Saturday, June 11, 2022

तुळशीचे रोप बारमाही जगवण्यासाठी पाच नित्य सेवा...


 *🏡🌿आपल्याला अनेक घरात तुळशीची रोपे पाहण्यास मिळतात तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा हेरी लवकरच वाळून जाते आणि ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत.त्यातील पाच नियम मिळाले आपण जाणून घेणार आहोत.या नियमाचे अनुसरण केल्याने "विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न" होतात,तर सर्व देवी-*
*देवतांनाही या अनुषंगाने प्रसन्न करून घेता येते.*

 *१) 🏡🌿प्रथम सेवा :* 
सर्वप्रथम तुळशीच्या रोपाला रविवार व एकादशी वगळता दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे.म्हणजे पाणी कमीही नाही आणि जास्त ही नाही.जर तुळशीला अधिक प्रमाणात पाणी दिले तर रोप खराब होण्याची शक्यता असते. आपण तुळशीला एक दिवसाआड पाणी देत असाल तर योग्य होईल.पावसाळ्यात तर पाणी दोन दिवसानंतर दिले तरी चालते.*🌿रविवार आणि एकादशी या दिवशी तुळस श्री विष्णूंसाठी व्रत करते या दोन दिवस तुळस विश्राम करत असते.*

 *🌴🏡🌿द्वितीय सेवा :* 

तुळस चांगली टवटवीत राहण्यासाठी वेळोवेळी तुळशीच्या मंजिऱ्या तोडून तुळशी पासून वेगळी करत राहावे.अन्यथा तुळस आजारी पडून वाळून जाते.जोपर्यंत मंजिरी तुळशीच्या अग्रभागी म्हणजे रोपांच्या टोकांवर असते तोपर्यंत ती कष्टात असते. तुळशीची पाने मंजिऱ्या तोडण्यापूर्वी किंवा तुळशीला हात लावण्यापूर्वी तुळशीची आज्ञा घेणे आवश्यक आहे. *🌿रविवारी व एकादशीच्या दिवशी तुळस तोडण्याचे काम करू नये.*
*नखांनी तुळस कधीही तोडू नये.*

 *🌴🏡🌿तिसरी सेवा :* 

मासिक धर्माच्यावेळी स्त्रियांनी तुळशीपासून लांब राहावे. अन्यथा तुळस वाळण्याची शक्यता अधिक असते.

 *🌴🏡🌿चवथी सेवा :* 

तुळशीच्या वृंदावनाभोवती किंवा रोपांच्या सभोवती ओले.कपडे वाळत घालू नये.याशिवाय धुतलेल्या ओल्या कपड्यातील साबणामुळे, कपड्यात पांढऱ्या प्रकारच्या कीटकांचा किंवा जीवाणूंचा वास असतो.त्यामुळे तुळशीला देखील किड लागू शकते. बहुतेकवेळा असे दिसून आले आहे की धुतलेल्या कपड्यांमुळे तुळशीला कीड लागून तुळस काळी पडते आणि ती मरून जाते.

 *🌴🏡🌿पाचवी सेवा :* 

वातावरणाचा तुळशीवर खूप प्रभाव पडतो.जास्त थंडी किंवा उष्णतेमुळे तुळस खराब होते. म्हणून थंडीत तुळशीच्या सभोवती कापड किंवा काचेचे आच्छादन लावून तुळशीचे रक्षण करावे.
जोरदार पावसापासून तुळशीला संरक्षण द्यावे.नाही तर जास्त पाण्यामुळे तुळशीची रोपे कुजून तुळस मरून जाते.
देवाला नैवेद्य दाखवते वेळेस खाली पाण्याचा चौकोण काढून एक पाण ताटात नैवेद्द्यावर ठेवावे विष्णू प्रिय तुळशी ठेवल्याने नैवेद्य देवाला अर्पण होते.
*शब्दांकन*
*श्री दयानंद म. पिंगळे*

*🌿👏धन्यवाद इतिहासाचे साक्षीदार...*🙏
*🌹राजकारण नावाचा सकाळी टिव्हि पहाण्यापेक्षा लोकांना धार्मिक माहीती देणे हिच खरी सेवा आहे.खरा पंढरीचा पांडुरंग तुळशीत उभा आहे.रामकृष्ण हरी...🌹*

