Thursday, May 26, 2022

काळजी करायची तर नामाची करा...

*♻आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते.♻*

*🔅तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय❓जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेंच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही.🔅*

*✳आपण घाबरतो केव्हां, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे.✳*

*❄संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का❓समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भिती कशाची धरावी❓❄*

*🔘मुळात जी भिती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे❓ खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का❓तसे व्यवहारात आपण वागावे.🔘*

*🔯सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत 'मी कर्ता आहे' अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे.🔯*

*💮'परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा' असे म्हणावे, 'परिस्थितीच बदल' असे देवाला म्हणू नये.💮*

*💠ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे.💠*

*♦️जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे.♦️*

*⭕पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही.⭕*

*🔹️या काळजीचे आईबाप तरी कोण❓देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच❗भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात.🔹️*

*🔸️खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भिती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे❓🔸️*

*🏵आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.🏵*
*==============================*
*🌱आजचे बोधवचन : नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.🌱*
*==============================*
*🌲प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🌲*

*🌸श्री राम जय राम जय जय राम 🌸*
[12/18/2020, 7:45 AM] +91 95036 45430: -----------------------------
*विनायकी चतुर्थी*
--------------------------------

विनायकी हे संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. 
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. 
त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक हे गणपतीचेच नाव आहे. 

*या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो.*

या दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. 
या व्रतसाधनाने सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या असतात. 
यातही मंगळवारी येणारी विनायकी 'अंगारिका विनायकी; म्हणून हिचे महत्वही विशेष सांगितले आहे. एक 'अंगारिका विनायकी' चतुर्थी व्रत केल्यास सर्व वर्षातील विनायकी केल्याचे पुण्य मिळते, एवढे या योगाचे महत्व आहे.
या दिवशी सर्व पूजा नेहमीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून करावी. उपचार समर्पण करताना फक्त 
 *'श्रीसिद्धिविनायकाय नमः '*
असा निर्देश करावा.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी*
------------------------------------------------
[12/18/2020, 7:45 AM] +91 95036 45430: --------------------------------------------------
*भारतातील १० लोकप्रिय गणेश मंदिरे*
------------------------------------------------

कुणी त्याला गणेश म्हणतो, तर कुणी एकदंत... 
काहींना तो विनायक वाटतो तर काहींना गजानन..
 मात्र या साऱ्या भक्तांचा बाप्पा एकच आहे. 'गणपती बाप्पा मोरया' 
बाप्पाचं आगमन म्हणजे सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो

 *आज आम्ही तुम्हाला भारतातील १०प्रसिद्ध गणेश मंदिरांची माहिती देणार आहे.* 

*१) श्री सिद्धीविनायक मंदिर, मुंबई*

पहिला बाप्पा आहे तो आपल्या मुंबईतच विराजमान झाला आहे. भारतात सिद्धीविनायक पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनाकरता येतात. मुंबईतील हे मंदिर साऱ्यांच्याच आकर्षणाचं ठिकाण आहे. बॉलिवूडची मंडळी देखील बाप्पाचे भक्त आहेत.

*२) श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, पुणे*

महाराष्ट्रात सिद्धीविनायक मंदिरानंतर भाविक पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील बाप्पाची मनोभावे पूजा करतात. या गणरायाच्या दर्शनासाटी भाविक देशभरातून येतात. या मंदिरातील ट्रस्ट हे देशातील सर्वात श्रीमंत ट्रस्टपैकी एक मानली जातते. या मंदिराला श्रीमंत दगडूशेठ नावाच्या एका हलवाईने बनवलं होतं. जेव्हा त्यांच्या मुलाचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्याच नावावरून बाप्पाला हे नाव ठेवण्यात आलं आहे. 

*3) कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर*

हे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूपती मंदिरापासून ७५ किमी दूर आहे. हे मंदिर आपल्या प्राचीन ऐतिहासिक शिल्प आणि कलांमुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक मंदिरातील कुंडात आंघोळ करतात. भाविकांची अशी आस्था आहे की, येथे आंघोळ करून सर्व पाप धुतले जातात. 

