काही अज्ञानी भक्तांना प्रश्न पडायचा की हा ज्या दिवशी भिक्षा नाही मागत त्यावेळी काय करत असतील ती परीक्षा पाहायला एकटा ब्राह्मण गेला आणि तिथे एक नावाडी पण होता, व्रह्मण नरसिंह सरस्वतीचा रुद्र रूप वाटलं।तो घाबरून पळून गेला पण नावड्य़ाला भिती वाटली नाही त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, "तू येथे कशासाठी आलास?" तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. संसारमायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते." त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझे दैन्यदारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल." असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःखदारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. नरसिंह सरस्वती आपले वास्तव्य सोडून गाणगापुरला निघाले त्या वेळी ६४ योगिनी नि प्रार्थना केली आम्हाला उपेक्षून तुम्ही जात आहात त्यावेळली महाराजांनी मनोहर पादुकां दिल्या, आणि चीर काळ वास्तव्य राहील असे सांगितलेगुरुचरित्रात ६४ योगिनींचा उल्लेख १९ व्या अध्यायात येतो . पण त्या अध्यायातील कथा समजायला १८ वा अध्य़ाय़ समजून घ्यावा लागतो. अध्याय १८ मध्ये श्रीगुरु अमरेश्वरी गरीब ब्राम्हणाचे घरी घेवाड्याच्या शेंगाची भाजी भिक्षेत घेऊन विप्राचे दारिद्र्य हरण करतात हे सर्वांना ज्ञात आहेच .तसेच भोजन पात्रही नसणाऱ्या श्री कुलकर्णींच्या घरी दगडावर कण्या घेऊन त्या कुळाचा जन्मोजन्मीचा उद्धार करतात. भिक्षा हे फक्त निमित्त भक्तांचा उद्धार हेच खरे उद्दीष्ठ!
[12/18/2020, 7:38 AM] +91 95036 45430:

*श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना*

*श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी*
ही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची, त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत.
स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा. (पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल.) तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील, अशा प्रकारे एक नारळ ठेवावा.
हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. श्रीमहालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून त्या चित्राची तसबीर समोर येईल अशा तर्हेने कलशाला टेकवून ठेवावी.
*ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः ।*
असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी-कुंकू, पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल, ती सफल होण्याची विनंती करावी.
देवीच्या चौरंगावर पाट मांडून त्यावर बसून श्रीमहालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्रीमहालक्ष्मी माहात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसर्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे.
देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.
रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.
दुसर्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो.
श्री लक्ष्मीदेवीने पद्मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !
गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.
*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
[12/18/2020, 7:38 AM] +91 95036 45430: -----------------------------
*मार्गशीर्ष गुरुवार*
*व्रत करण्याचे नियम*
-----------------------------
_शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे._
*या व्रताचे नियम*
१) या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे.
२) हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात.
३) व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा.
४) हे व्रत करणार्यां स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे.
५) रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.
६) पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं.
७) व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.
८) पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवावी. मात्र उपास स्वत: करावा.
९) लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्य चा पाठ करू शकतात.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------
[12/18/2020, 7:38 AM] +91 95036 45430: *खंडोबा देवस्थान*
----------
*सातारे*
------------
सातारे खंडोबा साठी प्रसिद्ध असणारे औरंगाबाद जवळील गाव येथील रेल्वे स्टेशन पासुन ५ किमी असणारा गाव औरंगाबादचे शहर विस्ताराने त्याचाच एक भाग बनत आहे. औरंगाबादचे रिंग रोडला पुणे, पैठण, बीड कडून येणारे मार्ग मिळतात त्या परिसरातील एम आई टी कॉलेज चे जवळून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने सातारे येथे पोहचता येते.
