Sunday, June 26, 2022

*त्वचा रोग* *सोरायसिस* *कोड/ श्वेतत्वचा*

आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही.

*सोरायसिस* हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक्षणे असलेल्या त्वचा विकार सोरायसिस म्हणून ओळखला जातो. ‘सोरायसिस’ हा आजार प्रामुख्याने त्वचा निर्मितीशी संबंधित आजार आहे. सोरायसिस हा जंतुसंसर्गामुळे नसल्याने हा आजार दुसऱ्या व्यक्तीला केवळ स्पर्शाने प्रसारित होत नाही.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...