Monday, May 23, 2022

नवरात्र

नवरात्र: नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे.*


*नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. दुर्गा किंवा काली ही ज्याप्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही कुलदेवता आहे. देवीच्या देवळातून सार्वजनिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात.*

*दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.*

*नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत त्यामुळे तेथे हा नवरात्र-उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात.*

*नवरात्रोत्सवाची समाप्ती नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी करतात. कित्येक ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासूनही या उत्सवास सुरुवात होते.*
*स्त्रोत: मराठी विश्वकोश, भिडे, वि. वि.*
***************************************************************************

आई..... तुझी घटस्थापना होणार...!!

 
पोटात मूली मारणारे "सुशिक्षित लोक"
जगदंबेची स्थापना करणार...
आई तुझ्या नावाने तूझी घटस्थापना होणार..||1||

काही लाखासाठी "सुनेला जिवंत जाळणारे"
आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी "सुनेला" छळणारे.
आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजणार......
आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||2||
 
भर चौकात "सोडलेल्या सांडासारखे"
उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे
९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार.....
आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||3||

नवरा म्हणुन बायकोला रोज "गुलामासारखे"वागवणारे
रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार....
आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||4|

सांग आई असे किती दिवस चालणार..?
खरच अश्या लोकांना तू पावणार की कोपणार...
मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या
 "पाखंडी भक्तांमुळे" 
हे खड़्गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे..
तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार.....?????

सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा!!!
जर स्त्री शक्तीचा आदर करत जर तीची सर्वार्थाने जपणूक केली तरच ती घटस्थापना सुफळ होईल !!!

*आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या विचार करायला लावणाऱ्या माझ्या शुभेच्छा ....*🌷🌷🌷🌷🌷

--------------------------------------------------------------------------------------------
घरात एक चालती बोलती,_ 
_*लक्ष्मी* पाणी भरते आहे..._🔯

_*अन्नपूर्णा* होऊन,_
_भोजन बनवते आहे..._ 🔯

_*गृहलक्ष्मी* होऊन,_ 
_कुटुंबाला सांभाळते आहे..._ 🔯

_*सरस्वती* होऊन,_
_मुलांचा अभ्यास घेते आहे..._🔯

_*दुर्गा* होऊन,_
_संकटांशी सामना करते आहे..._🔯

_*कालिका, चंडिका* होऊन,_
_घराचे रक्षण करत आहे..._ 🔯

_*तिची पूजा नको...*_ 
_*पण " स्त्री " म्हणून सन्मान व्हावा...*_ 

_*देवी फक्त देव्हारयात नाही,*_ 
_*मनातही बसवा...*_

_*मूर्ती बरोबर,*_ 
_*जिवंत स्त्रीचाही आदर करा...*_

_*हेच आहे....*_ 
_*"नवरात्री उत्सवाचे " खरे सार....!!*_ 🕎

🌟🙏🏼 _*|| जय माता दी ||*_ 🌟🙏🏼

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...