येथील खंडोबा मंदिर एका डोंगराचे पायथ्याशी आहे गाडी मार्गाने मंदिराचे पुर्व व पश्चिम दरवाज्या मध्ये पोहचता येते. मंदिर एका उंच कट्यावर बांधलेले आहे आवाराचा पुर्व दरवाजा मोठा असुन सुमारे १५ पायऱ्या चढून दरवाज्यातून आवारात जाता येते दरवाज्यावर नगारखाना आहे
पुर्व दरवाज्यातून आवारात प्रवेश केल्यावर उत्तर बाजुस एक दीपमाळ आहे त्याचे पुढे पूर्वाभिमुख मंदिराच्या मंडपाचा चौथरा दिसतो तीन पायऱ्या चढून चौथऱ्यावर जाता येते. चौथऱ्यावर चारही बाजुच्या भिंतीचा तळ व मंडपाचे खांबांचे १९ तळ या चौथऱ्यावर दिसतात, या चौथऱ्यावर येण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून पायऱ्या आहेत भग्न मंडपाचे हेच अवशेष शिल्लक आहेत
मंडपाचे पुढे उत्तर व दक्षिण बाजुस प्रत्येकी एक खोली काढलेला सोफा आहे या खोल्याचे दगडी कलाकुसरीने युक्त पुढे काढलेल्या दोन देवळ्या आहेत उत्तरे कडील देवळीत गणपती व दक्षिणे कडील देवळीत मारुती यांच्या प्रतिमा आहेत.
मधील सोप्याची तुळई दोन खांबांनी आधारलेली असुन गर्भगृहाचे दरवाजाचे वरील भागात दशावतार व उत्तरबाजुस कृष्ण गवळणी व दक्षिणबाजुस सूर्य याची शिल्पे आहेत. पूर्वाभिमुख दरवाज्यावर मुर्ती, वेलपत्ती काढलेल्या आहेत हे काम अतिशय सुबक आहे या काम मधील व्यक्ती रूपा वरून हे काम पेशवाई कालीन आहे असे दिसते.
गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर पश्चिमेस पूर्वाभिमुख तीखणी मेघदम्बरी असुन ती उंचावर आहे मध्यभागीचे मेघदम्बरी धातूची म्हाळसेसह घोड्यावर विराजमान खंडोबाची झालेली उत्सव मुर्ती आहे. या मुर्ती मागे एक शेंदूर चर्चित डोळे बसविलेला खंडोबाचा तांदळा आहे
गर्भगृहाचे नेरुत्य कोपऱ्यात एक अश्वारूढ शेंदूर चर्चित घोडेस्वार असुन त्याचे शेजारी सुमारे ८ फुट उंचीचा दुधारी खंडा आहे
गर्भगृहाचे वयाव कोपऱ्यात अश्वारूढ खंडोबा म्हाळसा यांची प्रतिमा आहे त्याचे पश्चिमबाजुस लिंग व तांदळे आहेत.
जुन्याकाळी खंडोबाचे वास्तव्य मंदिरामागे दिसणारे डोंगरावर होते, सातारे येथील जहागीरदार दर्शनासाठी तेथे रोज जात ते वृद्ध झाल्यावर त्यांचे भक्तीने देव या ठिकाणी गोकुळ अष्टमी चे दिवशी आले अशी जनश्रुती आहे.
मंदिराचा गाभारा बाहेरून तारकाकृती करण्यात आलेला आहे त्या वरील नक्षीकाम सुंदर आहे गर्भगृहास दक्षिण बाजूनेही दरवाजा आहे मंदिराचे काम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे.
मंदिराचे शिखर सुंदर असुन त्या वरील गिलावा गेलेला आहे. त्या मुळे त्या वरील मुर्ती काम कसे होते हे समजत नाही,
हे मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात तर ईस १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांचा जिर्णोधार केल्याचेही सागितले जाते. परंतु मंदिराचे अपूर्ण स्थिती मुळे बांधकाम अपूर्ण राहिले की उध्वस्त झाले हे समजत नाही.
मंदिराचे आवाराचे अग्न्येय कोपऱ्यात एक पार असुन त्यावर गणपती व मारुती यांच्या प्रतिमा आहेंत
दसरा नवरात्र, चंपाषष्टी षडरात्र , पौष पौर्णिमा, या दिवसा मध्ये येथे यात्रा भरते
*क्रमशः*
--------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी ©*
--------------------------------------------------
No comments:
Post a Comment