Wednesday, February 8, 2023

 *हळू हळू एक एक शब्द वाचा*

*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*

*"अश्रु"* सांगून जाते, *"दुःख"* किती आहे ?

*"विश्वास"* सांगून जातो, *"जोडीदार"* कसा आहे?

*"गर्व"* सांगून जातो, *"पैशाचा माज"* किती आहे?

*"संस्कार"* सांगून जातात, *"परिवार"* कसा आहे?

*"वाचा"* सांगून जाते, *"माणूस"* कसा आहे?  

*"संवाद"* सांगून जातात, *"ज्ञान"* किती आहे?

*"ठेच"* सांगून जाते, *"लक्ष"* कुठे आहे?

*"डोळे"* सांगून जातात, *"व्यक्ती"* कशी आहे ?

*"स्पर्श"* सांगून जातो, *"मनात"* काय आहे ?

आणि 

*"वेळ"* दाखवते, *"नातेवाईक"* कसे आहेत.

भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा *पाचवा खांद्यावर* असतो. 

संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की *" राम नाम सत्य है "..*

           माणसाची *कदर* करायची असेल तर *जिवंतपणीच* करा. 

कारण *तिरडी* उचलण्याच्या वेळी *तिरस्कार* करणारे सुद्धा *रडतात.* 

मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची *प्रथा* आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी *व्यथा* आहे. 
*म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या.*

मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..
   
        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 
कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 

*चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं ..*🙂
💐🙏🙏💐

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

-----स्वामी कृपा--------
           *निमंत्रण*👏🏼
        *चि.,पतंग*
श्री.पेपरवाला यांचे चिरंजीव...
                  💑
       *चि.सौ,का.दोरी*
 श्री,व सौ, फिरकीबेन यांची कन्या
      *यांच्या शुभ विवाह*
       15/1/2020 रोजी, सर्व रहातेकरांच्या साक्षीने, DJ, हलकडी, च्या गजरात संपन्न होणार आहे, 
  तरी आपण सर्वांनी गोड गोड आशीर्वाद देण्यासाठी यावे,
*ठिकाण -- निळे आकाश*
*मु,पो, गच्ची जि.टेरिस*

टीप- गुळाचे व साखरीचे आहेर स्वीकारले जाणार नाही,,

  *तुमचे गोड बोलणे हाच आमचा आहेर*💐

   *आपले नम्र*-तीळ, गूळ,😀 
---------------------------------------- 
  *मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्या*
-----------------------------------
*तीळ गूळ घ्या रोज गोड गोड बोला*
--------------------------------------

 एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'
अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.
मनाचा एवढा हळवेपणा नवरा - बायकोच्या नात्यामध्ये नाही हो येत. तिथे मित्रच असावा लागतो. कारण इतर कुठल्यही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्या बरोबर मानसिक, शारिरीक, कौटुंबीक आणि सामाजीक बंधन पण येतात. ह्या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळे कसली बंधनही नाहीत. आणि किंबहूना ती तशी नसावीतही. वाट्टेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो मोकळे होउ शकतो. तिथे स्त्री - पुरूष, जात - पात काही नाही आडवे येत. मनसूबा बनून जातो आणि मन आनंदी होतं.
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं अस मी समजतो. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आनंद आनंद म्हणजे काय हो, अहो अशी नाती जोडणं असे मनसुबे जुळवणं हाच आनंद.
लक्षात ठेवा तोडणं सोप आहे पण जुळवणं आणि टिकवणं कठीण.
- पु. ल. देशपांडे.

*बोधकथा*

*व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता,.* *ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे,.*

*एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे,.* *यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल,.* *सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे,.* *हे जाणण्यास उत्सुक झाला..!*

*बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल..!*

*एवढं सांगताच एकच कल्ला झाला,.* *जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला,.* *काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून,.* *वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत,.*
*असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही..!*

*सर्व शांत झाल्यावर *बॉसने सांगितले की,. शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. तोच विजयी ठरेल, असे मी बोललो,. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही..!* 

*तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर,.* *प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते..!*

*तात्पर्य* :- *यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही,.* 
*इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो..!*

*इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल..!*

 कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?

 एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........

खरं तर या ओळी एरवी केवळ एका हळव्या प्रेमप्रकरणा नंतर... ताटातूट..विरह.... ...एवढ्या पुरत्या जाणवतात..
पण आता..? या क्षणाला...? या दिवसात ???

खरंच...कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई... भाऊ..बहिणी, भाच्चे..पुतणे... रोज भेटणारे मित्र...ऑफिस मधले सहकारी...अगदी स्वयंपाकाच्या मावशी...ड्रायव्हर....ही रोजची घरातली माणसं.....कधी भेटतील आता.? माहित नाही...

म्हणूनच कायम वाटतं.....प्रत्येक भेटीत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत...काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद ?...आपलीच तर असतात माणसं...!! 

तुम्ही ज्यांना रोज भेटता त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ? की तुम्हाला आठवण येते आहे त्यांची....?

