*लहान असताना आमच्याकडे टी.व्ही नव्हता,तेंव्हा अस वाटायचं की आपल्याकडे पण tv असायला हवा होता,*
*पण परिस्थिती बेताची असल्यामुळे tv घेणं काही शक्य नव्हतं,काही दिवसांनी आमच्या कडे रेडिओ आला,रेडिओ म्हंटल की तो आमच्या साठी tv च पण ,पण तरी वाटायचं की tv असायला हवा होता*
*दूरदर्शन वर पूर्वी शक्तिमान,दामिनी,नंदू अपना इत्यादी मालिका लागायच्या ,काका कडे tv आणला होता,ब्लॅक अँड व्हाइट मग काय tv पाहून खुश,घरा वरती दूरदर्शन चा अँटिना असायचा, मग त्यावर कावळा बसला की tv वर मुंग्या यायच्या,कधी दूरदर्शन केंद्रा कडे अँटेना फिरवा लागत असे आमच्या इकडे अंबेजोगाई आणि म्हैसमाळ ही दूरदर्शन केंद्र चांगली रेंज देत असे*
*मला असे वाटायचे की आपल्या घरी पण tv असावा,एकदा यात्रेत गेलो असता खेळण्यातला tv 3 रुपयाला आणला, माचीस च्या डबी एवढि डबी त्याला डाव्या साईड ला गोल बटन म्हणजे फिरकी ती फिरवली की कागदी चित्र असलेल्या tv चे चित्र बदलता येत असे*
*मग काय खेळण्यातला का असेना तो माझ्या साठी tv होता ,मी छान त्याला ठेवण्यासाठी जागा तयार केली,आणि माझा tv त्या जागेवर विराजमान झाला ,आई ला सांगितलं आपल्या कडे tv आला,काही तरी गोड खायला कर तर तीने छान शिरा केला होता
*
**हळूहळू दूरदर्शन ची जागा केबल ने घेतली,ब्लॅक अँड व्हाइट tv ची जागा रंगीत tv ने घेतली, काका कडे रंगीत tv आला आणि त्यांचा जुना ब्लॅक अँड व्हाइट tv आमच्या कडे आला,मग काय मज्जा आमची, कितीतरी वर्षांनी आमच्याकडे tv आला होता,मग काय दिवस भर tv वर स्टार प्लस,सहारा वन,ndtv imagine चालायचे*
*असेच दिवस जात गेले,घरी रंगीत tv आला पण शिरा करून देणारी आई देवाघरी निघून गेली*
*असा होता आमचा tv चा प्रवास,छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता यायला हवं,*
Dixit 

No comments:
Post a Comment