Wednesday, June 29, 2022

आपलं आरोग्य आपल्या हातात..


१. आपण 20 रुपये किलो टोमॅटो घेऊन त्याची चटणी खाऊ शकतो, पण ते न करता आप ण 250 रुपये किलो चे टोमॅटो souce खातो आणि ते ही सहा महिने आधी बनवलेले शिळं.

२. घरी आपण आज सकाळी भरलेलं पाणी दुसऱ्यादिवशी पीत नाही, पण 3 महिने जुन्या बॉटल मधील पाणी 20 रुपये देऊन पितो.

३. 50 रु लिटर दुध आपल्याला महाग वाटत, पण 70रु लिटर च कोल्ड ड्रिंक तेही 2ते 3 महिने जुणं आपण पितो.

४. आपल्या शरीराला ताकद देणारे, 200 रु पाव मिळणारे ड्राय फ्रुट्स आपल्याला महाग वाटतात, पण 400 रु ला मिळणार मैद्यापासून बनलेला पिझ्झा आवडीने खातो.

५. बहुतेक जण सकाळी घरात शिजवलेलं अन्न संध्याकाळी खात नाही, पण काही कंपनी चे सहा सहा महिने जुनं असलेलं खाद्यपदार्थ आपण खातो, जेव्हा की आपल्याला माहीत असते हे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ही मिक्स करतात जे आपल्या आरोग्यास घातक असतात.

६. ह्या पाच महिन्यांच्या lockdown च्या काळात आपल्याला चांगल समझलेलं आहे की बाहेरच्या जंक फूड, किंवा हॉटेलमधील खण्याशिवाय आपण छान जगू शकतो , घरातील शुद्ध , सकस अन्न खाऊ शकतो ज्याने आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.
  
आठवून बघा मागच्या पाच महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा आजारी पडलात. साधी सर्दी, खोकला तरी झाला का? 

काळजी घ्या, सुरक्षित रहा

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...