Monday, May 23, 2022

देवीची स्त्रोत्र आणि त्याची फलश्रुती ....

.🕉️🕉️

 नवरात्र सुरू होत काही होत आहे. या दिवसात आपण कोणती उपासना करावी म्हणजे कोणत्या स्तोत्राचे पाठ करावे तसेच याच पाठ केल्यास आपल्या जीवनात कसा उपयोग होतो या बाबत ही पोस्ट आहे.

 दुर्गाष्टोत्तरनामशतनामस्त्रोत्र

 या स्तोत्राचे पठण केल्यास आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढीस लागते.त्यामुळे करत असलेल्या कार्यात यश मिळतेच तसेच धनधान्य, पुत्रपौत्र व मोक्ष मिळतो .

* देविकवच...
या कवचाच्या पठणाने आपल्या आयुष्यात येणारे संकटाचा सामना करण्यास मदत होते व त्या संकटाला मात करून आपले जीवन सुखकर होऊ शकते.

* देव्यथर्वशीर्ष....
याच्या पठणाने पापनाश, संकटातून मुक्ती होते.तसेच सभोवती अमावस्येला या स्तोत्राचे 108 पाठ केल्यास आपल्या आयुष्यात असलेले दीर्घकाळ आजारपणातून मुक्तता होऊन तब्येतीत सुधारणा होते.

* अर्गला स्त्रोत्र....
आपण प्रगती करत असताना दुसर्या कडून सतत अडथळा निर्माण होत असतो जर या स्तोत्राचे नियमित पाठ केल्यास आपल्या शत्रुचा निपाःत होऊन आपली प्रगती होत जाते.तसेच यश, किर्ती सुध्दा मिळतेच.आपल्याला अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी याचे नियमित पाठ केल्यास चांगला आयुष्याचा जोडीदार मिळतो. 

* कुंज्जिकास्त्रोत्र...
संपुर्ण दुर्गासप्तशती पाठाचा सार या स्त्रोत्रात आहे. देवीचा आर्शीवाद, कृपा, व्यवसायातील अडचणी या सारख्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी याचे पाठ करावेत.संपुर्ण सप्तशती पाठाचे फळ या स्तोत्रात आहे.

* श्रीकनकधारास्त्रोत्र...
या स्त्रोत्राचे नियमित पाठ केल्यास आपल्या भाग्यात येणारे अडथळे दुर होऊन आपला भाग्योदय होऊन आपल्या कार्यात यश मिळते

श्रीमंगल चण्डिकास्त्रोत्र...
या स्त्रोत्राच्या पठणाने कर्ज मुक्तीसाठी मार्ग मिळतात. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहून प्रगती होते.घरातील कलह कमी होऊन कौटुंबिक सौख्यात वाढ होते. विवाहातील अडथळे दूर होतात. या स्त्रोत्राचे घरामध्ये संकल्प करुन पाठ केल्यास घरातील वास्तु दोष दुर होऊन आपली प्रगती होत जाते....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...