Wednesday, June 29, 2022

जागतीक ह्रदय दिन

 आज जागतीक ह्रदय दिन


ह्रदय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

चालाल तर वाचाल..वाचाल तर जगाल
जगाल तर काही कराल... काही केलं तरच लक्षांत रहाल
 👏👏👏👏👏👏👏👏👏
     भारतात प्रत्येक दहा सेकंदाला एक या प्रमाणाने ह्रदयाच्या माणसाचा झटक्याने मृत्यू होतो आहे.
     आणि जगात सध्या पन्नास कोटी लोक ह्रदय रोगाने आजारी आहेत व जवळपास सर्वच ह्रदय रोगाच्या दिशेने वाटचाल करत आहेत असे म्हटले तर वावगे ठरनार नाही.
   चमचमीत *झणझणीत *चरमरीत भरपेट भोजन करण्याची लतच जगाला लागली आहे. आणि 
 कसरत कमी झाली आहे. जगाची लोकसंख्या आठशे कोटींचा पल्ला गाठत असली तरी प्रत्यक्षात अंग मेहनतीचे काम करनारे लोक झपाट्याने कमी होत आहेत. 
 Working hand 
  ज्या देशात जास्त असण्यापेक्षा ते   किती प्रत्यक्षात working आहेत हे महत्वाचे आहे.
    खाणं वाढलं पण जिरणं कमी झालं आहे.
चंगळवाद  व अपेक्षाभंग आर्थिक ओढाताण अलिकडे वाढलेली सामाजिक असुरक्षितता धुसर भविष्य प्रत्येक व्यवसायात व नोकरीत आलेली अस्थिरता बेभरवसा 
यामुळे घराघरात वाढलेला प्रचंड ताणतणाव ह्रदयरोगाला पुरक झालेला आहे.

   कोरोना या जागतिक संकटांने मानवाच्या एकुण संकटात व समस्यांत प्रचंड वाढ झालेली आहे.
   ह्रदयरोग आणी अपघात हे जीवनावर अचानक घाला घालतात व घराचा असलेला मुख्य स्तंभच आधारच कोसळतो व घर सैरभैर होते. भारतिय संस्कृतीत पत्नीला घरातला आधारवड समजतच नसल्याने तिच्यात कधीच घराच्या घराला सावरता येईल अशा जबाबदा-या पेलता येईल अशी सक्षमता 
निर्माणच केली जात नसल्याने ती महिला नव-याच्या आकस्मिक एक्झिटने कोलमडून विखुरते हतबल होवुन जाते.
 ह्रदयरोग बहुतांशपणे पुरुषालाच जास्त होतो  एकुण 100 ह्रदय रूग्णापैकी  90 रूग्ण पुरुषच असतात.
       भारतिय लोकांची एक मोठी समस्या आहे ते आधिच आळा कधीच बांधत नाहीत दुरदृष्टीचा प्रचंड अभाव याच्यांत आहे. हे कायम गाफिलच राहतात याच वृत्ती मुळे भारतावर अनेक परकियांनी सतत हजारो आक्रमणे केली यांच्या घरात घुसून यांना बदडले मारले यांची घरे बळकावली यांच्या बायका पळवल्या संस्कृती नष्ट केली   हे झाले गाफिल वृत्तीमुळे. साधा प्रतिकारही ते करु शकले नाहीत किंवा कसलेही रक्षण करु शकले नाही. अक्षरश: यांची दाणादाण उडाली. १००० वर्ष गुलामीत काढली आजही हे गाफिलच आहेत. कसलाच प्रतिकार करत नाहीत सतत घाबरत आलेले आहे आणि घाबरतच असतात आणी कायम गुलामीची मानसिकता पाळून आहेत.  मला काय त्याचे या कुपमंडुक व स्वार्थीवृत्ती मुळे भारतिय नेभळट घाबरट कमकुवत बनलेले आहेत यांना परकियांनी तर लुटलेच पण जास्त लुटले भारतातल्याच आपल्याच चालू व बदमाष लोकांनी.
   भारतिय लोकांत Ischemic Heart Disease जास्त आढळून येती भारतियांचा जीन भीत्रा आहे. त्यामुळे येथील शाकाहारी लोकांत सूद्धा ह्रदयरोगाचे प्रचंड प्रमाण आहे.
भारतिय भीती बाळगतात भीती घालवण्याचा उपाय कधीच शोधत नाहीत.
 हे दुर्दैव आहे. कायम दरिद्री व गुलामीत ज्या संस्कृतीने ठेवले तिचाच अजुनही गोडवा गातात. भारतिय संस्कृती माणसांमाणसात भेदभाव करते जोडण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. 
सतत हे लोक एकमेकांचा द्वेष मत्सर व रागराग करत असतात.अनेक संतानी यांना खुप शिकवले पण हे कधीच ऐकत नाहीत येथील ग्रंथच यांना दुही व भांडणाची कटकट करण्याची  शिकवन देतात कोणत्याही परिस्थितीत भाऊ वा बंधू संपलाच पाहीजे हि दुर्योधन वृत्ती जपतात त्यामुळे भावकी फक्त खांद्यावर नेण्यासाठी आवर्जून जमा होते पण सामाजिक उत्कर्षासाठी मात्र पळुन जाते.