स्वा. सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द

 स्वा. सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द:


दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

यासह अनेक शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

*देवीची ओटी कशी भरावी ?*

*खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !*


*देवीची ओटी भरतांना,*

*१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?*

*‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.'*

*२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत.*

*अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.*

*आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.*

*इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.*

*ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.*

*उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.*

*३. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे रहावे.*

*४. देवीची ओटी भरतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ.*

*अ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते. हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.*

*आ. वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्‍याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.*

*इ. हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्‍या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्‍याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्‍याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते.*

*ई. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.'*

*५. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?*

*‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.*

*५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते; कारण जिवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प-अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जिवाकरता कार्य करणे अवलंबून असते.*

*६. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?*

*देवीला नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे.*

*देवतेप्रती भाव असणार्‍या आणि गुरुकृपायोगाप्रमाणे समष्टी साधना करणार्‍या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली, तरी चालू शकते; कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे. नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’*

*७.देवीला अर्पण केल्या जाणार्‍या खणाचा आकार त्रिकोणी का असतो ?*

*‘त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्‍तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजे ‘आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्‍ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*दत्तात्रेयांचे चोविस गुरू*

_________🌹 _________

आपल्या आसपासच्या पर्यावरणातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील कुणापासून काय घ्यायचे, काय घ्यायचे नाही याचे विवेचन अवधूतोपाख्यानात आहे.

*पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोल, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहा (भ्रमर), हरिण, मासा, पिंगळा (वेश्या), टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा सर्प, कोळी, कुंभारमाशी* ह्य़ा साऱ्यांच्या आचरणावरून विविध प्रकारची शिकवण आत्मसात केलेली आहे. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी त्यातील काही गुरू नक्की कसे वागायचे हे शिकवणारे आहेत. काही गुरू त्याज्य गोष्टी शिकवणारे आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~
*प्रथम गुरू पृथ्वी :-*
पृथ्वीपासून मला अनाकोष क्षमाशीलतेचे ज्ञान प्राप्त झाले. कारण पृथ्वीवर तुम्ही काहीही केले तरी ती सहन करते.
……………………………………
*दुसरा गुरू वायू :-*
वायूचा सर्वत्र संचार करूनही सुगंध व दरुगध कशानेच लिप्त होत नाही. सर्वाच्या शरीरात सारखेप्रमाणे राहते. त्याच्यापासून अलिप्त व समदर्शन हे ज्ञान प्राप्त झाले.
………………………………………
*तिसरा गुरू आकाश :-*
आकाशापासून अमर्याद मृदुत्व व सर्वसमावेशत्वाचे ज्ञान प्राप्त झाले.
………………………………………
*चवथा गुरू पाणी :-*
पाण्यापासून शुद्धता पावित्र्य व अभेदवृत्तीचे ज्ञान प्राप्त झाले.
………………………………………
*पाचवा गुरू अग्नी :-*
अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, रसनेन्द्रियावरही विजयो ज्ञान प्राप्त झाले.
………………………………………
*सहावा गुरू चंद्र :-*
चंद्र शुक्लपक्षात वाढतो व कृष्णपक्षात कमी कमी होत जातो, असे आपल्याला दिसते. पण प्रत्यक्षात चंद्राला काहीच फरक होत नसतो. तारुण्य व वार्धक्य ज्ञान शरीराच्या अवस्था आहेत आत्म्याच्या नाहीत. हे ज्ञान चंद्राकडून प्राप्त झाले.
………………………………………
*सातवा गुरू सूर्य :-*
सूर्याकडून अनासक्त परोपकार व उपाधीमुळे होणारी भेदप्रतीती हे ज्ञान प्राप्त झाले. उपाधीमुळे भेदप्रतीती म्हणजे सूर्याची विविध ठिकाणी विविध प्रतिबिंब त्या उपाधीमुळे वेगवेगळी दिसतात. तव्दतच आत्मतत्त्व एकच असून गुणसंगाने म्हणजेच उपाधीमुळे भेदमय दिसते.
………………………………………
*आठवा गुरू कपोल :-*
कपोल म्हणजे कबूतर. त्या कपोलाचे घरटे ज्या झाडावर होते त्या झाडाखाली पारध्यांनी जाळे टाकून कपोलाच्या पिल्लांना पकडले. इतक्यात त्यांची आई तिथे आली. तेव्हा पिल्लांच्या कळवळाने ती पण जाळ्यात अडकली. तेवढय़ातच कपोलही तिथे आला व कपोल तिला व पिल्लांना सोडवायला जाऊन स्वत:च त्यात अडकला. हे सर्व आसक्तीमुळे घडले. आसक्तीमुळे आपला घात होऊ नये म्हणून मी अनासक्तीचे ज्ञान कपोलापासून घेतले व अनासक्त झालो.
………………………………………
*नववा गुरू अजगर :-*
कोणत्याही चवीच्या आहारी न जाता विविध शात्मिकेत त्यात समाधान मानण्याचे ज्ञान मला अजगराकडून प्राप्त झाले.
………………………………………
*दहावा गुरू समुद्र :-*
बाहेर अथांग व आत गंभीर बाह्य़ संगाने क्षोभणारा. आपणही बाह्य़ विषयांती क्षोभ न होता परमात्माच्या चिंतनात गंभीर रहावे, हे समुद्राकडून शिकता आले.
………………………………………
*अकरावा गुरू पतंग :-*
दीपाच्या सौंदर्यावर मोहित होऊन दीपावर झेप घेऊन आपला प्राण गमावतो. तसे फसव्यामध्ये मायेच्या सौंदर्यावर आसक्त न होण्याचे ज्ञान मला पतंगाकडून मिळाले.
………………………………………
*बारावा गुरू मरा (मधुकुंद) :-*
फुलांना जराही न दुखावता मध गोळा करतो. तद्वत् एकावरच भार न टाकता कल्पा माधुकरी मागून उपजिविका करण्याचे ज्ञान मला भ्रमराकडून प्राप्त झाले.
………………………………………
*तेरावा गुरू हत्ती :-*
