Wednesday, February 8, 2023

 *🙏🌹🌻आपलीच माणसं पण अशी कां वागतात?* 🌹🌻🙏 

:ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
 *🌻आपली माणसे आपल्याच माणसांची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।*
*नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते सर्व बोलतात ।* *समोर दिसले की खोटी स्तुती करतात | मागे वळलीकी टिका करतात |*
*गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻आवडली मुलगी म्हणून लग्न करतात ।* 
*थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।* 
*जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात ।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात । सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।* 
*पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻लोकांच्या समोर थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात । त्यांचीच निंदा दुसऱ्यांकडे करतात* 
*आई वडील जिवंत असले कीं, रागराग करतात ।* 
*मृत्यूनंतर त्यांचे, सारे गुणगान व सोपस्कार करतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात । चांगले चालले असले कीं, मनातून जळतात ।* 
*मात्र "ऐकून बरे वाटले" असे वर वर खोटे का म्हणतात? ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻पाहुणा कोणी आला कीं, "या बसा" म्हणतात । 'काय काम काढलं ' म्हणून हळूच विचारतात । येण्याच्या आनंदापेक्षा - जाण्याची वाट पहातात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।* 
*इतरांच्या कामी यावे असे नेहमीच सांगतात ।* 
*आणि त्यांच्याकडे कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻कुठलाही काही उसने मागतात ।* 
*चार दिवसांत " आणून देतो" म्हणतात ।* 
*एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।*
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻गया वया करून, उसने मागतात ।* 
*वेळेवर परत देण्याचा " वायदा " करतात ।* 
*एकदा काम झालें कीं, विसरून जातात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

 *🌻समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।* 
*नेहमीच आठवण येते "वर वर म्हणतात " आणि मागे टिका करतात ।*
*पत्र,अथवा फोनचा, खर्च येतो म्हणून बोलणे मात्र टाळतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात । फुकटची मिळाली की,भरपूर पितात ।* 
*जेवायचं असलं तरी,भूख नाहीं म्हणतात आणि जेवताना पोटभर जेवतात।।* 
*माणसं अशी कां वागतात?...!!!*

*🌻माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात । गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात ।* 
*मात्र त्याच्या हयातीत,ते नेहमी शिव्याच घालत असतात ।।* 
*माणसं अशी कां वागतात...!!!*
          
*🌻आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🌻आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...