Monday, January 9, 2023

 *किती देखणी असतात ना नाती*


टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी *आई*
घोडा घोडा करणारे *बाबा*
बाळाला मांडीवर घेऊन बसणारी *आत्या*
न रागावता लाड करणारी *मावशी*
'मुलीला मांडवात घेऊन या' चा पुकारा झाल्यावर
डोळे भरून येणारे *मामा*

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत
भरल्या आवाजात 'येत जा गं घरी' म्हणणारी *काकू*
 नि गाडी वरून फिरवायला नेणारा *काका*

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी *मैत्रिण*
आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची मुलगी '
असं फोनवर सांगणारी
प्रेमळ *सासू,*

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा *नवरा*
आणि
'आमटी फक्कड झालीय गं
माझ्या आईची आठवण करून दिलीस' म्हणणारा
*सासरा*

ऑफीसातून परतल्यावर 'बस घटकाभर' म्हणत
वाफाळता चहा पाजणारे
आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे
*शेजारी*

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी *पत्नी*

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे *बाबा*
आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी
नातवाला फिरवून आणणारे *आबा*

फेसबुकवर चिडवणारा
पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा *मेहुणा*

इकडे तिकडे पळत हैराण करणार्या नातवाला
गरमागरम वरण भात मायेने भरवणारी
*आजी*

या सगळ्या सुख दुःखात सामील होणारा *मित्र परिवार*

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास...!!!
         
हसत जगा आयुष्य खूप सुंदर आहे...✍

*नाती जोडा नाती जपा*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला ?

 *कसे पहाल तुमच्या ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला ?*

गुगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज” नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडायचं आहे. एकदा का ही माहिती निवडून झाली की तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
*Join our Facebook page*👇

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका...

 बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘हा’ नंबर करा डायल


तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.

अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते..?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.

सौदामिनीतंत्र

भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५ प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्‌’ वीज. (पाश्च्यात शस्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)

२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.

३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’ हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.

४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.

५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.
वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.

वरील माहीती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंध मधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले त्याबद्यल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहीली तर थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्यलचा एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहीतीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक अधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एके काळी होती असे मला आढळून आले आहे.” 
             आजच्या शिक्षण पद्धती विषयी श्री वझे म्हणतात की, "इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हिच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली." ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही.

--स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण तयारी--

 *🇮🇳स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण तयारी*

*┉┅━━━━━━•◆•━━━━━━┅┉*
*🔖विद्यार्थी भाषणे*
*🔖घोषवाक्ये*
*🔖निमंत्रण पत्रिका*
*🔖 देशभक्तीपर MP3 गीते*
*🔖 देशभक्तीपर रिमिक्स*
*🔖सूत्रसंचालन*
*🔖स्फूर्तीगीते*
*🔖आभार प्रदर्शन*
*🔖रांगोळी*
*🔖फलकलेखन*
*┉┅━━━━━━•◆•━━━━━━┅┉*
*┉┅━━━━━━•◆•━━━━━━┅┉*

*प्लॅस्टिक : बंदी व पर्याय*

  जे प्लॅस्टिक सध्या चर्चेचा विषय बनले आहे त्याचा शोध 1885 साली अलेक्झांडर पार्क याने लावला व त्याला सुरुवातीला पार्कसाईन असे संबोधले गेले. त्यानंतर त्याला सेल्युलिड असे म्हटले गेले.1965 ते 1985 या दरम्यान इंजिनिअरींग प्लास्टिकचा उदय झाला.प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी विकास आणी तन्त्रज्ञात मोठा बदल झाला. चांगला टिकाऊपणा व जुळवून घेण्याची क्षमता यामुळे प्लास्टिकची मागणी वाढली.


        प्लॅस्टिक हा एक उपयुक्त पदार्थ आहे. तो पेट्रोरसायन व्यवसायातील टाकाऊ गोष्टीतून निर्माण करण्यात आला.प्लॅस्टिकमुळे लाकूड , धातू व काच याचा वापर कमी होऊ लागला.त्यामुळे बरीच वृक्षतोड थांबली. खनिज संपत्तीची बचत झाली.इतर वैज्ञानिक व्यापारी आणि औद्योगिक उपयोग लक्षात घेता प्लॅस्टिक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला.

