Sunday, January 22, 2023

 *मित्र का असावेत* *आणि कसे असावेत*....🙏🌹


*एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.* 
*सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?* 
*स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?*
*माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.*
*सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?*
*माकड : नाही महाराज.*
*सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.*
*माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.*
*सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.*
*या कथेचे सार.*
*एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.*
*म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.*
*विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.*
 *Dont worry* 
 *Be happy*

मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो, मित्र कोणत्या जाती धर्मातील, परिवारातला आहे किंवा असावा असे काही नसते * कधी कधी मात्र *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र आडाणी पण चालतो* *मात्र त्याची विचाराची उंची किती असावी? कदाचीत काकणभर आपल्याला सरस असावी* *त्याची नीतिमत्ता,त्याचे ज्ञान,त्याची निष्ठा प्रेम किती असावे?*कदाचित* *आपल्या आपल्याला ही लाजवेल असे असावे* त्याची आर्थिक स्थिती कदाचित आपल्या पेक्षा कमी असावी पण वेळेला आपल्यावर जीव ओवाळून टाकणारा मित्र असावा. *त्याला जात धर्म, वर्ग कधीच नसतो...*
 *कारण मित्र मित्रच असतो*। 
       
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹



*🌺समाजात हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा...!!!*

*🌺या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , प्राब्लेम नाहीत . ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो...!!!* 

*🌺कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं . आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं .इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे...!!!*

*🌺मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...!!!*

*🌺काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...!!!*

*🌺चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...!!!*

*🌺शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं...!!!*

*🌺शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...!!!*

*🌺म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...!!!*

*🌺आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!!!*

*🌺आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...!!!*

*🌺ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत. कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?...!!!*

*🌺

 🙏 *देवा!तुझा खेळ संपव आता* 🙏

*खेळ सारे खेळून झाले.जुने फोटो बघून झाले जुने दिवसही जगून झाले सक्तीच्या सुट्ट्या नको बाप्पा देवा, तूझा खेळ संपव आता..*

*कंटाळा आला भितीयुक्त स्वच्छतेचा सॅनिटायझर अन् मास्कचा घरात कोंडून बसण्याचा खोटंखोटं हसण्याचा संकटाला घे आवरता देवा, तूझा खेळ संपव आता..*

*नव्या पिढीच्या स्वप्नांसाठी मांडलेल्या अर्ध्या डावांसाठी हातांवरच्या पोटासाठी देवा, तूझा खेळ संपव आता..*

*जगाचा धीर खचण्याआधी सहनशक्ती संपण्याआधी तुझ्यावर प्रश्न उठण्याआधी देवा, तूझा खेळ संपव आता..*

*नाही म्हणणार मी,वेळच नाही कुटूंब,नात्यांना न्याय देईन पूरता निसर्ग,सृष्टी चे करेन मी रक्षण या कोड्याच उत्तर सांग ना आता देवा, तूझा खेळ संपव आता..*

*दिली तेवढी शिक्षा पूरे चुका आमच्या कळाल्या बरे मन, विचारही शुद्ध ठेवेन रे हाताला स्वच्छ करता करता वचन आम्ही देतो तुजला देवा, तूझा खेळ संपव आता..*


काही राहिलं तर नाही ना !!!


🌀 *जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...*
*"काही राहिलं तर नाही ना?”*

🌀 *वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते*
*"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*

🌀 *खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला*
*"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*

🌀 *लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते*
*“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*

🌀 *६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* 
*"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”* 

🌀 *स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो*
*“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.* 
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*

