Thursday, June 30, 2022

⚜️प्रदक्षिणा

 मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया जी करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो. पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत.


🚩देवाला भावपुर्ण नमस्कार केलेला आहे. डोळेभरून त्याचे लोभस रूप मनात साठवले आहे.
🚩 आता प्रदक्षिणा मारायची……म्हणजे काय करायचे……?
🚩 सगळे करतात म्हणून करायचे का? 
 कारण बर्‍याच जणांच्या तोंडून ऐकलेला शब्द….
🚩 चला चकरा मारू…….गोल फीरू……
🚩 पण प्रदक्षिणेचा अर्थ नीट समजुन घेतला तर…
🚩 मंदिरात जेव्हा पूजाअर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहातो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मूर्तीच्या कक्षेतील हिच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवा भोवती प्रदक्षिणा घातली जाते. पण प्रत्येक देवतेला वाटेल तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी ठराविक प्रदक्षिणाच घालाव्या लागतात.

🚩 प्रदक्षिणा म्हणजे देवाला नीट न्याहाळणे. चहुबाजुंनी त्याला बघत बघत मी माझी पावलं टाकणे.
🚩आपण प्रदक्षिणा करतांना एक मंत्र म्हणतो.,
🚩 ॥ यानि कानिच पापानि, जन्मांतर कृतानीच,नतानी तानी विनश्यन्तु प्रदक्षिणे पदेपदे.॥
🚩 पादुकापुजन झाल्यावर ह्या मंत्रासहित स्वत:भोवती आपण तीन प्रदक्षिणा हा मंत्र म्हणत घालतो त्यामुळे हा मंत्र परिचयाचाच आहे.
🚩 ह्याचा अर्थ ह्या किंवा त्या कारणाने माझ्याकडुन, कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील, त्या प्रत्येक चुकांचा/ पापांचा, ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणार्‍या प्रत्येक पावला गणिक, नाश होऊ दे.
🚩 म्हणुन स्वत:भोवतीची प्रदक्षिणा अजुनच सावकाश घालायची असते.
🚩 माझा देव मधे बसलेला आहे.  तो माझ्या कडे बघतो आहे. मीहि त्याच्या कडे प्रेमाने पहात हि प्रदक्षिणा पुर्ण करतो आहे...
🚩हा शुध्द भाव जागृत असायला हवा. तरच त्या प्रदक्षिणेच्या कृतीला अर्थ आहे. नाहितर फक्त कवायतीच व्हायच्या.
” जर पुजा करतांना, मंत्र म्हणतांना भाव नसेल तर आपण करतो त्या फक्त कवायतीच.”

🚩 प्रदक्षिणेचा अर्थ विस्तृत पणे बघितला तर फक्त मंदिरात जाऊनच प्रदक्षिणा करायला पाहिजे असे नाही.
त्या ईश्वराचे चिंतन, मनन, त्याला समजुन घेण्याचा प्रयास म्हणजेहि प्रदक्षिणाच. 
सगुण…. सहगुण ईक्षण. मग त्यासाठी मला मंदिरातच जायला हवे असे नाही…..
कुठेहि कधीही कितीतरी वेळ मी अशा पध्दतीने प्रदक्षिणा करू शकतो.
निरालंब ईक्षण……
🚩म्हणजे माझ्या वर्तमानाच्या परिस्थितीचा मनापासून स्विकार करून करत राहिलेले कर्म. 
स्वत:शी, माझ्या देवाशी प्रामाणिक राहून केलेले कर्म…..सेवा….. भक्ती…
कुणी मला चांगले म्हणावे,
माझी वाह वा करावी, म्हणुन दार्शनिक केलेली भक्ती काय उपयोगाची?
🚩 प्रत्येक क्षण फक्त त्याच्याच साठी
तन….. मन… बुध्दी…..
त्याच्याच चिंतनात.
अशीही प्रदक्षिणा………
आता प्रदक्षिणेचा भाव आणि कृती बघुयात…..

🚩⚜️🌹 1) द्विदल
🚩 आपण आता देवासमोर उभे आहोत. दोन्ही हात जोडलेले आहेत...माझे चंचल मन मी या शरीरात एकवटले आहे. आणि पुर्ण पणे तुला, तुझ्या रूपाला न्याहळतो आहे. आता आपण हळुहळु हिच भावना मनात एकवटून पुढे चाललो आहोत. 
देवाच्या उजव्या बाजूला आपण आहोत आणि शक्यतो मंदिराच्या तिन्हि बाजुंनी आपल्याला मुर्ती दिसेल अशी मंदिराची रचना असते.

