Thursday, May 26, 2022

*लक्षात ठेवण्यासारख्या ५ गोष्टी…

 ---------------------------------------------

लक्षात ठेवण्यासारख्या ५ गोष्टी…
----------------------------------------------

ज्यामुळे करू शकाल कोणत्याही परिस्थितीचा सामना

पैशाला आपल्या जीवनात अन्यसाधारण महत्व आहे. अनेक जण तुमचे यशा-अपयश हे पैशाच्या आधारे ठरवत असतात पण यश-अपयश हे प्रत्येकाच्या जीवनात येत असते. काही जण अपयशाला सामोरे गेल्यावरही निराश न होता आयुष्यात पुढे जातात. तर काही जण तेथेच घुटमळत राहतात. पण हे सत्य आहे की वाईट वेळेनंतर चांगली वेळ ही येत असते. त्यामुळेच वाईट प्रसंगाचा धैर्याने सामना करणे गरजेचे असते. अनेकदा असाही प्रसंग येतो की आपले धैर्य खचते. आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.

*जेव्हाही वाईट वेळ येईल लक्षात ठेवा या गोष्टी*
सुप्रसिध्द गुंतवणुकदार वॉरेन बफे आणि लेखक रामित सेठी यांच्या म्हणण्यानुसार, वाईट परिस्थितीवर मात करण्याचे काही नियम आहेत. तुम्ही जर ते नियम पाळले तर तुम्ही या परिस्थितीवर निश्चितच मात कराल आणि जीवनात यशस्वी व्हाल. 
*आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्याची तुम्ही वाईट काळात काळजी घेणे गरजेचे आहे.*

*१) पहिली बाब:* 
दुख: आणि अपयश हा जीवनाचा भाग आहे.

*काय होईल यामुळे:* 
ही बाब लक्षात ठेवल्यास तुमचे धैर्य कायम राहील.

*२) लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट:* 
वाईट वेळ निघून जाते.

*यामुळे काय होईल:* 
तुम्ही वाईट काळाला सहज सामोरे जाल.

*३) तिसरी गोष्ट:* 
जास्त विचार करु नका, चिंता तर मुळीच करु नका.

*यामुळे काय होईल:* 
तुम्ही अपयश विसरुन सातत्याने चांगले काम करु शकाल.

*४) चौथी गोष्ट:* 
तुमच्यासोबत घडलेली घटना, प्रसंग तुम्हाला काही तरी शिकवतो. त्याला ताकद बनवा कमजोरी नाही.

*यामुळे काय होईल:* 
हताश न होता तुम्ही अपयश स्वीकाराल. अनुभवातून मिळालेला धडा तुम्हाला नवा आत्मविश्वास

*५) पाचवी गोष्ट:* 
मला पुढे जायचे आहे.

*यामुळे काय होईल:* मला पुढे जायचे आहे असे ठरविल्यास तुम्ही नवे मार्ग शोधाल आणि पुढे जाल. तुमच्यातील नकारात्मकता आपोआपच दुर होईल.


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...