        प्लॅस्टिकने गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आकृष्ट केले. पावसाळ्यात अनेकांच्याझोपडय़ांवर प्लॅस्टिक पेपर आढळू लागले. अनेकांच्या पायात प्लास्टिकच्या चपला दिसू लागल्या.प्लास्टिकपासून देवाच्या गळ्यातील हार बनवले जाऊ लागले. यावरून अल्पावधीत प्लॅस्टिकने सर्वसामान्य माणसाच्यापायापासून देवाच्या गळ्यापर्यंत स्थान पटकावले.

       अनेक वर्षांपासून प्लास्टिकने सर्वांचेच जीवन व्यापून टाकल्यामुळे सध्याचे युग हे *प्लॅस्टिक युग* आहे असे वाटू लागले.प्लॅस्टिकचा शोध जरी 1855 साली लागला असला तरी भारतात त्याचा वापर शंभर वर्षांनंतर म्हणजे अंदाजे 1955 नंतर होऊ लागला. प्लॅस्टिक जसे मानवाला वरदान ठरले तसेच त्याच्या अतिवापरामुळे ते शाप ठरले आहे. ' अति तेथे माती ' असे म्हटले जाते ते खरे आहे. वापरून टाकलेले प्लॅस्टिक हजारो वर्ष मातीत गाडले गेले तरी ते नष्ट होऊन मातीशी एकरूप होत नाहीत. ते नष्ट तर होत नाहीचउलट जमीन नापीक करते. प्लॅस्टिक जाळून नष्ट करायचे म्हटले तर त्यामुळे हायड्रोकार्बन इत्यादी विषारी वायू तयार होतात. ते मानवासाठी धोकादायक असतात.

                      *प्लॅस्टिक निर्मूलन भारतापुढे आव्हान*

           परदेशात कोणत्याही वस्तूची निर्मिती करतानाच त्याची विल्हेवाट कशी लावायची ? याबाबत विचार केला जातो. जगात 1855 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू असला तरी प्लास्टिकचा सुयोग्य वापर , पुनर्वापर व कचऱ्याची विल्हेवाट या संदर्भात योजना आखल्या आहेत. तेथील कायदे जसे कडक आहेत तसे नागरिक सुज्ञ तर आहेतच परंतु पर्यावरण रक्षणास प्राधान्य देणारे असल्याने प्लॅस्टिकमुळे फार मोठ्या समस्या निर्माण होत नाहीत.याउलट भारतात 1955 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला असला तरी इतर देशांपेक्षा भारतात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

            प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्या ही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.एका पाहणी नुसार नुसत्या मुंबईत एका दिवसात शंभर दशलक्ष पिशव्या वापरल्या जातात. वापरून झाल्यानंतर या पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात. देशात दररोज पंधरा हजार तीनशे बेचाळीस टन इतका प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो.त्यापैकी चाळीस टक्के प्लॅस्टिक कुठेहीसंकलित न होता निसर्गात पडून राहते. इतके प्लॅस्टिक इतरत्र पसरले तर किती भयानक स्वरूप प्राप्त होईल याची जाणीव झाल्यामुळे देशात 2000 साली घनकचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी कायदा आणि 2011 साली प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानुसार पातळ पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.तरीसुद्धा अशा पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कचऱ्यात टाकलेल्या हया पिशव्या गटारातून समुद्रात जातात.गटारे तुंबतात. 25 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात जो महाप्रलय झाला त्याचे प्रमुख कारण पातळ पिशव्याच होत्या. या महाप्रलयात अनेकांचे बळी गेले व त्यानंतर रोगराई पसरली.

