जर आपण आपल्या विचारांची राखण केली नाहीतर त्यापैकी बहुतांश विचार हे नष्ट होतील. जेव्हा विचारांची निर्मिती होईल, त्यांची देखभाल तेंव्हापर्यंत करायला हवी... जोपर्यंत विचार मोठे होत नाहीत.
विचारांना पळून जाण्यासाठी वाव देऊ नका. त्यासाठी त्याना लिहून काढा. दररोज आपल्या डोक्यात खूप चांगले चांगले विचार येतात पण ते लवकरच मृत्युमुखी पडतात. कारण आपण त्याना कागदावर उतरवत नाही. आपण काही वेळानंतर त्याना विसरतो. नव्या विचारांची रखवालदारी करण्यासाठी स्वतः जवळ एखादी वही किंवा डायरी अवश्य ठेवा.
विचारांचं अवलोकनही करा. तुम्हाला काही विचार बेकार किंवा महत्वहीन वाटतील. त्याना बाहेर काढा. विचारांना विकसित करा. त्याना फुलू द्या त्या विचाराविषयी विचार करत राहा. त्यांच्याशी संबंधित साम्रग्री वाचा. तुमची नोकरी, तुमचं भविष्य, सावरण्यासाठी तसच उज्ज्वल करण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग होईल.
No comments:
Post a Comment