Wednesday, June 29, 2022

टोमॅटो बद्दल माहिती

 टोमॅटो बद्दल माहिती घेणार आहोत......

🍅फास्टफूडच्या अतिरेकाचे परिणाम एव्हाना सर्वत्र दिसू लागले आहेत. त्यामुळेच लोक आपल्या आरोग्याबाबत अलीकडच्या काळात अधिक जागरूक असल्याचे दिसू लागले आहे. आहारात फास्टफूडच्या समावेश, बैठी जीवनशैली यामुळे या संबंधीचे आजारही वाढलेले दिसतात.
🍅 पूर्वी पन्नाशीनंतर होणारे हे आजार आता पंचविशीतच पाहायला मिळू लागले आहेत. रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे ही धोक्याची सूचना मांडली जाते किंवा वाढलेले कोलेस्टेरॉल हे हृदयरोगाच्या संकेत देत असते. त्यामुळे हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यासाठी आपण नैसर्गिक भाज्यांचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरतील.  यामध्ये टोमॅटो अधिक लाभदायक असल्याचे समोर आले आहे. 
🍅 हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लायकोपीन हा घटक महत्त्वाचा असतो आणि हा घटक टोमॅटो मध्ये आढळतो. अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनात हा निष्कर्ष समोर आलेला आहे. लायकोपीन हे आतड्याद्वारे  शोषले जाते
🍅 ते शरीरातील चरबी मध्ये मिसळण्यात सक्षम असते.यामध्ये ऑक्सिकरण रोधक असतात ते शरीराच्या पेशींना आणि गुणसूत्रांना  हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सला  रोखतात. 
🍅फ्री रॅडिकल्स हे शरीरातील रक्तप्रवाह अनियमित करून अडचण निर्माण करतात. ते कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतात.
🍅 रक्तात कोलेस्टेरॉल वाढले  तर रक्तवाहिन्यांच्या आतील स्तरावर जमा होते आणि रक्तप्रवाह अनियमित होतो त्यामुळे हृदयरोगाच्या किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. 
🍅हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम टोमॅटोमधील घटक करतात. म्हणूनच अतिशय स्वस्तात मिळणारे हे टोमॅटो आपल्याला आहारात नियमितपणे समाविष्ट करावेत.
🍅कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्ता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे.
🍅 टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर,  आम्ल., गुणात्मक, रुचकर,  लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. 
🍅टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.
🍅आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
🍅टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कार्बोदिकाचे  प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
🍅अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
🍅टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. 
🍅 रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
 🍅तसेच ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
🍅टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
❌सावधानता
टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो अतिप्रमाणात सेवन करू नये.

-डॉ. सौ. गौरी बाचल 
 होमिओपॅथिक कन्सल्टंट 
 सोलापूर

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...