तो लाकडाच्या तीणीवर भुलून खडय़ात पडून पराधीन होतो तव्दत् स्त्री मोहाने येणारी पराधीनता टाळावी हे ज्ञान मला हत्तीकडून मिळाले.
………………………………………
*चौदावा गुरू मधमाशी :-*
संग्रह न करण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. कारण मधमाश्या मधाचा संग्रह करतात. मधमाश्यांना मारून शेवटी तो मध भिल्लच लुटून नेतात.
………………………………………
*पंधरावा गुरू हरिण :-*
पारध्याच्या नादलुब्ध तालाला भुलून हरिण पकडले जाते. म्हणून विकारो जनक गोष्टीपासून दूर रहाण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले.
………………………………………
*सोळावा गुरू मासा :-*
आमिषाच्या लोभाने गळाला अडकून प्राण गमावतो. म्हणून रसना जिंकून आत्मोन्नती साधण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले.
………………………………………
*सतरावा गुरू पिंगळा :-*
वेश्या देहविक्रीस तयार झाली पण गिऱ्हाईक न मिळाल्याने वैफल्य ग्रस्तेत तिला निवैद्य बुद्धी प्राप्त झाली. त्यात तिला जे गीत सुचले त्याचा अर्थ असा की अमंगल देहाचे विकार जरी क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा मात्र सदास्थिर मंगलमय असतो आणि तोच खरा नियंता पती आहे. त्यामुळे परपुरुषापासून मी सौख्याची अभिलाषा करणे किती मूर्खपणाचे आहे. त्यामुळे आता मला विधीवशात जे प्राप्त होईल त्यात मी समाधानी राहील. अशा दृढ निश्चयाने शांत झोपी गेली. त्यामुळे तिच्यापासून मी आत्यतत्त्वात स्थिर राहण्याचा बोध घेतला.
………………………………………
*अठरावा गुरू कुरार पक्षी :-*
आवडत्या वस्तूच्या साठय़ांमुळे मनुष्याला दु:ख प्राप्त होते हे मी अठरावा गुरू कुरार पक्षाकडून शिकलो. कुरार पक्षाच्या चोचीत मासाचा तुकडा होता. तोवर इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडत होते. पण तो तुकडा टाकून देताच तोच सुखी झाला.
………………………………………
*एकोणविसावा गुरू बालक :-*
बालकाला कसलीच काळजी नसलेल्या व आपल्यातच रममाण झालेल्या त्याच्याकडून मी आत्यावंदनात राहण्यास शिकलो.
………………………………………
*विसावा गुरू एक कुमारी :-*
तिच्यापासून एकांत सेवनाचा बोध मी घेतला. तो असा की त्या कुमारीला मागणी घालायला परगांवाचे पाहुणे आले होते. कुमारीचे आई-वडील घरी नव्हते. भोजनाची व्यवस्था करणे आहे म्हणून ती तयारी करू लागली. पण कंकणाचा आवाज होऊ लागला म्हणून तिथे फक्त एकच कंकण ठेवले व बाकीची काढून ठेवली त्यावेळी साळी काढताना होणारा आवाज बंद झाला. त्यापासून मी बोध घेतला की अनेकजण असले तर गडबड गोंधळ होतो व दोघे असले तर गप्पा-गोष्टी होतातच. म्हणूनच साधकाने एकांत सेवन करावा.
………………………………………
*एकविसावा गुरू शरकृत (बाण तयार करणारा कारागीर) :-*
बाण तयार करीत असताना त्यात तो इतका तल्लीन झाला होता की, त्याच्या समोरून वाजतगाजत राजाची मिरवणूक गेली तरी जराही विचलित न होता आपल्या कार्यात व्यस्त राहिला. त्याच्याकडून मी आत्मनंदात तल्लीन राहण्याचा बोध घेतला.
………………………………………
*माझा बाविसावा गुरू सर्प :-*
स्वत:चे घर नसलेला अनिकेत पण सदैव सावध राहून गुप्तपणे वावर करणारा प्राणी. त्याच्यापासून देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव ठेवून गृहादी संग्रहाच्या फांदात न पडता सदैवनाम स्मरणात सावध राहून साधना करावी हा बोध मी घेतला.
………………………………………
*तेविसावा गुरू कोळी (उर्णनाभी) :-*
स्वत:च्या बेंबीतून तंतू काढून स्वत:चे विश्व निर्माण करतो. त्यात इतरांना अडकवतो पण स्वत: मात्र अडकत नाही. परमेश्वरही याच मायेपासून विश्व निर्माण करतो. अज्ञानी जिवांना अडकवतो. पण स्वत: कधीच अडकत नाही हे ज्ञान मी त्यांच्याकडून घेतले.