          अनेकजण घरातील उरलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचऱ्यात टाकतात. गाई - म्हशी कचऱ्यात पडलेल्या पिशव्यांसह अन्न खातात. त्यामुळे प्राण्यांच्याजिवाला धोका निर्माण होतो. काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे दहा हजार जनावरे मृत्युमुखी पडली. आपण गाईला देव मानतो.एखाद्या ठिकाणी गोहत्या झाली तर दंगल उसळते. मग आपल्या हातून गोहत्या होऊ नये असे वाटत असेल तर उरलेले अन्न कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकावे.प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून मासे , समुद्रपक्षी यांना सुध्दा धोका निर्माण होतो. लहान मुलांना प्लॅस्टिकची खेळणी दिली तर त्यांच्या आरोग्यासधोका निर्माण होतो.खाद्य पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवल्यास ते आरोग्यास धोकादायक ठरतात. 

                     *आनंदवन प्लॅस्टिकमुक्तीचे नंदनवन*

           अगदी प्लॅस्टिकची निर्मिती पूर्णपणे बंद केली व यापुढे प्लॅस्टिक वापरायचे नाही असे जरी कोणी ठरवले तरी यापूर्वी उत्पादन झालेले व वापरात असलेल्या तसेच वर्षानुवर्ष समुद्रकिनारे , नदीकिनारे , मैदाने , झाडे - झुडपे यामध्ये असलेले प्लॅस्टिक कसे नष्ट करायचे याबाबत ठोस उपाय योजणे गरजेचे आहे.

        ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ विकास आमटे यांनी आनंदवनात प्लॅस्टिकनगरीची स्थापना केली आहे.येथे प्लास्टिकचे तुकडे , सलाईन , सिरिंज , आइस्क्रीमचे कप , एक्सरे फिल्म , गुटख्याची रंगीबेरंगी वेष्टन , गाड्यांचे टायर , ट्यूब असा शहरातील घनकचरा म्हणून ज्यांची ओळख होते असा कचरा प्लॅस्टिक नगरीत जमा केला जातो. तो धुऊन निर्जंतुक केला जातो. यापैकी सलाईन ,सिरिंज आइस्क्रीमचे कप , थर्माकोल यापासून तेथे ' काँक्रिट मड ब्लॉक तयार केले जातात व त्यापासून घरे बांधली जातात. इतर वस्तूंपासून व्हिजिटिंग कार्ड , पडदे , लेटरबॉक्स तयार करतात. गाद्या , लोड बनवले जातात. ज्या कचऱ्याकडे घनकचरा म्हणून बघितले जाते अशा कचऱ्यापासून टाकाऊवस्तूंचा पुनर्वापर केला जातो.त्यामुळे पर्यावरण रक्षण होते , स्वच्छता राखली जाते , अनेकांना रोजगार उपलब्ध होतात.

            या उपक्रमातून एकाचवेळी अनेक गोष्टी साध्य होतात.घनकचऱ्याची अल्प खर्चात विल्हेवाट लावली जाते. टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण होतात.वस्तूंचा पुनर्वापर करण्याची नागरिकांना सवय लागते. वापरा आणि फेकून द्या ही प्रवृत्ती कमी होते. अनेकांना रोजगार मिळतो.कचऱ्यातून गोळा केलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तू वापरण्यास काही जणांना घृणा वाटत असेल परंतु त्या वस्तू स्वतः डॉ विकास आमटे व त्यांचे सर्व सहकारी वापरतात.

         अतिशय कमी भांडवलात होणाऱ्या वस्तूंचा वापर सुरुवातीला हॉस्पिटल , रेल्वे स्थानके , बस स्थानके , धर्मशाळा , आश्रमशाळा येथे करून त्याची उपयुक्तता पटल्यानंतर प्रत्येक घरात त्याचा वापर झाला तर प्लास्टिकच्या भस्मासुराला आवर घालणे फारसे कठीण जाणार नाही. प्लास्टिकच्या जाड पिशव्या व इतर प्लॅस्टिक गोळा करून रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगाला कच्चा माल म्हणून पुरवणारे भारतात दहा लाख व्यक्ती साधारणपणे ऐंशी हजार टन प्लॅस्टिक रोज गोळा करून चार हजार पाचशे रिसायकलिंग करणाऱ्या कारखान्यांना पाठवतात. परंतु पातळ पिशव्या गोळा करून विकायच्या म्हटल्या तर साधारणपणे चार हजार सहाशे पिशव्या गोळा करून साफ करून विकायच्या म्हटल्या तर त्या जेमतेम एक किलो भरतात व त्याचे फक्त दोन रुपये मिळतात. त्यामुळे कोणीही त्या गोळा करत नाहीत व अशा पिशव्याच पर्यावरण व आरोग्यास त्रासदायक ठरू शकतात. यासाठी नागरिकांनी पातळ पिशव्या वापरणे पूर्णपणे बंद करावे. घरात अथवा दुकानात स्टॉक असेल तर तो कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना द्यावा.

