पण "आशेला मरणं असावं" असं मला मनापासून वाटतं. जोपर्यंत आपण जिवंत असतो, आपली आशा जिवंत असते. आशा म्हणजे अपेक्षा, एखादी गोष्ट हवी असण्याची जाणीव, एखादं स्वप्न, एखादा ध्यास...काहीही ..!
ते पूर्ण होईल , ही दरक्षणी वाटणारी अपेक्षा आणि त्या क्षणांची वाट पाहाण्यासाठी खर्ची घातलेला हर एक क्षण...!
माणूस फक्त आशेवरच जगतो. आशेच्या पूर्ण होण्याची वाट बघतचं जगतो..
आणि ती अपूर्ण राहीली तर?
मेली तर?
संपली तर?
तर
माणूस खचतो, निराश होतो,जगण्याची सगळीच कारणे संपल्याच्या सुन्न अवस्थेपर्यंत पोहोचतो...
हे इतकं सगळं घडतं कारण 'आशा हेच आपल्या जगण्याचं मूळ कारण आहे, असं आपल्याला वाटतं' तसं ते आहेही..पण ते तेवढचं आहे का???
उलट बाजू ही आहे की आशा हेच निराशेचं मूळ आहे. आशेवर जगतो आणि निराशेत प्रत्येक क्षण घालवतो. जोपर्यंत आशा पूर्णत्वास पोहोचतं नाही त्या क्षणापर्यंत निराश राहातो आणि त्या क्षणानंतरही पुन्हा नव्या आशेवर लक्ष केंद्रीत करतो...
ह्या सगळ्यात जगण्यासारखे कितीतरी क्षण हातचे गमावतो. हातातलं सोडून पळत्या क्षणांच्या पाठीमागे धावतो.
आशेला मरणं असावं म्हणजे माणसे प्रत्येक क्षण आनंदाने जगायला लागतील. आज,आत्ता, एवढचं पाहातील , त्यातचं समाधानी राहातील, सुख हे क्षणांवर अवलंबून असतं, क्षणांपुरतं असतं ,हे जाणून घेतील आणि त्या क्षणांना ,त्याच क्षणी जगून घेण्यावर विश्वास ठेवतील...
आशा संपली तर उद्याचा भरवसाही तुटेल आणि
हातातला 'आज' अधिक उर्जेने जगता येईल...
तसंही
कल किसने देखा है!
Swati Bhagat
No comments:
Post a Comment