Sunday, June 26, 2022

 आज कुळ कायद्याचे जनक, आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा!!! चला तर त्यांच्या जयंती निमित्त नारायण नागू पाटील साहेबांच्या नेतृत्वा खाली लढल्या गेलेल्या कुळ कायद्याच्या आंदोलनाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप टाकूयात...


“कुळ कायद्याचे जनक” श्री नारायण नागू पाटील यांचे कसेल त्याची जमिनीचा थोडक्यात इतिहास -

आगरीकोळी समाजाचे सुपुत्र श्री नारायण नागू पाटील हे मुळचे अलिबाग तालुक्यातील चरी येथील. त्यांनी १९३२ साली दांडग्या सावकारांविरुद्ध “खोती विरुद्ध आंदोलनाला” सुरुवात केली जे १९३९ पर्यंत सतत सात वर्ष १९३९ पर्यंत सुरु होता. स्थानिक भूमिपुत्र असलेला आगरी-कोळी आणि इतर बहुजन शेतकरी समाजाचे सुरु असलेले शोषण त्यांना पाहवले नाही. त्यावेळी जवळ जवळ सर्वच जमिनीचे मालक हे सावकार होते किंवा शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या जमिनी ह्या सावकाराकडे गहाण पडून सावकार किंवा खोत त्यांचे मालक झाल्यात जमा होते.

शेतकरी वर्षभर जमिनी कसत, आणि सावकाराने फेकलेल्या तुकड्यांवर त्यांना जगावे लागे. त्यांच्या श्रमाचे योग्य मोल हि त्यांना मिळत नव्हते. एकीकडे इंग्रजी सरकार आणि दुसरीकडे स्वतःच्याच देशातील सावकारांनी चालवले त्यांचे हाल नारायण नागू पाटील या चाळीशीच्या आसपास च्या तरुणाला पाहवले नाही. त्यांनी सावकारांविरुद्ध यल्गार उभारला आणि “खोती विरुद्ध” आंदोलना सुरुवात झाली आणि त्यांना त्यात साथ मिळाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची.

"जमिनीचा मालकी हक्क मिळत नसेल तर जमीन कसणार नाही”, असा नारा दिला गेला, जवळ जवळ ७ वर्ष जमिनी कसण्याविना ठेवल्या गेल्या, ज्या शेतीमुळे त्यांचे दोन वेळेचे अर्धवट का होईना पोट सुरु होते, ती शेती बंद ठेवली गेली होती, शेतकरी जंगलातील पाला पाचोळा खाऊन जगत होती, पण आंदोलन सुरु होते, जागतिक पातळीवर हि इतका दीर्घ वेळ सुरु असलेल्या या संपाची दखल घेतली गेली होती. सरकार कडे सातत्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती. आणि त्यातुनच स्वातंत्र्यानंतर “कसेल त्याची जमीन” म्हणजेच “कुळ कायद्याचा” जन्म झाला आणि कसणारा शेतकरी त्या जमिनींचा मालक झाला आणि हे घडवून आणणारा आपल्या समाजाचा माणूस होता याचा आपल्या सार्थ अभिमान असायला हवा. कुळ कायदा नसता तर आपल्याला १२.५% योजनेचा लाभ सुद्धा आपल्याला मिळाला नसता.

त्यामुळे कुळकायदा आणून आम्हा कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनविणाऱ्या आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब यांना त्यांच्या जयंती निमित्त समस्त भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मानाचा मुजरा!!!

- टीम द ग्रेट भूमिपुत्र

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...