१०३४ बिंब राजाचे सैनिक जे अग्रस्थानी होते त्यांनी कोकणपट्टी काबीज केली आणि तयार एक वेगळे पर्व, त्यावेळी सुद्धा राजेशाही होती पण पाण्यातून दळणवळणाची हवी तेवढी साधने न्हवती, त्यामुळे होणाऱ्या लढाया जमिनीवर व्हायच्या. मुंबई, उपनगर मुंबई, नवी मुंबई, ठाणे हे ठाण्यावरुन भिवंडीच्या पुढे असलेल्या माहुली किल्ल्यावर ज्याची पकड तो मुंबईचा सरताज असे समजले जायचे. पालघर मधील माहीम म्हणजे त्यावेळी त्याभागाची राजधानी. मी जिथे राहतो म्हणजे घाटला गाव, हे चेंबूरमध्ये येते. चेंबूरचे मूळचे नाव म्हणजे चेहुल. चेहुल, देवनार हि त्यावेळची वतने. (बखरीत उल्लेख आहे त्यावरुन). म्हात्रे, पाटील हे त्यावेळचे सरदार मैदाने गाजवत. हिच परिस्थिती राजा हिंदु असो किंवा यवन जसे ज्याचे राज्य तसे त्या वतनाचे करसाठे. मुळात व्यापारासाठी कोकणपट्टी उत्तम असल्याचे १४०९ साली त्याची बांधणी केली गेली. अलिबाग मुरुडमधील जंजिरा किल्याचे बंदराचे म्हणजे जसे आता खंदेरी आहे तसेच रामा कोळी यांनी वसविले. यवनी राज्यात कोळी व त्याच्या सर्व साथीदारांना दारूने झिंगवुन मारुन टाकुन किल्ला हस्तगत केला सोबत जंजिरा किल्ला उत्तमरीत्या बांधला. शिवाजी महाराजांच्या काळात मुंबई, अलिबाग, दापोली, मालवण यांना प्राधान्य दिले गेले. सायनचा किल्ला, वसईचा किल्ला, वांद्र्याचा किल्ला, पालघर, डहाणू, अलिबाग, मुरुड, दापोली, मालवण येथील समुद्रात किल्ले वजा टोलभाग तयार झाला. व्यापार येथून सुरू झाला आणी मुंबईत इतरांची येण्याची सुरुवात झाली. मुंबईपासून रत्नागिरी, अलिबाग, गोवा, कर्नाटक, गुजरात, पंजाब, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका येथे जाणे सहज शक्य झाले. आगरी कोळी हे पहिल्यापासून समुद्रावर अवलंबुन असल्याने मासे मीठ मिळवायला लागले. दोन्ही गोष्टी आजही किमतीत मागे पुढे होतात. गांधींनी केलेला मिठाचा सत्याग्रह मिठाची किंमत कमी करुन गेला, दोन चमचे साखर एक कप चहा बनवते तर चिमूटभर मीठ 5 ते 6 जणांच्या जेवणाला आस्वाद आणते. स्वातंत्र भारतासाठी कितीतरी कोळ्यांनी ब्रिटिशांना मारुन भरसमुद्रात दगड बांधुन टाकले होते तर किती तरी जमिनीत गाडले होते. आपल्या नादाला ना ब्रिटिश लागले न पोर्तुगीज. भारत स्वतंत्र झाला. भारत घडवायचा म्हणुन मुंबई हि बाजारपेठ पुर्ण खुली झाली. तिला हवे तसे हव्या त्या मार्गाने येणाऱ्या प्रत्येकाने लुटले. मिलकामगार मुंबईचा ज्याने भारताला कपडा दिला आज तोच नागडा आणि जागा मात्र बिल्डरांच्या घश्यात. मोठी मोठी धान्य कोठारे मुंबईत पण भुमीपुत्र बोंबलाची शाख अन भाताच्या पेजवर राहिला. सगळे आपले आपण सगळ्यांचे असे मोठ्ठ दिल दाखवुन स्वतःला लुटुन दिले. डोलीला म्हावर लागलं कि या मित्राला दे त्या सायबाला दे. स्वातंत्र्य मिळाले म्हणून काँग्रेसचे झेंडे, मराठीचा कैवारी म्हणुन शिवसेनेचे झेंडे, गाव सुधरेल म्हणुन राष्ट्रवादी आणी मोदीच्या नावाने बिजेपीचे झेंडे, उत्तम भाषण म्हणुन मनसेचे झेंडे घेत आता आपण पुढे जातोय. पण आपल्या मागुन येणार मारवाडी आपल्या दारुच्या बाटलीवर एका दुकानाचे दहा दुकाने करताना नाय दिसला, हेच गुजराती आपल्या सोन्यावर कर्ज देत पेढ्याची दुकाने करताना नाय दिसला, पंजाबचा शेतकरी बारचा हॉटेलचा मालक होताना नाय दिसला, लुंगी घालुन वडे इडली विकणारा अण्णा उडपीचा मालक होताना नाय दिसला. कारण हे राजकारणाचे भाग न्हवते तर वापर करुन पुढे कसे जायचे ह्या विचारात होते. ईडलीवाला अण्णा इडलीविकताना राजकारणी भाषा करताना दिसला नाही पण मराठी माणुस दुकान बंद करताना दिसला. असो मुंबईत भय्ये, गुजराती, मारवाडी, पंजाबी, मद्रासी निवडुन येतात कारण यांना माहीत आहे मराठी माणुस राजकारण करतो पण उत्पादन मिळवण्यात कमजोर आहे. तो गरीब असेल पण त्याचा नेता असेल. हेच नेते आपण पैस्यांनी विकत घेऊ आणि यांचा वापर करू जसे भिवंडी उरण मध्ये दिसले. त्यामुळे राजकारणाच्या नाही समाजाला उत्पादनाचे साधन बनवु, जी ज्याची गरज तशी सुविधा तयार करू. बोलुन नाही तर मनातुन आगरीकोळी बनु. बघा मग मुंबईतच नाही तर सगळ्या ठिकाणी आपणच असु. जसे आधी होतो तसेच आताही होऊ. बोलुन नको करुन दाखवू.

No comments:
Post a Comment