बसने किंवा कारने दुरचा प्रवास करताना खूप जणांना त्रास होतो. मळमळ होते, उल्टी देखील होते. बहुतांश वेळा स्त्रिया तर अशा प्रवासाला जाताना पाणी पीतच नाहीत. त्यामुळे यूरिन इन्फेक्शन होण्याची भीती असते. काही वयस्कर लोकांना तर यूरीन अडकण्याचा देखील त्रास होतो.
तेव्हा अंगठा, मधलं बोट आणि अनामिका(ring finger) ह्यांची टोकं एकमेकांना लावा. बोटं दाबू नका, नुसता स्पर्श होईल अशी जुळवा. हे दोन्ही हातांनी करा. कमीत कमी लगातार 20 मिंटं अशा स्थितीत रहा. जास्तीत जास्त 45 मिंटं. जर काही वेळाने त्रासाची सुरुवात झाली तर परत ही मुद्रा करा.
बोटांच्या ह्या रचनेला अपान मुद्रा असं म्हणतात. ही मुद्रा केल्यावर प्रवासात होत असलेली मळमळ थांबते आणि मग उल्टीचा त्रास होत नाही.
ही मुद्रा 45 मिंटं केली की यूरीन मधले पल्स सेल्स नष्ट होतात आणि यूरीन इन्फेक्शन आटोक्यात येतं आणि अडकलेल्या यूरीनचा त्रास संपतो. विकोपाचं यूरीन इन्फेक्शन झालं असेल तर दिवसातून 3 वेळा प्रत्येकी 45 मिंटं ही मुद्रा करा. डॉक्टरने दिलेलं औषध पण चालू ठेवा.
मुद्रा दोन्ही हातांनी करायची आहे.
जीवनअमृत आयुर्वेद
विकास भागवत
No comments:
Post a Comment