*४) मनकुला विनायक मंदिर, पुडुचेरी*

भारतातील सर्वाधिक प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर १६६६ साली बांधण्यात आलं आहे. त्याकाळी पुडुचेरी फ्रान्सच्या अक्तारित होतं. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की, या मंदिरातील गणरायाची मूर्ती ही कुणी तरी समुद्रात फेकली होती. मात्र ती त्याच ठिकाणी प्रकट झाली. इथे ब्रह्मोत्सव आणि गणेश चतुर्थी दरवर्षी आनंदात साजरी केली जाते.

*५) मधुर महागणपती मंदिर, केरळ* 

दहाव्या शताब्दीमध्ये बांधलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मधुवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील गणेश मूर्ती ही मातिची ही नाही आणि कोणत्या दगडाची देखील नाही. ही एका वेगळ्याच तत्वापासून बनवलेली मूर्ती आहे. इथे गणपतीच्या मूर्तीसोबतच शिवाची मूर्ती देखील आहे. अशी आख्यायिका आहे की, कोणत्यातरी टीपू सुल्तानने ही मूर्ती नष्ट करण्याचा विचार केला पण या मंदिरातील पवित्र वास्तूने त्याचा हा विचार नष्ट केला. 

*६) रणथंबौर गणेश मंदिर, राजस्थान* 

जरी वाईल्ड लाईफ पसंत असलेले लोकं रणथंबौर नॅशनल पार्क फिरायला येतात. मात्र इथे येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या देखील काही कमी नाही. भक्तगण येथील 'त्रिनेत्र' स्वरूपातील गणरायाचं दर्शन घेतात. जवळपास १००० वर्षे जुनं गणेश मंदिर रणथंबौरच्या किल्यावर सर्वात उंच ठिकाणी आहे. 

*७) मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर*

जयपुरच्या सेठ जय राम पालीवाल यांनी १८ व्या शताब्दीमध्ये हे मंदिर बांधल आहे. हे मंदिर छोट्याश्या डोंगरावर असून जयपूर मधील मुख्य टूरिस्ट स्पॉट आहे. इथे जयपुरच्या महाराणी गायत्री देवीचे महल 'मोती डूंगरी पॅलेस' म्हणून आहे. 

*८) गणेश टॉक मंदिर, गंगटोक* 

गंगटोकच्या प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉटवरील हे मंदिर सुंदर लोकेशनमुळे लोकप्रिय आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या या ठिकाणचं हे गणपती मंदिर पर्यटकांच खास आकर्षणाचं कारण आहे. 

*९) गणपती मंदिर, रत्नागिरी*

या मंदिरातील भगवान गणेशाची मू्र्ती ही उत्तर दिशेत असून याचं मुख पश्चिमेकडे आहे. तेथील स्थानिकांच असं म्हणणं आहे की, ही मूर्ती कुणी स्थापन केली नसून ती स्वतः दगडात प्रकट झाली आहे. 

*१०) उच्ची पिल्लयार मंदिर, तामिळनाडू* 

भारतातील गणेश मंदिरापैकी उच्ची पिल्लयार मंदिर हे एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. तामिळनाडू तिरूचिरापल्ली नावाच्या ठिकाणी उंच डोंगरावर हे मंदिर आहे. उंच डोंगरावर असलेला हा बाप्पा अतिशय सुंदर आणि मोहक वाटतो. असं म्हटलं जातं की, या मंदिरांची कथा रावणाचा भाऊ विभीषणशी जोडलेली आहे. विभीषणने इथे गणपतीवर हल्ला केला होता.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------
[12/18/2020, 7:45 AM] +91 95036 45430: -----------------------------------------------------------
*विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची*
*श्री विनायकाची व्रतपूजा (सोपी)*
----------------------------------------------------------

स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. आचमन करून

*केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।*

असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि

*गोविंदाय नमः ।*

असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडून

*स्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि*

असे म्हणावे.

*वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।*

असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध-तांबडे किंवा पांढरे गंध लावावे

*चंदनं समर्पयामि*

म्हणून नमस्कार करावा.

*हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।*

हळद-कुंकू लावावे.

*अक्षतां-विनायकाय नमः ।*

*अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।*

म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.

*फुले-पुष्पाणि समर्पयामि*

म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहूं नये, बेल चालतो.

*दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि*

म्हणत दुर्वा वाहाव्या. ।

*धूपं-विनायकाय नमः ।*

असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला

*धूपं-समर्पयामी म्हणत*
 ओवाळावे. दीप-निरंजनाची वात पेटवून

*निरांजनदिप समर्पयामि*

असं म्हणून ओवाळावे.

*नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि*

असें म्हणून गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा व

*नमस्करोमि*

असें म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून

*प्रदक्षिणां समर्पयामि*

म्हणावे व हातातील पुष्पांजलि

*पुष्पांजलि समर्पयामि*

असे म्हणून देवावर वाहावी. पूजा झाल्यावर खालील प्रार्थना म्हणावी -

*विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥*

*नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥*

*नमस्कारान् समर्पयामि ।*

नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे.
 *॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥*

विसर्जन -

संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-----------------------------------------------
[12/18/2020, 7:45 AM] +91 95036 45430: ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🏵विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची श्री विनायकाची व्रतपूजा.*

*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*

*प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.*

*स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. आचमन करून*

*केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।*
*असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि,*

*गोविंदाय नमः ।*
*असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडून स्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि असे म्हणावे.*

*वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।*
*असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध-तांबडे किंवा पांढरे गंध लावावे.*

*चंदनं समर्पयामि, म्हणून नमस्कार करावा.*

*हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।*
*हळद-कुंकू लावावे.*

*अक्षतां-विनायकाय नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि । म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.*

*फुले-पुष्पाणि समर्पयामि, म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहूं नये, बेल चालतो.*

*दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि, म्हणत दुर्वा वाहाव्या. ।*

*धूपं-विनायकाय नमः । असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला धूपं-समर्पयामी म्हणत ओवाळावे.*

*दीप-निरंजनाची वात पेटवून निरांजनदिप समर्पयामि। असं म्हणून ओवाळावे.*

*नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि। असें म्हणून गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा व नमस्करोमि। असें म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून,*
*प्रदक्षिणां समर्पयामि। म्हणावे व हातातील पुष्पांजलि, पुष्पांजलि समर्पयामि। असे म्हणून देवावर वाहावी.*

*पूजा झाल्यावर खालील प्रार्थना म्हणावी.*
*विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥*
*नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥*

*नमस्कारान् समर्पयामि ।*
*नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे. ॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥*

*विसर्जन,*
*संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.*

*भक्तकवि मिलिंदमाधवकृत, विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा व नामस्तोत्र.*

*ॐ विनायका नमः । ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टांगी ॥१॥*

*नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥२॥*

*नमन तैसे गुरूवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पायां । चित्तशुद्धी जाहली ॥३॥*

*थोर ऋषिमुनी संतजन । माता-पिता आणि बुधगण । करूनी तयांसी नमन । विनायकी माहात्म्य आरंभिले ॥४॥*

*शुक्लपक्षी चवथी तिथी । तीच विनायकी चतुर्थी । गणेशजन्माची स्मृति । म्हणून हे व्रत करावे ॥५॥*

*या दिवशी प्रत्येकाने । वागावे अति संयमाने । आणि काया-वाचा मनें । पवित्र असावे ॥६॥*

*कठोर शब्द उच्चारून । दुखवू नये कोणाचे मन । जिवंत देवांना लाथाडून । काय उपयोग व्रताचा ? ॥७॥*

*दीनदुबळ्यांवरी दया करी । त्याचाच देव होतो कैवारी । संकटें सर्व निवारी । आणि सुखरूप ठेवितो ॥८॥*

*प्रथम करावें गणपती पूजन । गुळखोबर्‍याचा नैवेद्य अर्पून । मनोभावें प्रार्थना करून । आशिर्वाद मागावा ॥९॥*

*पूजा प्रार्थना संपल्यावरी । भोजन करावें दुपारी । साध्या सात्विक आहारीं । मीठ वर्ज्य करावें ॥१०॥*

*गरम मसाले टाळावे । उत्तेजक जिन्नस नसावें । ऐंसें जेवण जेवावें । विनायकी व्रताला ॥११॥*

*ज्यांची इच्छा असेल त्यांनी । रात्री उपास करावा त्या दिनीं । आणि इतर सर्वांनी । विनायक चिंतन करावे ॥१२॥*

*आधीं चित्त स्थिर करावें । एक माळा (१०८) नाम स्तोत्र म्हणावें । आणि नंतर झोपी जावें । विनायकी व्रतदिनीं ॥१३॥*

