*खूप चांगले लिखाण आहे.कंटाळा न करता जरुर वाचा आणि विचार करा......................*
महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. या युध्दामध्ये कौरवांच्या बाजूने व पांडवांच्या बाजूने जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी कधीच झाली नव्हती. युद्ध संपल्यानंतर याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसायला लागली होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवाच विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. एखाद दुसरा फक्त पुरुष दिसत होता.
महाराणी द्रौपदी हस्तिनापुरातील
महालात दु:खद अंत:करणात निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आला. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती त्याला म्हणाली, "सख्या, असा तर मी कधी विचारच नव्हता केला. हे असं कसं झालं?
कृष्ण म्हणाला, "पांचाली, नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता नां? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता."
द्रौपदी म्हणाली, "कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?"
योगेश्वर कृष्ण म्हणतात, ''नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव
सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती फळे समोर येतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही."
द्रौपदी विचारते, "कृष्णा, मग ह्या युध्दाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. असं तुला म्हणायचं आहे कां?"
कृष्ण म्हणतात, "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!"
द्रौपदी विचारते, "कृष्णा, मी काय करू शकत होते?"
कृष्ण म्हणतो, "तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.
आपले शब्दच आपल कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण *परिवाराला* *भोगावे लागतात.*
जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जीभेत वीष आहे."
(ही एक बोधकथा आहे.यातून आपण काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.)
*म्हणून शब्द जपून* वापरा.सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे युद्ध चालू आहे. आपात्कालीन व्यवस्थापन चालू आहे. लोकांचे जॉब गेले आहेत , आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे, आपल्या लेखनीतून, वाणीतून, जीभेतून निघालेले शब्द आपल्याला संकटात टाकू शकतात. अनेक अडचणी निर्माण करू शकतात. अनेक वर्षांचे संबंध, नाते, मैत्री तोडू शकतात , कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना विचार करा. समोरची व्यक्ती दुखावणार नाही याचाही विचार करा. दुसऱ्याला बोलताना आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय केले असते याचाही विचार करा. कधी चुकून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडलाच तर, तात्काळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागा. व समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग, किल्मिष दूर करा तरच मैत्री, नाते संबंध टिकू शकतात.
ह्या परिस्थिती मध्ये आपलं कटुंब , आपले नातेवाईक , आपला मित्र परिवार आपल्या बरोबर नसेल तर आपण संपून जाऊ.
आपली माणसच , आपला आधार आहेत .
*भले भले आले नी रिकाम्या हाती गेले.राहिले ते फक्त त्यांचे कर्म*







वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते.तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग अाम्हाला दाखव तेव्हा एक मयुर
तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशया जवळ पोहचाल.
तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशया जवळ पोहचाल.आपणास माहिती आहे की मयूर पंख, हॆ एका विशेष काळी व एका विशेष ऋतु मध्ये तुटून पडतात पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला, की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, माझ्या साठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडिन. माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील.
अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे.कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही.आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.....
एक महत्त्वाचे - पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला ते आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात
त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करु नका - समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाची रे पूर्वसंचित केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले
देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतात
*
श्री स्वामी समर्थ
* *जगता आलं पाहिजे...*

श्री स्वामी समर्थ
* *जगता आलं पाहिजे...*मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख उपभोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.
रंग सावळा असला म्हणून काय झालं,
कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.
यशानं माणूस उंच जातो
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.
पापं काय कसही करता येतं,
पण पुण्य करता आलं पाहिजे.
ताठ काय कोणीही राहतं,
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.
ठेच जीवनात लागतेच,
सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला,
पुन्हा चालता आलं पाहिजे.
शहाण्याचं सोंग घेऊन,
वेड होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.
जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.
हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...
*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*
No comments:
Post a Comment