Monday, May 23, 2022

नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व...

🌺 *नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं*

साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

🔶 *दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार*
शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

🔶 *दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं*
अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

🌺 *महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं*
वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), 
श्री एकवीरादेवी (कार्ला).

🌺 *नवरात्रींचे ‘नऊ’ रंग*
लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

🌺 *नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा*
रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

🌺 *नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं*
माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

🌺 *‘नऊ’ प्रकारची दानं*
अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

🔶 *नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार*
श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

🌺 *प्रसिद्ध ‘नऊ’ नाग*
शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

🔶 *समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड*
भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

🌺 *मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश* अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

🌺 *मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म* धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

🌺 *मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था*
मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.

🌺 *नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं*  
आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.

🌺🌺🌺 *आई_जगदंबेची* 🌺🌺🌺
अखंड_कृपा आपल्या सग्गळ्यांवर आणि कुटुंबियांवर राहो .... आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी 
*"श्री आई जगदंबेच्या चरणी " प्रार्थना!!*
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
नाकीचा निर्मळ मोती | 
मळवट भाळी रेखिती ||
महाळुंग उजव्या हाती | 
शिवलिंग मस्तकावरी ||
आई अंबाबाईचा उदे उदे !!!!!
----------------------------------------------------------------------------------------

*नवरात्री उपवासाचा आहार !*


१६ तारखेला अधिक मास संपून १७ तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. 
👍 *या वेळेस नवरात्री आठ दिवसाची आहे, कारण नवमी व दसरा एकत्र आलेला आहे.*
भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. आपण उपवास तर करतो आणि मग दिवसभर काय खातो तर कुठे साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, रताळी असे पिष्टमय पदार्थ. बाद करा हे सर्व पदार्थ आपल्या आहारातून !   

  या नवरात्रीला आपल्याला खायचे आहे, भरपुर फळे, दुध, ताक आणि राजगीरा.
खाण्या पिण्याचा दिनक्रम योग्य तरहेने होण्यासाठी दहा दिवसाचा एक वेळापत्रक बनवून घेऊ ...
👍 दररोज सकाळी उठल्याबरोबर १ ग्लास उकळुन कोमट केलेले पाणी प्यावे.
👍 नंतर बिना साखरेचे विलायची युक्त दुध किंवा कमी साखरेचा चहा, काढा, ग्रीन टी काहीही.
👍 रोज नाश्ता करण्यापुर्वी धणे पाणी, ओवा पाणी किंवा जिरा पाणी अवश्य घ्यावे. हयामुळे पचन व्यवस्थित होते, व शरीरातील विषाक्त द्रव्यांचे ज्वलन होण्यास मदत होते. 
👍 फळे नेहमी ताजी घ्यावीत व फ्रिजमधली गार नको . तसेच फळावंर काळया मि-याची पुड आठवणीने टाकावी. 
👍 दिवस भरात अधुन मधुन बिना साखरेचे लिंबु पाणी प्यावे.
👍 दररोज रात्री झोपताना १ ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे.
👍 *धणे पाणी ,ओवा पाणी किंवा जिरा पाणी बनविण्याची कृती* :-- दोन चमचे अर्धवट कुटलेले धणे किंवा ओवा किंवा जिरे घ्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजू दयावे. व सकाळी चांगले मसळून - गाळून प्यावे.

*दिनांकः १७ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* १०-१५ खिसमिस व ५ बदाम 
*दुपारी १२ ते २* २ संत्री/मोसंबी 
*दुपारी २ ते ५* १-२ ग्लास ताक
*संध्या ६ ते ८* राजगीरा पोळी भेंडीची भाजी     

*दिनांकः १८ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* आक्रोड १-२ व १-२ जर्दाळू
*दुपारी १२ ते २* २ मोसंबी 
*दुपारी २ ते ५* ताक
*संध्या ६ ते ८* राजगीरा थालीपिठ व कढी


*दिनांकः १९ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* १-२ उकडलेला बटाटा   
*दुपारी १२ ते २* अननस 
*दुपारी २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* काकडी कोशिंबीर व राजगीरा चपाती

*दिनांकः २० ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* ६ बदाम व २० चारोळी
*दुपारी १२ ते २* टरबुज
*दुपारी २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* राजगिरा लाही व दुध

*दिनांकः २१ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* ४ खारीक व ५ बदाम
*दुपारी १२ ते २* पपई
*दुपारी २ ते ५* ताक   
*संध्या ६ ते ८* राजगीरा चपाती व गोल भोपळयाची भाजी


*दिनांकः २२ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* २० मनुक्के ४ अंजीर
*दुपारी १२ ते २* डाळिंब
*दुपारी २ ते ५* नारळ पाणी   
*संध्या ६ ते ८* २ ते ४ राजगीरा लाडू

*दिनांकः २३ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* भाजलेले शेंगदाणे व गुळ
*दुपारी १२ ते २* सफरचंद/किवी हे फळ
*दुपारी २ ते ५* नारळ पाणी     
*संध्या ६ ते ८* राजगीरा चपाती व राजगीरापानांची भाजी किंवा कढी

*दिनांकः २४ ऑक्टोबर* 
*सकाळी ७ ते ११* कॉफी व राजगीरा बिस्कीट 
*दुपारी १२ ते २* कोथीबिंरीचा रस/ताक
*दुपारी २ ते ५* नारळ पाणी/ताक  
*संध्या ६ ते ८* राजगीरा पिठाचा उपमा

*दसरा*
*दिनांकः २५ ऑक्टोबर* 


 अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस हा आहारक्रम आपणास ठेवायचा आहे, जेणे करुन नक्कीच आई भवानी आपणास पावेल. 
👍 हा आहार घेताना लक्षात घ्या, रोज वेगळया पदार्थांची निवड आपण केली आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्तपणा येणार नाही.
👍 राजगीरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा आहे, कारण राजगीरा हे धान्य पचावयास खुप हल्के आहे, याने पोट तर भरते मात्र वजन वाढत नाही शिवाय या मध्ये भरपूर मात्रेत कॅल्शियमचे प्रमाण आहे. राजगीरा धान्य बाजारातून आणून स्वच्छ करुन घरी त्याच्या लाहया फोडाव्यात . गरम झालेल्या कडाई मध्ये थोडे थोडे राजगीरा टाकत जावे व हलवित राहावे, क्षणार्धात लाहया फुटतात. तसे तसे त्या बाजुला काढा हयाच लाहया मिक्सर मधून काढल्यास पीठ तयार होते याचीच आपण पोळी करुन घ्यावयाची आहे. (अवघड वाटत असेल तर बाजारात तयार राजगीरा लाह्या व पीठ मिळते ते वापरावे.) यात शाबूदाना वा भगरीचे पीठ कालविण्याची आवश्यकता नाही 
👍 कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर करु नका. 

 तर आशा आहे तुम्हाला हा उपवासाचा वेळापत्रक आवडेल व तुम्ही भक्तीभावाने याचा अवलंब कराल तर मग बोला अंबे आईचा उदो उदो !!! जय माता दी।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...