१. केळी-
*प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणारं केळं हा अतिशय उपयुक्त उपाय आहे.
केळ्यांमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबर्समुळे अतिशय फायदा होतो.*
२. भात-
*प्रवासाला निघताना तूप भात सोबत घ्यावा. मळमळत आहे असं वाटलं तर भात खाऊन घ्यावा.
यामुळे तुमची मळमळ थांबेल. त्रास कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.*
३. क्रॅकर्स बिस्कीटं-
*क्रॅकर्स बिस्कीटं अतिशय हलकी असल्यामुळे पचायला सोपी असतात.
शिवाय शरीरात ही बिस्किटे थंडावा निर्माण करतात. त्यामुळे मळमळ कमी होते.
४. बर्फाचा तुकडा-
*प्रवासात शक्य असल्यास सोबत बर्फाचा तुकडा ठेवावा. पाणी प्यावे.
त्यामुळे मळमळण्याचा,
उलटी होण्याचा त्रास कमी होतो.
५. आलं-
आल्याचा तुकडा किंवा आलेपाकाची वडी सोबत ठेवावी. आल्यात मळमळ थांबवण्याचा गुण असतोच. एक भांडभर पाण्यात थोडंस आलं ठेचून किंवा किसून मिसळावं आणि ते पाणी प्यावं म्हणजे तात्काळ आराम मिळतो.
याशिवाय आलं किसून त्यात लिंबू पिळावा, थोडीशी साखर घालून किंचीत सैंधव मीठ टाकून गरम करावं. साखर विरघळली, की गॅस बंद करावा. हे चाटण अतिशय चांगला उपाय आहे. यानं अपचन झालं असेल तर ते लगेच कमी होतं. मळमळ थांबते.
६. पुदिना-
पुदिना हा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. त्याचं तेल मिंट आॅईल म्हणून वापरलं जातं. चहा करताना पुदिना टाकून चहा करावा. हा उपाय मळमळीवर उत्तम इलाज आहे.
७. वेलदोडे-
आयुर्वेदात वेलदोडे या पदार्थाला मळमळीसाठी फार गुणकारी औषध मानलं जातं. प्रवासात मळमळू लागल्यावर वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास लगेच कमी होतो.मसाला वेलदोडे म्हणजे काळे वेलदोडे आणि पिवळे वेलदोडे दोन्ही कफ, पित्त आणि वातशामक औषधांनी परिपूर्ण आहेत. प्रवासाला निघताना वेलदोडे सोबत ठेवावे.
८. पाणी-
जल ही जीवन है…असं आपल्याला सर्रास सांगितलं जातं. त्यात काही चूक नाही. प्रवासात होणारी मळमळ कमी करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं हे चांगला परिणाम करतं.जर जास्त प्रमाणात पाणी प्यायलात, तर मात्र बरोबर उलटा परिणाम होतो आणि उलट्या होतात. म्हणून थोडं थोडं पाणी प्या. मळमळ कमी होते.
जल ही जीवन है…असं आपल्याला सर्रास सांगितलं जातं. त्यात काही चूक नाही. प्रवासात होणारी मळमळ कमी करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं हे चांगला परिणाम करतं.जर जास्त प्रमाणात पाणी प्यायलात, तर मात्र बरोबर उलटा परिणाम होतो आणि उलट्या होतात. म्हणून थोडं थोडं पाणी प्या. मळमळ कमी होते.
.
.jpg)







No comments:
Post a Comment