*चोविसावा गुरू कुंभारमाशी :-*
आपल्या घरात कीटक आणून बंदिस्त करून ठेवते. कीटक भयाने कुंभारणीच्या चिंतनात मग्न होतो. त्यामुळे तो स्वत:च कुंभारमाशी बनतो.
~~~~~~~~~~~~~~~~~
 त्याच्यापासून हे ज्ञान प्राप्त झाले की सतत ईश चिंतनात केल्यास आपणही ईश्वराला मिळणार. ज्या गुरूंकडून मी जे शिकलो ते मी तुला सांगितले, पण स्वदेहाकडूनही खूप काही शिकलो. अनेक स्त्रिया असलेल्या पुरुषांची जशी ओढाताण होते तशीच ओढाताण माझा देह म्हणणाऱ्यांची इंद्रियांच्या विविध प्रकारच्या विषयांच्या ओढीमुळे होते. ते ध्यानात घेऊन मी विवेकवैराग्य धारण करण्याचे स्वदेहाकडून शिकलो. स्वत:ला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
*(अवधूतोपाख्यान- श्रीमद् भागवत- स्कंद अकरावा. पुष्प १८९, अध्याय ७)*
〰〰〰〰♦〰〰〰〰
*संकलन - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

*बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल*

 तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.


अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

*सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड*

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*यंत्रणा काम कशी करते?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.
➖➖➖➖ ➖➖➖➖

देशाची आणि शहरांची मूळ नावे

 आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का ?

 1. हिंदुस्थान, भारत किंवा भारताचे मूळ नाव - आर्यवर्त!
 2. कानपूरचे मूळ नाव कान्हापूर आहे.
 3. दिल्लीचे मूळ नाव इंद्रप्रस्थ आहे.
 4. हैदराबादचे मूळ नाव भाग्यनगर आहे.
 5. अलाहाबादचे मूळ नाव प्रयाग आहे.
 6. औरंगाबादचे मूळ नाव खडकी आहे.
 7. भोपाळचे मूळ नाव - भोजपाल!
 8. लखनौचे मूळ नाव लक्ष्मणपुरी आहे.
 9. अहमदाबादचे मूळ नाव कर्णावती आहे.
 10. फैजाबादचे मूळ नाव अवध आहे.
 11. अलीगडचे मूळ नाव हरिगड आहे.
 12. मिरजेचे मूळ नाव - शिव प्रदेश!
 13. मुझफ्फरनगरचे मूळ नाव लक्ष्मी नगर आहे.
 14. शामलीचे मूळ नाव श्यामलीच आहे.
 15. रोहतकचे मूळ नाव रोहितासपूर आहे.
 16. पोरबंदरचे मूळ नाव सुदामापुरी होते.
 17. पाटण्याचे मूळ नाव पाटलीपुत्र आहे.
 18. नांदेडचे मूळ नाव नंदीग्राम आहे.
 19. आझमगडचे मूळ नाव आर्यगड आहे.
 20. अजमेरचे मूळ नाव अजयमेरू आहे.
 21. उज्जैनचे मूळ नाव अवंतिका आहे.
 22. जमशेदपूरचे मूळ नाव काली मती!
 23. विशाखापट्टणमचे मूळ नाव विजत्रपश्मा आहे.
 24. गुवाहटीचे खरे नाव प्राग्ज्योतिषपुर आहे.
 25. सुलतानगंजचे मूळ नाव चंपानगरी आहे.
 26. बुरहानपूरचे मूळ नाव ब्रह्मपूर आहे.
 27. इंदूरचे मूळ नाव इंदूरच आहे.
 28. नश्रुलागंजचे मूळ नाव - भिरुंडा!
 29. सोनीपतचे मूळ नाव स्वर्णप्रस्थ आहे.
 30. पानिपतचे मूळ नाव पर्णप्रस्थ आहे.
 31. बागपतचे मूळ नाव - बागप्रस्थ!
 32. उस्मानाबादचे मूळ नाव धाराशिव (महाराष्ट्रातील) आहे.
 33. देवरियाचे मूळ नाव देवपुरी आहे. (उत्तर प्रदेशात)
 34. सुलतानपूरचे मूळ नाव - कुशभवनपूर
 35. लखीमपूरचे मूळ नाव लक्ष्मीपूर आहे. (उत्तर प्रदेशात)
 36. मुरेनाचे मूळ नाव मयुरवन आहे.
 37. जबलपूरचे मूळ नाव जबलीपुरम आहे
 38. गुलमर्गचे मूळ नाव गौरीमार्ग आहे
 39. बारामुल्लाचे मूळ नाव वर्हामुला आहे
 40. सोपोरचे मूळ नाव सुय्यापूर आहे.
 41. मुलतानचे मूळ नाव मुलस्थान आहे
 42. इस्लामाबादचे मूळ नाव तक्षशिला आहे
 43. पेशावरचे मूळ नाव पुरषापुरा आहे
 44. स्कर्दूचे मूळ नाव स्कंद आहे

 ही सर्व नावे मुघल आणि इंग्रजांनी बदलली आहेत.


 

ओम उच्चारण्याचे फायदे

 *"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*

-----------------------------------------------
रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.

 *कसे करावे ओम् उच्चारण?* 

ओम् उच्चारण करण्यासाठी आरामदाई स्थितीत बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या 
आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात 
व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. 
 फायदा
*ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :*
१)मानवी मनाची शुद्धता करणे.
२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.
*ओम् कार जप :*
अ......उ.....म् ………
अ......उ......म्.........
अ......उ.......म्……………..
*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण*
ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. 

*१. थायरॉईड -*
 ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. 
*२. अस्वस्थता -*
 तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. 
*३. तणाव -*
 यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
*४. रक्तप्रवाह -*
 यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 
*५. पचन -*
 ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. 
*६. स्फूर्ती -*
 ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. 
*७. थकवा -*
 थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. 
*८. झोप -*
 ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे. 
*९. फुफ्फुस -*
 ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. 
*१०. पाठीचा कणा -*
 ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवते.

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...