🚩⚜️ 2) बध्दकरांजली
ह्या उजव्या बाजूला आपले दोन्ही हात झाकलेले म्हणजे माझ्या हातात काहितरी धरून ठेवलेल्या अवस्थेत असतील.
इथे माझा भाव देवा, मी माझे माझे जे म्हणतो पैसा, अडका, माझे पाप,माझे पुण्य, प्रारब्धाचे ओझे. हे सगळेच्या सगळे तुझ्या चरणी अर्पण करतो. तुझ्या शेतात पेरतो आहे.
हे सर्व अर्पण करता करता पाऊले पुढे पुढे जातील………
आता आपण देवाच्या मागच्या बाजूला आहोत.
तिन्हि बाजुने देव दिसतो पण इथे मला माझे मस्तक भिंतीवर टेकवायचे आहे, म्हणून हि बाजु बंद आहे.
मी जरी देवाच्या मागच्या बाजूला असलो तरी देव नेहमीच माझ्या मागे असतो… मला सांभाळण्याची……

🚩🌹 3) मस्तक स्पर्शन
🚩 माझे मस्तक मी टेकवायचे. दोन्हि हातही टेकवलेले. माझा भाव मी तुझ्या शेतात आत्ता जे पेरले.त्यातुन जे काही चांगले वाईट उगवेल ते परत सगळे तुला अर्पण करतो.
🚩 आता बघा…… माझे ते त्याला दिले……परत जे उगवले तेहि अर्पिले……आता हळूहळू पुढे येऊन मी देवाच्या डाव्या बाजूला उभा आहे.

🚩🌹 4) मुक्तकरांजली
🚩 ह्या वेळेस माझे दोन्ही हात उघडलेले देवाकडे असतील..
🚩 माझा भाव =शुध्द… निर्लेप…. आता माझ्या कडे देवा काहिच उरले नाही. आता मला फक्त आणि फक्त तुच हवा आहेस.
🚩 माझ्या जवळ तुझ्या व्यतिरिक्त आता काहिच नाही. जेव्हा भाव असतो तेव्हा अनंत पटीने माझी झोळी भरलेली असते.
कारण तो नवऐश्वर्य दाताच माझ्याकडे आहे मग उणिव ती कशाची?

🚩 प्रदक्षिणा करतांना अगदि हळुवार गती असावी. मनापासून, उत्साहाने, नियोजित वेळेत, जेवढ्या होतील तेवढ्या प्रदक्षिणा करायच्या. 
🚩 मोजण्यात लक्ष घालण्यापेक्षा, माझे ते देवाच्या चरणी अर्पण करण्यात वेळ देऊयात. अश्या प्रकारे प्रदक्षिणेतले पावित्र्य, भाव, सहजच जपला जातो.

🚩🌹 प्रदक्षिणेचे प्रकार

🚩 देव प्रदक्षिणा : षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा. मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र, नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते. याला देव प्रदक्षिणा असे म्हटले जाते. बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले, तर अशावेळी स्वत:भोवती प्रदक्षिणा घातली, तरी चालते.

🚩 मंदिर प्रदक्षिणा : मंदिरातील काही देवता दर्शनप्रधान असतात तर काही प्रदक्षिणाप्रधान असतात. देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो, त्याला मंदिरप्रदक्षिणा म्हणातात.

🚩 क्षेत्रप्रदक्षिणा: यामध्ये लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात. लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील, गावातील, शहरातील तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिर आदिंचा समावेश होतो. तर दीर्घपरिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश होतो. त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात.

🚩 नदी प्रदक्षिणा :
 नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते. नदी परिक्रमेत त्याच नदीत स्नान करणे, नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे, असे काही नियम पाळावे लागतात. नर्मदा, कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत.

🚩 वृक्ष प्रदक्षिणा : वृक्षप्रदक्षिणेत प्रामुख्याने वड, अश्वत्थ (पिंपळ), औदुंबर, तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते. तसेच काही ठिकाणी गिरी म्हणजेच पर्वत प्रदक्षिणाही केली जाते.

🚩⚜️🌹 प्रदक्षिणा घालण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावेत.
🚩 प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये. 
🚩 तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे. त्य़ाच जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी. 
🚩 प्रदक्षिणा घालाताना कुणाशीही गप्पा मारू नयेत. 
🚩 ज्यावेळी ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो, त्या देवाचं ध्यान करत राहावं. 
🚩 कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये.
🕉️🚩💎🌷💐
 साभार.....🙏


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...