🌀 *एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. ..... 🙏*

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

: 🌳🌵🌹🌳🌵🌹🌳🌵🌹🌳🌹

*समाजात आपली पत आणि ऐपत पाहून वागण्याचा प्रयन्त करा, नाहीतर समाजात तुम्ही कितीही श्रीमंत अथवा गरीब असा पण तुही लोकांशी कसे वागता, बोलता, राहाता आणि प्रत्यक्ष कसे वागता यावर तुमची समाजात किंमत कळते हे तुम्हाला नाही कळत कारण त्यावेळी तुम्हाला साधन संपत्तीची नशा आलेली असते, परंतु समाजातील लोकांना नक्कीच कळत असते तुही कसे आहात याचे तुम्ही भान ठेवा...!!!*   
           
*आपली पत_ ही आपल्या आचरणावर अवलंबून असते आणि आपली ऐपत_ ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पत आणि ऐपत असल्याशिवाय जगण्याला काही अर्थच उरत नाही. पत नसलेली माणसे नेहमी अडचणीत येतात...!!!*

*आयुष्यातील सगळीच कामे ही आपल्या कुवती प्रमाणेच करावी लागतील असे नाही, काही कामे आपल्या आवाक्याबाहेरील असतात, तरीही ती करणे भाग असते, अशा वेळी आपली पतच उपयोगी पडते....!!!*
 
*समाजात आपली पत राखण्यासाठी आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असाव लागते, पण एवढ्यावरच भागत नाही, तर आपणही दुसऱ्याच्या मदतीला धावून जावे लागते, दुसऱ्यासाठी वेळ काढावा लागतो, तरच आपल्या वेळेला समाज धावून येतो, यालाच पत म्हणतात...!!!*
 
*मला कोणाचीच गरज नाही ! ही घमेंड आहे. आपले कोणावाचून काहीही अडत नाही ! हा मूर्खपणा आहे . सगळे जग स्वार्थी आहे, वेळ आल्यावर कोणीही कोणाचे नाही ! हे आपणच स्वार्थी असल्याचे लक्षण आहे...!!!*

*रोग्या विषयातुल्य लागे हे मिष्टान्न* 
 *तोंडाशी कारण चवी नाही l*
*तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण* *तयासी त्रिभुवन अवघे खोटे ll*
*समाजात पत नसलेल्या माणसाचे जीवन, आकाशात असताना दोर तुटलेल्या पतंगासारखे असते...!!!*
     
*आपली ऐपत| मात्र फक्त आपल्यालाच माहीत आहे, असे नसते, तर समाजालाही ती माहीत असते. प्रत्येक व्यवहारी माणूस हा आपल्या ऐपतीप्रमाणे व्यवहार करत असतो. संसार व्यवहारा शिवाय चालत नाही आणि व्यापार फायद्याशिवाय टिकत नाही...!!!*

*जाहिरातीचे तंत्र आपल्याला आपली ऐपत विसरायला भाग पडते. त्याच बरोबर आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला मत्सर आणि द्वेष_ आपल्याला ऐपतीच्या सीमा ओलांडायला भाग पाडतो. भावकीतील माणसांनी चार चाकी गाडी आणली, तर गरज नसताना आणि आपली ऐपत नसताना ती आपल्याला आवश्यक वाटू लागते...!!!*
 
 *आपल्या ऐपतीचा अशाच कारणांनी चुथाडा होत असतो. मॉल शॉपिंग, ऑनलाइन शॉपिंग, यांच्या भडक आणि प्रभावी जाहिरातीमुळे आज अनेक कुटुंबांचे अर्थशास्त्र कोलमडून गेले आहेत व उध्वस्त झाली आहेत..!!!* 

*आपल्या ऐपतीचा विचार न करता केलेली खरेदी, कधीच सुखकारक नसते. गाडीत बसल्यानंतर तिच्या हप्त्याचा आणि एव्हरेजचा विचार मनात असेल, तर त्या गाडीत बसण्याचे सुख आपल्याला कधीच लाभत नाही...!!!*

*आपली पत जपून वापरावी आणि आपली ऐपत नेहमी वर्धिष्णू असावी...! "पत आणि ऐपत" याचा हिशोब ज्याच्या डोक्यात नाही, त्याला समाजात आणि व्यवहारात सहज लुटले जाते...!!!*_.
 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...