                                *नागरिकांची कर्तव्य*

               आरोग्य संवर्धन व पर्यावरण संरक्षण करायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. सर्व सामाजिक संस्थांनी येत्या सहा महिन्यांत सार्वजनिक मैदाने , समुद्रकिनारे , नदीकिनारे , मोकळ्या जागा , रेल्वे , एस.टी. इत्यादी ठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेले प्लॅस्टिक गोळा करून आनंदवन सारख्या संस्थाना द्याव्यात. त्या संस्था त्याचा सदुपयोग करतील. असे झाले तर भारतातील कानाकोपरा प्लॅस्टिकमुक्त होईल व ते सर्वांच्या हिताचे ठरेल. 

     *दिलीप प्रभाकर गडकरी*
        कर्जत - रायगड 

( 2018 साली *शिवसेनेतर्फे* "प्लॅस्टिक : बंदी व पर्याय " या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्ध्येत मला प्रथम क्रमांकाचे 31000. रुपयांचे पारितोषिक 01- 12- 2018 रोजी शिवसेनाभवन येथे भव्य समारंभात देण्यात आले होते. त्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या 36 निबंधांचे संकलन श्री हेमराज शाह यांनी पुस्तक रूपाने ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित केले त्यातील हा लेख )

 मी हिंदू . मी "ईश्वरा"ला मानतो. ईश्वराची असंख्य नावांनी स्तुती, उपासना करणे, हे आम्हा हिंदूंचे एक वैशिष्ट्य.


आमच्यात अनेक देवदेवतांची सहस्त्रनामे आहेत, असतात.

जसे, विष्णू सहस्त्रनाम, शिव सहस्त्र नाम, ललिता सहस्त्र नाम, गणपती सहस्त्र नाम, इत्यादी.

विष्णू सहस्त्र नाम, माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज, यांचे आणि म्हणून, अर्थातच माझेही, खूप आवडते आहे.

हजारो वर्षांपूर्वी, गंगेच्या किनाऱ्यावर शर पंजरी पडलेल्या भीष्मांनी युधिष्ठिराला विष्णूची सहस्त्र नामे सांगितली. आद्य शंकराचार्य यांनी त्या स्तोत्रावर भाष्य लिहिले.

------------------------------------------------------

बरे, मग ? आज हे अचानक काय मधेच ?

नाही, याची आज पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे, ....................

ते गांधींचे "प्रसिद्ध" आवडते भजन. तेच "रघुपती राघव ............. ईश्वर अल्लाह ...." वाले.

त्याचे काय ?

सांगतो.

हा विषय निघाल्यावर मी मुद्दाम , उत्सुकतेने, जिज्ञासेने पुन्हा एकदा, काळजीपूर्वक "विश्वं विष्णू ...........पासून .................सर्वप्रहरणायुधाय ........" पर्यंत बारकाईने वाचले. चुकुनसुद्धा चूक होऊ नये, हा उद्देश.

हेतू काय ?

हाच, की त्या हजार नावात "अल्लाह" हे नाव आहे का ? ते बघणे.

हुश्श ! अगदी पक्के कन्फर्म झाले, सहस्त्र नामांत "अल्लाह" नाव नाही, नाही, नाही !!

-----------------------------------------------------------------------

तर हं, आपण कुठे होतो ? "रघुपती राघव ........" ह्या हिंदूंच्या पवित्र, पारंपारिक भजनात गांधींनी वाटेल तशी मोडतोड करून, त्यात चक्क - "ईश्वर अल्लाह तेरो नाम ......" ही ओळ घुसडली.

