Sunday, June 26, 2022

बालयोगी ही संज्ञा का..?

बालयोगी श्री सदानंद महाराज जन्मतःच स्वरूप ज्ञानी आहेत. त्यांच्या जन्मानंतर माता जेव्हा अभक्ष भक्षण करी तेव्हा हा बालक दुध पित नसे, वारंवार उलटी करे. पण ज्या दिवशी माता सात्त्विक आहार करी तेव्हा आनंदाने स्तनपान करे. माता समजली हा संस्कार शुध्द, पवित्र आत्म्याचा. 


बाळ सदानंद जसे दिसेंदिस वाढू लागले तसे त्यांची वर्तणूक स्पष्ट दिसू लागली. शाकाहारी, संतुष्ट वृत्ती. लंगोटीविण वस्त्र न नेसे. मृदु स्वभाव कोणा न दुखावे, नित्य हसतमुख चेहरा. केस कर्तन न आवडे. निःसंग अभोगी वैराग्य वृत्ती. भजन गाणे अतिशय आवडे. बोलणे मोजके नेमस्त वाचा, वायुसम वेग चालण्याचा. राम मांदिरी एकांति जप, ध्यान करे. जन्मयोग्याचे लक्षण स्पष्ट होते. 

असे हे बालयोगी श्री सदानंद महाराज अवघ्या १२ वर्षाच्या कोवळ्या वयात करोडो रुपयांच्या संपत्तीचा त्याग करून, आई-वडिलांना बरोबर घेऊन तुंगारेश्वरच्या घनदाट अरण्यात १९७१ साली वास्तव्यास आले. असंख्य लोकांना त्यांनी परमार्थाची वाट दाखवली, कित्येकांना वनौषधीद्वारे असाध्य रोगातून बरे केले. प्रसिध्दी परामुख वृत्ती असलेले, एक लंगोटी हेच वस्त्र असलेले बालयोगी श्री सदानंद महाराज आज वसई येथील तुंगारेश्वर पर्वतावर राहून अविरत जनोध्दारचे कार्य करत आहेत.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...