*24.* आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
*25.* संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
      🙏 🙏🙏🙏 🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...