खरंच आजची गरज आहे...!
स्मितहास्य करणे किंवा चेहर्यावर सदोदित स्मितहास्य फुलवणे फार कमी लोकांना जमतं... जो प्रत्येकाच्या चेहर्यावर स्मितहास्याच्या रेषा रेखाटु शकेल असा एक कलाकार असायला हवा असे वाटते...!
अगदि बाळाला सुद्धा स्मितहास्य कळतं बरे... आईच्या चेहर्यावरील ईतर भाव व स्मितहास्यातील फरक... मग आपण तर समंजस , वयाने व कर्तव्याने मोठे आहोत बाळापेक्षा, मग आपल्याला का नाही जमणार? याचा विचार करायला हवा. त्या निरागस छोट्याशा जिवाचे गोड हसणे बघुन ती माऊलीपण तिला होत असलेले त्रास , दुखणे व थकवा विसरून कामाला लागते...!
सहज रस्त्याने चालता चालता जरी आपण समोर आलेल्या व्यक्तीला बघुन हलकेसे स्मितहास्य जरी केले तरी समोरिल व्यक्ती सुखाऊन जाते हो.. आणि ती व्यक्ती थोड्या काळाकरिता का होईना स्वतःतील दुःख विसरते...!
अगदी हाॅस्पिटल मधे सुद्धा डाॅक्टर व सिस्टर चेहर्यावर स्मितहास्य ठेऊन रुममधे किंवा वार्ड मधे प्रवेश करुन रुग्णांची विचारपूस करतात नं त्यावेळी अर्ध्येअधिक पेशन्ट आपले दुखणे विसरुन जाऊन त्यांच्याशी सर्व गोष्टी शेअर करतात व डाॅक्टरांनासुद्धा उपचार करायला मदतच होते...!
आता हेच बघाना 4-5 घरांची धुणी-भांडी करून आपल्याकडे घाईघाईत व ऊशीरा आलेल्या बाईकडे फक्त एक स्मितहास्याचा एक कटाक्ष टाकुन बघा ... ती थकलेली असताना सुद्धा तुमचे जे काही काम असेल ते किती जोमाने करते की नाही बघा...!
ऑफिस मध्ये सुद्धा सर्वांच्या चेहर्यावर स्मितहास्याची एक जरी रेखा आली ना की चपराशा पासुन बाॅसपर्यंत सर्वांचा संपूर्ण दिवस छान जाईल व उत्साहाने कामे होतील... तसेही बाॅसला घाबरुनच असतात बरेच जण ... पण स्मितहास्य थेरपीमुळे तो सुद्धा नाहीसा होऊन ऑफीसमधील वातावरणात एक पारिवारीक मित्रतेचा जिव्हाळा निर्माण होऊ शकतो...!
शाळेत सुद्धा खुप गरजेचे आहे. टिचर्स ने शिकवताना छानसे हसु आणुन समजावून शिकवले तर विद्यार्थी सुद्धा त्याला पडलेले प्रश्न विचारुन त्याचे निरसन करुन घेतील.. नाही तर काही विद्यार्थी बोलतच असतात की त्या बाई किती खडुस आहेत नाही थोड्याशा पण हसत नाहीत, सारखे रागानेच बघत असतात नाही तर ओरडतात... असले काही कानावर ऐकायला पण येणार नाही मग...!
शाळेतुन किंवा कामावरुन मुलं घरी आली की आईला झालेला आनंद तिच्या त्या हास्यातुन दिसल्यावर तर लगेच मुलं शाळेतील व कामावरील गमतीजमती आईबरोबर शेअर करतात...!
स्मितहास्य हे एकदुसऱ्याना बांधुन ठेवायला छान साधन आहे. हास्यामुळे बाॅडिंग पण छान होईल... एक-दुसऱ्यांच्या नातेसंबंधातील ...!!
No comments:
Post a Comment