मला खूप आठवण येते आहे सगळ्यांची...सगळ्यांना भेटावसं वाटतं आहे......सगळी नावं लिहीत नाही..कारण त्यांना माहितीच आहे की आपल्याला आठवण येते आहे एकमेकांची...

कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...!!

काळजी घ्या..♥️♥️

निसर्गराजा गणपती - कड्यावरचा गणपती - माथेरान

मिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने माथेरानच्या खडकांमध्ये 100फुटी विशाल गणपती साकारला.

श्रद्धा – अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न. काहींना माणसांमध्ये देव असतो. तर काही ओबडधोबड खडकांतुन मुर्ती घडवतात. 
कधी घरी विकत आणलेल्या टोमॅटो किंवा नारळाचा आकार गणपतीसारखा असल्यावर हलकासा का होईना मनात आनंद निर्माण होतो.
नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचं इंजिन चालवणा-या राजाराम खडे या माणसाला आसपासच्या कड्यांमध्ये गणपतीचा आकार भासला.
आणि भक्तिभावातुन त्यांनी साकारलेला ‘कड्यावरचा गणपती’ आज माथेरानला जाणा-या सर्व पर्यटकांचं एक आकर्षण आहे.
राजाराम खडे हे नेरळ-माथेरान दरम्यान जी मिनी ट्रेन धावते ती ट्रेन चालवणारे एक मोटरमन.
१९९८ पासुन ते मिनी ट्रेन चालवत होते 
मिनी ट्रेन चालवताना पेब किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा. या कड्यास ‘मिडाचा खडा’ असं नाव होतं. 
या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यात गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा.
एकदा नेरळहून ट्रेन चालवताना राजाराम दादा चालवत असलेल्या इंजिनात एक उंदीर शिरला.
 ट्रेन मिठाच्या कड्याच्या इथे आल्यावर तो उंदीर इंजिनमधुन टुणकन उडी मारुन बाहेर पडला. 
राजाराम यांना हा दैवी संकेत वाटला. त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले. 
निरखुन पाहिल्यावर त्या खडकांमध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला. राजाराम अस्वस्थ झाले. बेचैन झाले. त्यांना काहीतरी करावं, अशी इच्छा झाली.
राजाराम दादांनी नेरळ-माथेरानला राहणा-या स्थानिक नागरीकांना कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना सांगीतली.
रेल्वेमध्ये काम करत असलेल्या सहकर्मचा-यांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन हे सांगीतले. सगळ्यांनी राजाराम दादांना साथ दिली. 
आणि २००४ मध्ये राजाराम दादांसह सर्वांनी कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली.
सुरुवातीला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने कड्यावरील खडकांना गणपतीच्या तोंडाचा आकार देण्यात आला. 
नंतर गणपतीचे हात आणि हातांमध्ये असणारी आयुधं खडकांमध्ये निर्माण केली गेली. 
जवळपास चौदा वर्षानंतर २०१८ साली ५२ फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला.
गणपतीच्या पायाखाली भव्य असा उंदीर सुद्धा बनवण्यात आला. 
लोकांना दर्शन घेता यावं म्हणुन कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर बनवण्यात आलं असुन भव्य अशा गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणरायाला ‘निसर्गराजा गणपती’ हे नाव दिले गेले आहे.
माथेरानजवळ असणारा पेबचा किल्ला अर्थात विकटगडला वर्षभरात असंख्य गिर्यारोहक भेट देतात.
विकटगडावर जायच्या आधी गिर्यारोहक या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे वाटचाल करतात. 
राजाराम दादांच्या गणपतीवरील श्रद्धेने साकार झालेला हा भव्यदिव्य गणपती निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेल्या कलाकृतीचं प्रतीक आहे.
राजाराम दादा आज सेवानिवृत्त झाले असले तरी कड्यावरच्या गणपतीवर रंगरंगोटी मारणं, त्याची निगा राखण्याचं काम ते स्वखर्चाने आत्मीयतेने करत असतात.
लोकं जेव्हा श्रद्धेने येऊन दर्शन घेतात, तेव्हा इतकी वर्ष केलेल्या मेहनतीची पोचपावती त्यांना मिळते.
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावरून माथेरान ला जायला टॅक्सी मिळतात, टॅक्सी नी गेल्या वर अर्ध्या घाटात कड्यावरचा गणपती व पेब किल्ल्या कडे माथेरान ट्रेन च्या ट्रॅक वरून जातो अर्ध्या तासात आपण गणपती जवळ पोहचतो.
- पराग उनकुले

 🎂*दोन तासात लग्न समारंभ आटपायची*

*उद्धव ठाकरेची नियमावली..* 🤔😷

 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे
2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे
3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10 ऐवजी 3 मंत्र म्हणण्याची अट
4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2 मिनिटे दिली जातील
5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल 
6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील
7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10 मिनिट दिले जातील, 😭😭🙄🙄 त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. 🏃🏃 🚗

नियमावली संपली..!
😏😏😃😃🤦🏻‍♂️

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...