*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...**"काही राहिलं तर नाही ना?”*
*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते**"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*
*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला**"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*
*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते**“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*
*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* *"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”*
*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो**“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.*
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*
*एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. .....
*









: 





















*समाजात आपली पत आणि ऐपत पाहून वागण्याचा प्रयन्त करा, नाहीतर समाजात तुम्ही कितीही श्रीमंत अथवा गरीब असा पण तुही लोकांशी कसे वागता, बोलता, राहाता आणि प्रत्यक्ष कसे वागता यावर तुमची समाजात किंमत कळते हे तुम्हाला नाही कळत कारण त्यावेळी तुम्हाला साधन संपत्तीची नशा आलेली असते, परंतु समाजातील लोकांना नक्कीच कळत असते तुही कसे आहात याचे तुम्ही भान ठेवा...!!!*
*आपली पत_ ही आपल्या आचरणावर अवलंबून असते आणि आपली ऐपत_ ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पत आणि ऐपत असल्याशिवाय जगण्याला काही अर्थच उरत नाही. पत नसलेली माणसे नेहमी अडचणीत येतात...!!!*
*आयुष्यातील सगळीच कामे ही आपल्या कुवती प्रमाणेच करावी लागतील असे नाही, काही कामे आपल्या आवाक्याबाहेरील असतात, तरीही ती करणे भाग असते, अशा वेळी आपली पतच उपयोगी पडते....!!!*
*समाजात आपली पत राखण्यासाठी आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असाव लागते, पण एवढ्यावरच भागत नाही, तर आपणही दुसऱ्याच्या मदतीला धावून जावे लागते, दुसऱ्यासाठी वेळ काढावा लागतो, तरच आपल्या वेळेला समाज धावून येतो, यालाच पत म्हणतात...!!!*
*मला कोणाचीच गरज नाही ! ही घमेंड आहे. आपले कोणावाचून काहीही अडत नाही ! हा मूर्खपणा आहे . सगळे जग स्वार्थी आहे, वेळ आल्यावर कोणीही कोणाचे नाही ! हे आपणच स्वार्थी असल्याचे लक्षण आहे...!!!*
*रोग्या विषयातुल्य लागे हे मिष्टान्न*
*तोंडाशी कारण चवी नाही l*
*तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण* *तयासी त्रिभुवन अवघे खोटे ll*
*समाजात पत नसलेल्या माणसाचे जीवन, आकाशात असताना दोर तुटलेल्या पतंगासारखे असते...!!!*
*आपली ऐपत| मात्र फक्त आपल्यालाच माहीत आहे, असे नसते, तर समाजालाही ती माहीत असते. प्रत्येक व्यवहारी माणूस हा आपल्या ऐपतीप्रमाणे व्यवहार करत असतो. संसार व्यवहारा शिवाय चालत नाही आणि व्यापार फायद्याशिवाय टिकत नाही...!!!*
*जाहिरातीचे तंत्र आपल्याला आपली ऐपत विसरायला भाग पडते. त्याच बरोबर आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला मत्सर आणि द्वेष_ आपल्याला ऐपतीच्या सीमा ओलांडायला भाग पाडतो. भावकीतील माणसांनी चार चाकी गाडी आणली, तर गरज नसताना आणि आपली ऐपत नसताना ती आपल्याला आवश्यक वाटू लागते...!!!*
*आपल्या ऐपतीचा अशाच कारणांनी चुथाडा होत असतो. मॉल शॉपिंग, ऑनलाइन शॉपिंग, यांच्या भडक आणि प्रभावी जाहिरातीमुळे आज अनेक कुटुंबांचे अर्थशास्त्र कोलमडून गेले आहेत व उध्वस्त झाली आहेत..!!!*
*आपल्या ऐपतीचा विचार न करता केलेली खरेदी, कधीच सुखकारक नसते. गाडीत बसल्यानंतर तिच्या हप्त्याचा आणि एव्हरेजचा विचार मनात असेल, तर त्या गाडीत बसण्याचे सुख आपल्याला कधीच लाभत नाही...!!!*
*आपली पत जपून वापरावी आणि आपली ऐपत नेहमी वर्धिष्णू असावी...! "पत आणि ऐपत" याचा हिशोब ज्याच्या डोक्यात नाही, त्याला समाजात आणि व्यवहारात सहज लुटले जाते...!!!*_.










No comments:
Post a Comment