Wednesday, June 29, 2022

जाणून घ्या तुमच्या पोटऱ्या का दुखतात?

पोटऱ्या दुखण्याची अनेक कारणे आहेत, ही कारणे जाणून घेऊयात.

अनेकदा धावपळ केल्याने, जास्त चालल्याने किंवा व्यायामामुळे पोटऱ्या दुखण्याची समस्या सर्वसामान्य आहे. मात्र अनेकदा जास्त शारीरिक हालचाल केली नाही तरी पोटऱ्या दुखतात आणि याला इतर गोष्टी कारणीभूत असतात. पोटऱ्या दुखण्याची काय काय कारणे आहेत ते जाणून घेऊयात

स्नायूंमध्ये क्रॅम्प

स्नायूंमध्ये येणारा क्रॅम्प हा अनेकदा तात्पुरता असतो, मात्र त्यावेळी होणाऱ्या वेदना तीव्र असतात. डिहायड्रेशन, घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स कमी होणं, पायांची स्ट्रेचिंग न होणं, भरपूर वेळ शारीरिक कार्य आणि स्नायू कमकुवत असल्यास स्नायूंमध्ये क्रॅम्प येतो.

स्नायूंवर ताण

पोटऱ्याच्या स्नायूंमधील तंतूवर (फायबर) परिणाम झाल्यास स्नायूंवर ताण येतो. स्नायूंवर ताण आल्यास वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. मात्र बहुतेक लोकांमध्ये पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र अशी वेदना जाणवते.

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा

पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्या किंवा त्यात अडथळा निर्माण झाल्यास पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. याला आर्टिरिअल क्लॉडिकेशन (arterial claudication) असं म्हणतात. ही समस्या असलेला व्यक्ती बसलेला असल्यास त्याच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होत नाहीत, मात्र जेव्हा हा व्यक्ती चालतो तेव्हा त्याच्या पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होतात कारण पायांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नसतो.

नसांवर दाब पडणे

पायांकडे जाणाऱ्या नसांवर दाब पडल्यासदेखील पायांच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होतात. याला न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन (Neurogenic claudication) म्हणतात. स्पिनल स्टेनोसिस (spinal stenosis) मुळे न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन होतं. स्पिनल स्टेनोसिसमध्ये पाठीच्या मणक्यातील हाडांमधील जागा कमी होते आणि त्यामुळे नसांवर दाब पडतो. नसांवर दाब पडल्टयाने चालताना, भरपूर वेळ उभं राहिल्याने, कमरेतून पुढे झुकल्याने पोटऱ्यांमध्ये वेदना जाणवतात. फक्त पोटऱ्यास नव्हे तर मांडी, कंबर आणि नितंबही दुखू लागतं. तसंच व्यक्ती आराम करत असला तरी त्याच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होत राहतात.

पोटऱ्यांचे स्नायू आणि टाचांच्या हाडांना जोडणाऱ्या भागावर ताण

अचिलिस टेंडन हा कठीण फायबरयुक्त असा भाग पोटऱ्यांचे स्नायू आणि पायांच्या टाचांवरील हाडाला जोडतो. जर पोटऱ्यांचे स्नायू घट्ट असतील तर या भागावर जास्त दाब पडतो आणि पोटऱ्यांमध्ये वेदना होतात, याला अचिलिस टेंडिटायटिस (Achilles tendinitis) असं म्हणतात. जर नव्याने व्यायाम सुरू केला असेल किंवा एखादा व्यायाम वारंवार केला जात असेल, तर ही समस्या निर्माण होऊ शकते. पाय स्ट्रेच केल्याने या समस्येची लक्षणं कमी होतात.

शारीरिक हालचालींमुळेच नव्हे तर पोटऱ्या दुखणे हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षणदेखील असू शकतं.

व्हेरिकोज व्हेन्स

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायातील नसा मोठ्या होतात आणि त्या त्वेचवर एखाद्या दोरीप्रमाणे दिसतात. अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या झडपांमधल्या बिघाडामुळे ही समस्या उद्भवते. वाढतं वय, गरोदरपणा, लठ्ठपणा, हार्मोन्समध्ये बदल, शारीरिक हालचालीचा अभाव व्हेरिकोज व्हेन्सला कारणीभूत ठरतात. व्हेरिकोज व्हेन्स पायांमध्येच आढळून येतात, यामुळे पायांमध्ये वेदना होतात.

डिप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT)

पायातील नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होता. त्यामुळे पायातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो, पायांमध्ये तीव्र वेदना होतात. जास्त वेळ बसल्याने, उच्च रक्तदाब किंवा ब्लड क्लॉटिंग डिसॉर्डर (रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या) असल्यास हा आजार होतो. उभं राहिल्याने किंवा चालताना पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणं हे डिप व्हेन थ्रोम्बोसिसचं लक्षण आहे. पायाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आहे, तो भाग लाल होतो किंवा सूजतो.

कम्पार्टमेंट सिंड्रोम

कम्पार्टमेंट सिंड्रोममध्ये पोटऱ्यांचे स्नायू किंवा दोन्ही पायांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. पायांना एखादा अपघात किंवा गंभीर दुखापत झाल्यास कम्पार्टमेंट सिंड्रोम बळावतो. शरीरातील एखाद्या टिश्यूच्या समूहाखालील अति रक्त किंवा द्रव पदार्थाचं नीट प्रसरण होत नसल्यास नसा आणि रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि त्यामुळे तीव्र वेदना, सूज, मुंग्या येणे, तो भाग संवेदनहिन होणे अशी लक्षणं दिसतात.

डायबेटिक न्यूरोपॅथी

मधुमेहामुळे नसांना हानी पोहोचल्यास त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढत असल्यास शरीरातील नसांना हानी पोहोचू शकते आणि याची सुरुवात हातापायांपासून होते आणि यामुळे पोटऱ्यांच्या स्नायूंममध्ये वेदना होतात.

अधिक काळ उभं राहिल्यानं, चालल्यानंच पोटऱ्या दुखतात असं नाही, तर त्यामागे अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे पोटऱ्या दुखल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...