ते मूळ भजन, जे लक्ष्मणाचार्य यांनी रचले होते असे आहे :

" रघुपति राघव राजाराम

पतित पावन सीताराम

सुंदर विग्रह मेघश्याम

गंगा तुलसी शालिग्राम

भद्रगिरीश्वर सीताराम

भगत-जनप्रिय सीताराम

जानकीरमणा सीताराम

जयजय राघव सीताराम.... ज्यात गांधींनी बेजबाबदार, विकृत, हिंदू विरोधी

मोडतोड केली.

आता प्रश्न असा, की गांधींना असे करण्याचा अधिकार कोणी दिला ? कोणीही नाही. असा अधिकार स्वतःकडे असल्याचे मानणे, हा उन्मत्तपणा झाला. अहंमन्यता झाली.

यातला भयानक प्रकार हा आहे, की ज्या "अल्लाह" च्या नावाने, आदेशाने, हजारो हिंदू मंदिरे पाडली, लुटली गेली, लक्षावधी हिंदू देवतांच्या मूर्ती फोडल्या गेल्या, मुस्लिमांकडून रोज पायदळी तुडवल्या जाण्यासाठी मशिदीच्या पायऱ्यात चीणल्या गेल्या, त्या अल्लाह चे नाव हा मनुष्य "ईश्वरा"ला देतोय ! खुशाल, बिनदिक्कत ? !

अरेच्चा ? जर "अल्लाह" हे "ईश्वरा"चे नाव होते , तर तैमुर, बाबर, पासून औरंगझेबा पर्यंत शेकडो वर्षे जो मंदिरांचा विध्वंस, मूर्तींची तोडफोड केली गेली, ती कशासाठी ? "त्यांना" माहित नव्हते, की अल्लाह ईश्वराचेच नाव आहे ? !!

दुसरे असे, की महम्मद घोरी, गझनी, बाबर, औरंगझेब, या सर्वांनी जे केले, ते एका दृष्टीने काहीसे क्षम्य ठरते, कारण, (गांधीजींच्याच भाषेत,) ते (बिचारे) त्यांच्या धर्मानुसार वागत होते ! पण गांधी ? ते ईश्वराला "अल्लाह" म्हणताना कुठल्या धर्मानुसार वागत होते ? !! कुठल्याही नाही. ते निव्वळ स्वतःच्या अहंकाराच्या गुर्मीत वावरत होते. नसलेल्या महानतेच्या तोऱ्यात वावरत होते. हिंदूंना वेठीला धरत होते.

गांधींचे हिंदू समाजाशी असे कोणते वैर होते, की त्यांनी शेकडो वर्षांचे अत्याचार, मंदिर विध्वंस , मूर्तीभंजन विसरायला लावून, हिंदूंना , स्वतःच्या "ईश्वरा"ला "अल्लाह" म्हणायला सांगावे ?

या भजनाचे विकृतीकरण करून, गांधींनी हिंदू समाजाच्या भळभळत्या जखमांवर मीठ चोळले. गांधींनी, हिंदूंना त्यांची मंदिरे पाडणाऱ्या, मूर्ती फोडणाऱ्या मुस्लीमा समोर अपमानित करून, कमरेत वाकून, कुर्निसात करून, "ईश्वरा"ला "अल्लाह" म्हणायला लावले !

हिंदू समाजाचा असा भयंकर अवमान करण्याची दुष्ट कल्पना औरंगझेबाला सुद्धा स्वप्नातही सुचली नसती.

झाले, तेव्हढे बस झाले. आता हे बघावे लागेल, की संपूर्ण भारतात, कुठेही, कधीही, "रघुपती राघव ......." हे भजन मूळ स्वरूपातच गायले जावे. त्यात चुकुनही "ईश्वर अल्लाह तेरो नाम ......" येता कामा नये. तो हिंदू समाजाचा असहनीय अपमान आहे.

ईश्वराला मुर्तीभंजकांचा "अल्लाह" म्हणणे ही विकृती आहे. हे थांबलेच पाहिजे.

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...