*"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*
------------------------------ -----------------
रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.
*कसे करावे ओम् उच्चारण?*
ओम् उच्चारण करण्यासाठी आरामदाई स्थितीत बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या
आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात
व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा.
फायदा
*ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :*
१)मानवी मनाची शुद्धता करणे.
२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.
*ओम् कार जप :*
अ......उ.....म् ………
अ......उ......म्.........
अ......उ.......म्……………..
*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण*
ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात.
*१. थायरॉईड -*
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो.
*२. अस्वस्थता -*
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.
*३. तणाव -*
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
*४. रक्तप्रवाह -*
यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
*५. पचन -*
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
*६. स्फूर्ती -*
ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
*७. थकवा -*
थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.
*८. झोप -*
ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.
*९. फुफ्फुस -*
ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
*१०. पाठीचा कणा -*
ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवते.
No comments:
Post a Comment