*कारणे -----*
पोट साफ नसणे, पोटात गँस तयार होणे, शरीरात आम्लपित्त राहणे, चमक भरणे, वातविकार होणे. इ.
प्रथम वरील कारणे कमी करा. तरच लवकर लाभ होईल.
*उपाय -----*
१) जायफळ पाण्यात उगाळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी चोळून लावा.
२) आल्याचा रस एक चमचा + मध एक चमचा मिक्स करुन दिवसातून २ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) सावकाश व्यायाम / योगासने रोज करा.
उदा. सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, ताडासन, भुजंगासन, धनुरासन, शलभासन, वक्रासन, सुप्तवज्रासन, शवासन. इ.
७) कपालभाती प्राणायाम आवश्य करा.
८) वेदना होणा-या भागाला प्रथम तिळाचे तेल लावा. नंतर श्वास रोखून माँलिश करा. श्वास सोडल्यावर थांबा. असे १० /१५ वेळा करत रहा. हा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच. मात्र पोट रिकामे असताना करा.
९) विश्रांती घ्या. आराम करा.
१०) अँक्युप्रेशर करा.
११) मेथी दाणे सकाळसंध्याकाळ लहान अर्धा चमचा पाण्यातून घ्या. मेथी पालेभाजी जरूर खा.
१२) पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यातून एक लहान चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एक पेला दुध + एक चमचा गाईचे तुप + थोडे गुळ / साखर एकत्र करून घेणे.
१३) तांब्याच्या भांड्यातीलच पाणी पिणे.
१४) हालकाच आहार घेणे.
१५) एकाचवेळी सर्व उपाय करु नका.
*आरोग्य संदेश* 
श्वास रोखून हळूवार माँलिश करा,
पाठदुखीला उरणार नाही थारा.
[हभप श्री.मंगेश भोसले योगशिक्षक]
८८०६८९८७४५ पुढे पाठवा
No comments:
Post a Comment