   या एकुण वृत्ती मुळे या देशाची प्रगती खुंटलेली आहे. सतत च्या कलहा मुळे समाज मागास राहीला आहे व आर्थिक उन्नती करु शकला नाही. आणि ज्यांनी चलाकीने समाजाला लुटले त्यांनी फुकटचे अनाआवशक खाल्ले  त्यामुळे या दोघांना अतिरेकामुळेच ह्रदय रोग बोकांडी बसला आहे. भारतातील 40 वय व त्या वरील वय  असलेला प्रत्येक व्यक्ती ह्रदय रोगाचा शिकारी झाला आहे. हे नक्की वयाच्या पंचविसाव्या वर्षापासूनच रक्तवाहीन्यात ब्लाॅकेजस् व्हायला सूरवात होत आहे. अलिकडे तिशीतल्या तरूणांना ही ह्रदय रोग दिसून येत आहे.
  अनेक वाईट सवयी धूम्रपान तेलाचे जेवणातील अतिरेकी प्रमाणामुळे उच्चरक्तदाब व मधुमेह 50% लोकांना होत आहे आणि हेच ह्रदयारोगाला पुरक आहेत .माईल्ड ॲटॅक येवून गेलेलेही खुप रुग्ण भारतात आहेत.
 असो. हे होणारच आहे तेव्हा सर्वांनी ह्रदय रोगास बळी पडु नये यासाठी सतत जागरुक रहावे नियमित शारिरीक तपासनी करावी रक्तदाब 120/80 असाच कायम नियंत्रणात ठेवावा . रक्तातील triglycerides  चे प्रमाण नियंत्रणांत ठेवावे. ते 5.5 च्या पुढे नसले पाहीजे.   आहार संतुलीत असावा. वाईट सवयीचा त्याग करावा रोज न चुकता 40 मिनीटे चालावेच.
  ताणतणावात न राहता आनंदी हसतखेळत राहण्या प्रयत्न करावा दिवसातून एकदातरी खळखळुन हसावे.
 रडके थोबाड कायम ठेवु नये.  आत्मप्रौढी व दुस-याची निंदा करणे थांबवावे माझा तो बबड्या आणि दुस-याचे ते कार्टे करता करता आपलं कार्ट केव्हा दिवटं होईल याचा पत्ताही लागणार नाही.

   मी कसा चांगला किंवा चांगला आहे हे जो सतत सांगण्याचा खटाटोप करत असतो अशा हरामखोर लोकांपासन दुर रहावे मग तो सख्खा नातेवाईक असला तरीही त्याला उंब-याबाहेरच ठेवावे.
कोणत्याही परिस्थितीत
   मनाची घराची व एकुण दिवसाची शांती बिघडवना-यांना जीवनातुन डिलीट करुन टाका.
    आता सर्व आजारांवर अगदी खात्रीशीर व उत्तम उपचार उपलब्ध आहेत बूवा बाबा. व आपलीच संस्कृती ग्रेट या भ्रामक विश्वात वावरु नका.
 जे चागंलं आहे ते अंगिकारलेच.
 पाहीजे. 
 आधुनिक युगातील सर्व वैज्ञानिक शोधांचा साधनांचा आरोग्य सुविधाचा लाभ घ्या.
  रोग होण्या आधिच म्हणजे ह्रदय विकाराचा झटका येण्या आधिच उपचार करा. सगळी यंत्रणा तयार आहे.
 व ह्रदयाचा झटका येण्याचा टाळा.
 *इलेक्ट्रीक करंट आणि हार्ट ॲटॅक झटका कधीच माफ करत नाही. 
दहावा करूनच शांत होतो.
     *ज्यांना रक्तदाब आहे ते ह्रदय रोगाचे रुग्ण 100% आहेतच आणि जे मधुमेही आहे ते तर 1000% ह्रदय रोगी आहेत. आणि जे तंबाखु गुटखा व स्मोकिंग करतात ते  
1 लाख टक्के हार्ट ॲटॅकच्या जवळ आहेत हे समजा.
 आज जागतीक हार्ट दिन आहे
  आपल्या सर्वांचे ह्रदय अत्यंत सक्षम व कार्यक्षम राहो 100 वर्षे ते धडकत राहो हि सदीच्छा.
तुम जियो हजारो साल आपका दिल धडके सालोसाल
 और आप रहे मालामाल.

   एक म्हण होती वाचाल तर जगाल
   पण मी म्हणतो..चालाल तरच वाचाल...नसता भींतीवर लटकाल.
जय हिंद !!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...