परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे, आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला, मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे.
*एखाद्या पाऊलवाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्यापुढला सर्व व्यवहार चुकत जाणार.*
*एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढले सर्व गणित चुकत जाते किंवा, एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषधयोजना फुकट जाते.*
*
️त्याप्रमाणे, मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल.
️*
️त्याप्रमाणे, मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल.
️**
️आपण आनंदी असावे, नेहमी आनंदात रहावे, असे सर्वांनाच वाटते; हा झाला पहिला गुणधर्म.या आनंदात चिरंतन असावे, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन रहावे, असेही आपल्याला वाटते.
️*
️आपण आनंदी असावे, नेहमी आनंदात रहावे, असे सर्वांनाच वाटते; हा झाला पहिला गुणधर्म.या आनंदात चिरंतन असावे, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन रहावे, असेही आपल्याला वाटते.
️**
खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही; जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते.
*
खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही; जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते.
**
परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते.
*
परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते.
**
पण आपली मुळात वाट चुकली, आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले.
*
पण आपली मुळात वाट चुकली, आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले.
**
एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो 'माझे झाड पडले' असे म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर 'त्याचे शरीर पडले' असे नाही आपण म्हणत, 'तो मेला' असे म्हणतो.
*
एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो 'माझे झाड पडले' असे म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर 'त्याचे शरीर पडले' असे नाही आपण म्हणत, 'तो मेला' असे म्हणतो.
**
म्हणजेच मुळात चूक ही की, आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही आपली पहिली चूक.
*
म्हणजेच मुळात चूक ही की, आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही आपली पहिली चूक.
**
नंतर, या देहाचा गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर, त्यांचीच जोपासना करतो, ही दुसरी चूक.
*
नंतर, या देहाचा गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर, त्यांचीच जोपासना करतो, ही दुसरी चूक.
**
एकदा हे विकार चिकटल्यावर, त्यांची वाढ न थांबविता, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे, आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे, ही तिसरी चूक.
*
एकदा हे विकार चिकटल्यावर, त्यांची वाढ न थांबविता, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे, आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे, ही तिसरी चूक.
**
अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते.
*
अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते.
**
एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, आणि नंतर बुंधा तोडतात; तसे, नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे.
*
एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, आणि नंतर बुंधा तोडतात; तसे, नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे.
**
दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि 'मी तुझा आहे' असे म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.

तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.
*
तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.
**¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
*
आजचे बोधवचन मी कोणीच नाही, सर्व राम आहे, आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात रहा.
*
आजचे बोधवचन मी कोणीच नाही, सर्व राम आहे, आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात रहा.
**¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
*
प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
*
प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
**
श्री राम जय राम जय जय राम
*

श्री राम जय राम जय जय राम
*

[12/18/2020, 7:38 AM] +91 95036 45430: 

*
।।श्री स्वामी समर्थ।।
*

।।श्री स्वामी समर्थ।।
* *
समाधि.
*
समाधि.
**----------------------------- ----------------*
*
संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.**----------------------------- ----------------*
*समाधी ही संकल्पना पातंजल योग, बौद्धदर्शन तसेच वेदान्त दर्शन यांत प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजल योगात समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्यप्राप्तीसाठी साधकाने करावयाच्या अष्टांगयोग साधनेतील ती शेवटची पायरी मानली गेली आहे. किंबहुना योगाची ‘चितवृत्तिनिरोध’ (चित्ताच्या सर्व वृत्ती रोखल्या जाणे वा त्या नाहीशा होणे) अशी जी व्याख्या पतंजली ने केली आहे, त्यातूनही पतंजलीला ‘योग’ या शब्दाने समाधीच अभिप्रेत आहे असे मानले जाते.*
*योगसाधनेच्या आठ अंगांचे बहिरंग व अंतरंग असे वर्गीकरण केले जाते. पैकी अंतरंग योगात धारणा, ध्यान व समाधी यांचा अंतर्भाव होतो. धारणेत चित्त कोणत्या तरी भागावर/प्रदेशावर स्थिर केले जाते. ध्यानात या भागातच चित्ताची एकतानता साधली जाते. तर समाधी अवस्थेत चित्त ध्येयविषयाशी इतके एकरूप होते की जणू फक्त विषयच शिल्लक राहतो. अर्थात ही ‘संप्रज्ञात-समाधी’ झाली. ज्यावेळी विषयाचेही भान होत नाही, अशी चित्ताची अवस्था म्हणजे असंप्रज्ञात समाधी.*
*सबीज समाधी आणि निर्बीज समाधी असेही समाधीचे वर्गीकरण पतंजलीने केले आहे. सबीज समाधीत पूर्वकर्मांचे संस्कार बीजरूपाने शिल्ल्क असतात, तर निर्बीज समाधीत तेही नष्ट झालेले असतात. निर्बीज समाधी ही योगसाधनेची परमोच्च पायरी होय. निर्बीज समाधीतूनच योग्याला कैवल्यप्राप्ती होते.*
*अव्दैत वेदान्ताने ही योगदर्शनातील समाधि-संकल्पना स्वीकारली असून तिला अव्दैताचे वेगळे परिमाण दिले आहे. यानुसार समाधिस्थितीत केवळ चित्तवृतींचा निरोध होतो, असे नसून शेवटी चित्ताचाच विलय होतो. अव्दैत वेदान्तात समाधीचे वर्गीकरण सविकल्प समाधी व निर्विकल्प समाधी असे केले जाते व निर्विकल्प समाधीलाच ब्रह्मसाक्षात्कार मानले जाते.*
*बौद्ध तत्त्वज्ञानानुसारही निर्वाणप्राप्तीच्या ‘आर्य अष्टांगिक मार्गा’ तील सम्यक् समाधी हा महत्त्वाचा टप्पा आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकागता. सम्यक् समाधी म्हणजे मनाची निर्मळता व एकागता साध्य करणे. या आर्य अष्टांगिक मार्गाचीच विभागणी काही वेळा शील, समाधी व प्रज्ञा या तीन घटकांत केली जाते. शील म्हणजे सदाचरण, समाधी म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेचा अभ्यास व या दोन्हींच्या साहाय्याने जगाविषयी आणि जीवनाविषयी विकसित होणारी अंतदृष्टी म्हणजे प्रज्ञा होय.*
*अष्टांगयोग योगदर्शन.*

No comments:
Post a Comment