Thursday, May 26, 2022

वनविभाग हेल्पलाईन १९२६


आपल्या परीसरात वणवा लागण्याचे प्रमाण वाढत आहे...
वणव्यामध्ये वनातील अनेक प्रकारचे गवत, झुडुपे, वेली, छोटे-मोठे वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडतात. एकाच क्षेत्रात सातत्याने वणवे लागल्यास वनस्पतींच्या स्थानिक प्रजाती नष्ट होतात. वनस्पतीं प्रमाणेच वणव्यामुळे जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या असंख्य वन्यजीवांची हानी होते. जंगलातील वन्य प्राण्यांची संख्या आणि जैवविविधताही घटते, त्यांच्या पुनरुत्पादनावरही परिणाम होतो. वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते.
वणवा लागलेल्या क्षेत्रात वनीकरणाची कामे झाली असल्यास कोवळी रोपे जळून जातात 
  नैसर्गिक संपदेचे संरक्षण व संवर्धन करणे हा राष्ट्रीय मुद्दा राहिला नसुन आंतरराष्ट्रीय मुद्दा झालेला आहे
   मध्यंतरी अमेझॉन जंगलाला लागलेली आग सर्वांनाच माहीती आहे त्यामुळे अपरीमीत नुकसान झालेले आहे बरेचसे वन्यजीव आगीत भस्मसात झाले.

तरी आपण सर्व आपल्या भागात लागणाऱ्या आगीची(वणव्याची)माहीती वनसंरक्षण विभागाला कळवुन आपण आपल्या परीने प्रयत्न करुयात...
*दिसला वणवा तर १९२६ ला फोन लावा*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...