Sunday, January 22, 2023

 *मित्र का असावेत* *आणि कसे असावेत*....🙏🌹


*एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.* 
*सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?* 
*स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?*
*माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.*
*सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?*
*माकड : नाही महाराज.*
*सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.*
*माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.*
*सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.*
*या कथेचे सार.*
*एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.*
*म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.*
*विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.*
 *Dont worry* 
 *Be happy*

मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो, मित्र कोणत्या जाती धर्मातील, परिवारातला आहे किंवा असावा असे काही नसते * कधी कधी मात्र *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र आडाणी पण चालतो* *मात्र त्याची विचाराची उंची किती असावी? कदाचीत काकणभर आपल्याला सरस असावी* *त्याची नीतिमत्ता,त्याचे ज्ञान,त्याची निष्ठा प्रेम किती असावे?*कदाचित* *आपल्या आपल्याला ही लाजवेल असे असावे* त्याची आर्थिक स्थिती कदाचित आपल्या पेक्षा कमी असावी पण वेळेला आपल्यावर जीव ओवाळून टाकणारा मित्र असावा. *त्याला जात धर्म, वर्ग कधीच नसतो...*
 *कारण मित्र मित्रच असतो*। 
       
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹



*🌺समाजात हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा...!!!*

*🌺या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , प्राब्लेम नाहीत . ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो...!!!* 

*🌺कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं . आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं .इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे...!!!*

*🌺मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...!!!*

*🌺काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...!!!*

*🌺चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...!!!*

*🌺शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं...!!!*

*🌺शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...!!!*

*🌺म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...!!!*

*🌺आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!!!*

*🌺आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...!!!*

*🌺ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत. कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?...!!!*

*🌺

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...