*गणपतीची व्रतें अनेक । त्यांतीलच हें व्रत एक । त्याची ही कथा सुरेख । ऐका आतां सांगतों ॥१४॥*

*विनायकी चतुर्थी दिवशीं । आपणास फुरसत मिळेल तशी । वंदन करूनी विनायकासी । पोथी अवश्य वाचावी ॥१५॥*

*फार फार प्राचीन काळीं । एक विशेष गोष्ट घडली । जी पुराणी आहे वर्णिली । तीच देतो संक्षेपें ॥१६॥*

*एक होता पारधी शिकारी । बायको, मुलें - बाळें होती घरी । कसेंबसें तो पोट भरी । पशुपक्षी मारूनी ॥१७॥*

*भल्या पहाटे उठुनी । तीरकामठा हाती घेऊनी । हिंडे सार्‍या रानींवनीं । शिकार काही शोधाद्या ॥१८॥*

*पसरूनी ठेवी जाळें फांसे । त्यांत अडकती पक्षी ससे. । प्राणी त्यापेक्षां जे मोठेसे । मारी धनुष्यबाणानें ॥१९॥*

*काळवीट, हरिणे, चितळे । वनगाई, सांबर, चित्ताही मिळे । कधीं कधीं ढाण्या वाघ आढळे । तेव्हा फायदा होतसे ॥२०॥*

*कवडे, कबुतरे, तितर, मोर । असे रंगीबेरंगीं लहानथोर । पशुपक्षी मिळतां भरपूर । आनंद त्याला होतसे ॥२१॥*

*टाकुनी पशूंचीं आंतडीं । काढुनी घेई शिंगे कातडी । विकुनी ती बाजारी हरघडी । चरितार्थ तो चालवी ॥२२॥*

*नाना रंगी पक्ष्यांचीं । आणिक सुंदर मोराची । पिसें विकून, पैशांची । प्राप्ती त्याला होतसे ॥२३॥*

*कधी होई खूप कमाई । कधी कधी उपाशीच राही । आला दिवस कसाबसा जाई । ऐसें जीवन व्याधाचें ॥२४॥*

*एकदां निघाला नेहमीप्रमाणें । हिंडत गेला रानेंवनें । परंतु कर्मधर्मसंयोगानें । शिकार नाहीं मिळाली ॥२५॥*

*दिवस आला माथ्यावरी । भुकेचा डोंब उठला उदरी । तो शमवाया पाणीतरी । प्यावे आतां भरपूर ॥२६॥*

*ऐसा विचार करूनी मनी । तलाव शोधत जावे म्हणुनी । व्याध निघाला मग तिथुनी । भर उन्हात भर दुपारी ॥२७॥*

*योगायोग खराच आगळा । एक दिव्य दृश्य दिसले त्याला । वनदेवीचा एक मेळा । पूजाविधीत रंगलेला ॥२८॥*

*व्याध तिथे झपझप गेला । हात जोडुनी उभा राहिला । वनदेवींनी विचारले त्याला । कुठला कोण आहेस तूं ? ॥२९॥*

*व्याधाने मग न डगमगता । सांगितली आपली सत्यकथा । वनदेवींना ती ऐकता । फार वाईट वाटले ॥३०॥*

*पाणी देऊनी त्या व्याधाला । म्हणाल्या दया नसे का तव ह्रदयाला ? । प्राणीहत्येचे पाप कशाला । पोटासाठी करिसी तूं ? ॥३१॥*

*ज्या मुक्या प्राण्यांना तूं मारिले । त्यांनी तुझे काय नुकसान केले ? । पापाचे मात्र डोंगर झाले । तुझ्या क्रूर कृत्यांनी ॥३२॥*

*तूं नाहीस लंगडा लुळा । अपंग किंवा आंधळा पांगळा । सुदैवाने मिळालें आहे तुला । धष्टपुष्ट शरीर हे ॥३३॥*

*अंग मोडून काही काम करावें । स्वकष्टानें द्रव्य मिळवावें । मिळालेल्यांत संतुष्ट असावें । आणि राहावें आनंदें ॥३४॥*

*जो पाप करी आचरणांत । आणि देवाला घाली दंडवत । अशा दांभिकाच्या पदरात । पुण्य कसें पडेल ?॥३५॥*

*श्रम तेथें येते संपत्ती । निरूद्योगाने येते विपत्ती । हे जाणे त्यालाच गणपती । सदा प्रसन्न होतसे ॥३६॥*

*व्याध म्हणाला खजिल होऊन । देवीनो आज मी झालो धन्य । तुमच्या उपदेशानुसार वागेन । अशी शपथ घेतों मी ॥३७॥*

*परंतु ही इथे थाटाची । पूजा करिता कोणाची ?। क्षमा करा विचारितो याची । मोठ्या उदार मनाने ॥३८॥*

*देवी म्हणाल्या जो कोणी कष्ट करतो । त्याला त्यात जो यश देतो । विघ्ने संकटे दूर करतो । आणि देतो सुखसमृद्धि ॥३९॥*

*असा देवाधिदेव विनायक । विश्वाधार मूळारंभ एक । त्याचीच नावे घेऊनी अनेक । पूजा आम्ही करितो ही ॥४०॥*

*आज विनायकी चतुर्थी । म्हणजेच विनायकी जयंती । आज त्याची पूजा करितां ती । सिद्धिदायक होतसे ॥४१॥*

*आजचे व्रत पाळावे । आणि कर्तव्य कर्म करावे । प्राणीमात्रांसी रक्षावे । परपीडा हे पाप असे ॥४२॥*

*व्रताची माहिती व महती । त्यांनी सांगितली व्याधाप्रती । तो व्याध ऐकुनी ती । फार संतुष्ट जाहला ॥४३॥*

*व्याधाने केले देवींना वंदन । आणि म्हणाला आजपासून । प्रत्येक विनायकी व्रत मी करीन । प्राणिहत्या सोड्ली ॥४४॥*

*गुप्त जाहल्या देवी तेवढ्यात । व्याध परतला आपल्या झोपडीत । राहू लागला खूप सुखांत । मेहनत मजुरी करूनिया ॥४५॥*

*त्याने अनेक वर्ष ते वरत केले । पुढे सृष्टिनियमाने निधन झाले । त्या व्रताच्या पुण्यसंचयाने । राजकुळी पुनर्जन्म लाभला ॥४६॥*

*पूर्वजन्मींची आठवण । विसरला नव्हता म्हणून । त्या जन्मीही केले व्रतपालन । तेणे सम्राट जाहला ॥४७॥*

*वैभवाने नाही उतला । सत्तेने नाही मातला । म्हणूनच विनायकाने त्याला । अखेर दिली सद्‌गती ॥४८॥*

*विनायकी चतुर्थीची ही कथा । थोडक्यात सांगितली आता । संतोष वाटो विनायक भक्तां । म्हणे मिलिंदमाधव ॥४९॥*

*या पोथीचे करिता वाचन श्रवण । विनायक कृपेने होईल कल्याण । मनोरथ होतील सफल पूर्ण । श्रीविनायकाच्या प्रसादाने ॥५०॥*

*ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी । केवळ एखाद्याच व्रतदिनी । या पोथीच्या चार प्रती घेऊनी । गणेश मंदिरी वाटाव्या ॥५१॥*

*प्रसार व्हावा विनायक भक्तीचा । प्रचार व्हावा सद्‌विचारांचा । हाच उद्देश प्रती वाटण्याचा । कृपया ध्यानी घ्यावे हे ॥५२॥*

*विनायक भक्तीचा प्रभाव मोठा । नसतो सुखसमृद्धिचा तोटा । सर्व वैभवांचा होय पुरवठा । आनंदी आनंद होतसे ॥५३॥*

*नित्य केल्याने गणेशसेवा । मिळेल तुष्टी-पुष्टीचा ठेवा । ज्याचा त्याने अनुभव घ्यावा । या विनायकी व्रताचा ॥५४॥*

*असो. शके १९०८ वर्षी । चैत्र मासी शुक्लपक्षी । विनायकी चतुर्थीच्या शुभ दिवशी । पोथी पूर्ण झाली ही ॥५५॥* 

*ॐ शांतिः शांतिः शांतिः शुभं भवतु ॥ भक्तकवि मिलिंदमाधवकृत विनायकी चतुर्थी माहात्म्य संपूर्ण ॥*
*स्त्रोत: आंतरजाल.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...